न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम) (जाहिरात क्र. एनपीसीआयएम/एचआरएम/ ईटी/२०१८/०२) ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’च्या २०० पदांवर गेट स्कोअरवर आधारित भरती.

१) मेकॅनिकल – ८५ पदे (अजा – १६, अज – ११, इमाव – २३, खुला – ३५)

२) केमिकल – १५ पदे ३) इलेक्ट्रिकल – ५० पदे

४) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन – १५ पदे

५) इन्स्ट्रुमेंटेशन – ८ पदे    ६) सिव्हिल – २७ पदे

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि गेट-२०१७/गेट-२०१८ स्कोअर.

निवड पद्धती – व्हॅलिड गेट स्कोअरच्या आधारे (अराखीव ७० टक्के, अजा/अज/इमाव/विकलांग ६०टक्के) उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील. अंतिम निवड मुलाखतीतील गुणवत्तेनुसार.

स्टायपेंड – रु. ३५,०००/- प्रतिमाह. वेतन – रु. ८०,०००/- दरमहा.

वयोमर्यादा – दि. १८ एप्रिल २०१८ रोजी २६ वष्रेपर्यंत (इमाव – २९ वष्रेपर्यंत, अजा/अज – ३१ वष्रेपर्यंत, विकलांग – ३६/३९/४१ वष्रेपर्यंत)

ऑनलाइन अर्ज – https://npcilcareers.co.in/ या संकेतस्थळावर दि. १८ एप्रिल २०१८ पर्यंत अर्ज करावेत.

महाराष्ट्र शासन, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (टीआरटीआय) मार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे येथे संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेसाठी (आयएएस /आयपीएस/आयआरएस इ.) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षापूर्व अनिवासी व नि:शुल्क प्रशिक्षण. यूपीएससी (सिव्हिल सíव्हसेस एक्झाम – २०१९ परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी आठ महिन्यांच्या कालावधीकरिता ७५ जागांसाठी प्रवेश.

१) ठाणे विभाग (कोकण विभागातील सर्व जिल्हे) – २५ जागा.

२) नाशिक विभाग (नाशिक, नंदूरबार आणि अहमदनगर) – २५ जागा.

३) पुणे विभाग (पुणे, सोलापूर आणि उर्वरित महाराष्ट्र) – २५ जागा.

पात्रता –  पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.  जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक. उमेदवाराचे कौटुंबिक उत्पन्न रु. ८ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.  वयोमर्यादा – २१ ते ३७ वष्रे दरम्यान.

प्रवेश परीक्षा – मराठी, इंग्रजी भाषेतून बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची

दि. ६ मे २०१८ रोजी ठाणे, पुणे आणि नाशिक केंद्रांवर घेतली जाईल. २०० गुणांसाठी प्रत्येक प्रश्नाला २ गुण. सामान्य अध्ययन – ७० प्रश्न १४० गुण.  सामान्य अध्ययन (सीएसएटी) ३० प्रश्न ६० गुण. अंतिम निवड दोन्ही विषयांच्या एकत्रित प्राप्त गुणांवर आधारित. प्रशिक्षण कालावधी दरमहा विद्यावेतन रु. ४,०००/- दिले जाईल. पुस्तकांसाठी रु. ६,०००/- दिले जातील (एका वेळेसच)

ऑनलाइन अर्ज – http://unipune.ac.in/university_files/competitive_exam_centre.htm या संकेतस्थळावर दि. २३ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com