News Flash

नोकरीची संधी

कोअर सिव्हिल/ कोअर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग किमान ६५%  गुणांसह २०१८ मध्ये उत्तीर्ण करणारे उमेदवार.

एल अ‍ॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनी, मुंबई येथे जुल, २०१८ पासून सुरू होणारा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटमधील एम.टेक.हा २४  महिने कालावधीचा कोर्स.

या कोर्सद्वारे एल अ‍ॅण्ड टी बिल्ड इंडिया स्कॉलरशिपसोबत ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन’मधील करिअर करण्याची सुवर्णसंधी.

पात्रता – कोअर सिव्हिल/ कोअर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग किमान ६५%  गुणांसह २०१८ मध्ये उत्तीर्ण करणारे उमेदवार.

निवडपद्धती – ऑनलाइन लेखी परीक्षा (विषय आणि अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट) आणि मुलाखत जी आयआयटी मद्रास/ दिल्ली, एनआयटी तिरुचिरापल्ली/ सुरथकल घेणार आहोत.

स्कॉलरशिप – दरमहा रु. १३,४००/- ची स्कॉलरशिप मिळेल. स्कॉलरशिप आणि टय़ूशन फीसंबंधित आयआयटी किंवा एनआयटीला एल अ‍ॅण्ड टी कडून भरली जाईल.

नोकरी – कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना एल अ‍ॅण्ड टी कंपनीमध्ये सामावून घेतले जाईल.

ऑनलाइन लेखी परीक्षेचा दि. १८ फेब्रुवारी २०१८. मुलाखत मार्च, २०१८ च्या शेवटच्या आठवडय़ात होईल. स्कॉलरशिप लेटर्स जून, २०१८ च्या पहिल्या आठवडय़ात दिली जातील.

ऑनलाइन अर्जासाठी लॉग ऑन करा  http://www.lntecc.com/ या संकेतस्थळावरील careers या पर्यायामध्ये /BIS Link/Click Apply.

अर्ज करण्याचा शेवटचा दि. २७ डिसेंबर, २०१७.

सेंट्रल वॉटर कमिशन, सुपरिंटेंडिंग इंजिनीअर, हायड्रोलॉजिकल ऑब्झव्‍‌र्हेशन सर्कल, गांधीनगर, गुजरात- ३८२ ०१० स्किल्ड वर्क असिस्टंट (SWA) च्या एकूण ५७ पदांची भरती.

(अजा- ९, अज- ५, इमाव- २५, यूआर- १८) (विकलांगांसाठी ३% जागा राखीव)

पात्रता – दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १८ ते ३० वष्रे. (इमाव- ३३ वष्रे, अजा/अज- ३५ वष्रेपर्यंत)

ऑनलाइन अर्ज www.cwc.gov.in या संकेतस्थळावर दि. २९ डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

उच्च न्यायालय, मुंबई (सूचना क्र. एफसी ५५०४/२०१७) महाराष्ट्र राज्यातील न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालयच्या १४ पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती.

(५ वर्षांसाठी)

पात्रता – (दि. ४ डिसेंबर, २०१७ रोजी) हायकोर्ट अ‍ॅडव्होकेट म्हणून किमान ७ वर्षांचा अनुभव किंवा एलएलएम (पर्सोनेल लॉ स्पेशलायझेशनसह) किंवा मास्टर ऑफ (सोशल वेल्फेअर/ सोशिऑलॉजी/ सायकॉलॉजी/ फिलॉसॉफी) आणि एलएलबी इ. निवडीमध्ये महिलांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा – (५ जानेवारी, २०१८ रोजी) वय ३५ वर्षांपेक्षा कमी नसावे.

निवडपद्धती – लेखी परीक्षा मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद केंद्रांवर होईल. ज्यात एक किंवा एकापेक्षा जास्त पेपर्स प्रत्येकी १०० गुणांसाठी. कालावधी तीन तास. (कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, एव्हिडन्स अ‍ॅक्ट, लिमिटेशन अ‍ॅक्ट, फॅमिली लॉ, डोमॅस्टिक व्हायोलन्स, इंग्लिश ट्रान्सलेशन, जजमेंट रायटिंग). मुलाखत ५० गुणांची असेल. प्रोबेशन कालावधी दोन वर्षांचा असेल.

परीक्षा शुल्क – रु. १,०००/- खुला प्रवर्ग (रु. ५००/- मागासवर्गीय).

ऑनलाइन अर्ज  http://bombayhighcourt.nic.in/ या संकेतस्थळावर दि. ५ जानेवारी, २०१८ (१७.३० वाजे)पर्यंत करावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 12:32 am

Web Title: job alert job opportunity
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : ई प्रशासनातील पोर्टल्स
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : नीतिमूल्य आणि सचोटी
Just Now!
X