20 January 2019

News Flash

नोकरीची संधी

प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाईल.

भारतीय नौसेनेत अविवाहित पुरुष/महिला ऑफिसर्स इन एज्युकेशन’ (शॉर्ट सíव्हस कमिशन) आणि अविवाहित पुरुष यांना एक्झिक्युटिव्ह ब्रँच (लॉजिस्टिक कॅडर)’ (परमनंट कमिशन) जानेवारी, २०१९ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश.

पात्रता –

अ) एसएससी (एज्युकेशन) कॅडर –

१) एमएससी (फिजिक्स/न्युक्लिअर फिजिक्स)(बीएस्सी गणित विषयासह) – ४ पदे.

२) एमएससी (मॅथ्स/ऑपरेशनल रिसर्च) (बीएस्सी फिजिक्स विषयासह) – ५ पदे.

३) एमए (इंग्लिश) – १ पद.

४) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलि कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगमधील पदवी – ५ पदे.

ब) पीसी (लॉजिस्टिक्स) कॅडर – २० पदे.

१) इंजिनीअिरग पदवी कोणत्याही शाखेतील/एमबीए/पीजी डिप्लोमा इन फायनान्स/ लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/मटेरियल मॅनेजमेंटसह बीएस्सी/बी.कॉम./बी.एस्सी. (आयटी)/ एमसीए/एमएससी (आयटी)

(सर्व पदांसाठी – दहावी/बारावी आणि पात्रता परीक्षेत तसेच दहावी किंवा बारावीला इंग्लिश विषयात किमान ६०% गुण आवश्यक.)

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी. वेतन – ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे पे मॅट्रिक्स – १० नुसार रु.५६,१००/-  मिलिटरी सíव्हस पे (एमएसपी) रु. १५,५००/- इतर भत्ते.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना मे, २०१८ ते जुलै, २०१८ दरम्यान होणाऱ्या एसएसबी मुलाखतीसाठी बंगलोर/भोपाल/कोईम्बतूर/विशाखापट्टणम येथे बोलाविले जाईल.

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट रँकवर २२आठवडय़ांच्या नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी पाठविले जाईल. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान पूर्ण वेतन मिळण्यास पात्र.

ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी, २०१८ पर्यंत करावेत.

इंडियन आर्मीमध्ये जज अ‍ॅडव्होकेट जनरल’ (जेएजी) एन्ट्री स्कीम कोर्स ऑक्टोबर, २०१८ साठी प्रवेश.

पात्रता – किमान ५५%  गुणांसह एलएल.बी. उत्तीर्ण. बार काऊंसिल ऑफ इंडियाकडे अ‍ॅडव्होकेट म्हणून रजिस्ट्रेशन होण्याची पात्रता असावी.

वयोमर्यादा – १ जुल, २०१८ रोजी २१ ते २७ वष्रेपर्यंत.

रिक्त पदांचा तपशील पुरुष – ७, महिला – ७. ट्रेनिंग ४९ आठवडय़ांसाठी ओटा (OTA,)

चेन्नई येथे ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर तनात केले जाईल व मद्रास युनिव्हर्सटिीकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट आणि स्टट्रेजिकस्टडीज दिला जाईल.

प्रोबेशन कालावधी ६ महिने. स्टायपेंड रु. ५६,१००/- दरमहा.

ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in वर दि. १३ फेब्रुवारी, २०८ (१२.०० वाजेपर्यंत) करावेत.

suhassitaram@yahoo.com

First Published on February 8, 2018 1:20 am

Web Title: job alert job opportunity 2