महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढील एकूण ४४९ पदांच्या भरतीसाठी ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०१८’ दि. १३ मे २०१८ रोजी घेण्यात येईल. रिक्त पदांचा तपशील - (१) सामान्य प्रशासन विभाग - ‘सहायक कक्ष अधिकारी’ (एकूण २८ पदे) (२) वित्त विभाग - ‘राज्य कर निरीक्षक’ (एकूण ३४ पदे) (३) गृह विभाग - ‘पोलीस उपनिरीक्षक’ (एकूण ३८७ पदे) संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची संवर्गनिहाय स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोजित केली जाईल. (१) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्र. १ दि. २६ ऑगस्ट २०१८. (२) पेपर क्र.२ (अ) पोलीस उपनिरीक्षक - दि. ०२ सप्टेंबर २०१८, (ब) राज्य कर निरीक्षक - ३० सप्टेंबर २०१८, (क) सहायक कक्ष अधिकारी - ६ ऑक्टोबर २०१८. पात्रता - पदवी (कोणत्याही शाखेची) (पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. परंतु संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. वयोमर्यादा -सहायक कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक पदांसाठी १८ ते ३८ वष्रे (मागास वर्गीय - ४३ वष्रेपर्यंत, विकलांग - ४५ वष्रेपर्यंत. ) पोलीस उपनिरीक्षक पदासाठी १८ ते ३१ वष्रे (मागास वर्गीय - ३४ वष्रे पर्यंत) पोलीस उपनिरीक्षक पदासाठी किमान शारीरिक अर्हता - पुरुष उंची - १६५ सेंमी, छाती - ७९ ते ८४ सेंमी. महिला - उंची- १५७ सेंमी. परीक्षेचे टप्पे - सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा (१०० गुण ) व संयुक्त मुख्य परीक्षा (२०० गुण). (पोलीस उपनिरीक्षक पदासाठी १०० गुणांची शारीरिक चाचणी व ४० गुणांची मुलाखतदेखील असेल.) संयुक्त पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची - १०० प्रश्न / १०० गुण / कालावधी - १ तास / माध्यम - मराठी व इंग्रजी. मुख्य परीक्षा - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची - (अ) संयुक्त पेपर क्र. १- मराठी - ५० गुण, इंग्रजी - ३० गुण, सामान्य ज्ञान - २० गुण, एकूण - १०० गुण. वेळ - १ तास. (ब) स्वतंत्र पेपर क्र. 2 - सामान्य क्षमता चाचणी व संबंधित पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान - १०० गुण, वेळ - १ तास. परीक्षा शुल्क अमागास - रु. ३७४ मागास वर्गीय - रु. २७४ वेतन - पेमेंट रु.९३००-३४,८००+ ग्रेड पे रु. ४३००/- ऑनलाइन अर्ज - या संकेतस्थळावर दि. २० मार्च २०१८ पर्यंत करावेत. suhassitaram@yahoo.com