जागतिक दर्जाचे मॅनेजमेंटमधील प्रशिक्षण देणारी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), इंदोरयेथे ५ वष्रे कालावधीच्या इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट २०१८-२३बॅचसाठी प्रवेश.

पात्रता – दि. ३० जून, २०१८ रोजी १२वी उत्तीर्ण (१०वी/१२वीला किमान ६०% गुण आवश्यक) (अजा/अज/विकलांग यांना ५५ %गुण.)

वयोमर्यादा – दि. ३१ जुल, २०१८ रोजी २० वष्रेपर्यंत (अजा/अज/विकलांग – २२ वष्रेपर्यंत.)

प्रवेश क्षमता – १२०.

कोर्स फी – रु. ४ लाख प्रतिवर्ष. पहिल्या तीन वर्षांसाठी. चौथ्या/पाचव्या वर्षांसाठी रु.७ लाख प्रतिवर्ष.

कोर्स प्रोग्रॅम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना दुहेरी डिग्री दिली जाईल.

निवड पद्धती – अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – ५०% वेटेज (क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटी एमसीक्यू ४० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटी (शॉर्ट आन्सर्स) २० प्रश्न आणि व्हर्बल अ‍ॅबिलिटी (एमसीक्यू) – ४० प्रश्न.

वेळ प्रत्येकी ४० मिनिटे, प्रत्येक प्रश्नाला ४ गुण. एकूण ४०० गुण. एमसीक्यूच्या प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल.

परीक्षा शुल्क – रु. ३,०००/-  जीएसटी (अजा/अज/विकलांग – रु. १,५००/-  जीएसटी.)

परीक्षा केंद्र – देशभरात एकूण २८ महाराष्ट्रात – मुंबई नागपूर.

पहिल्या ३ वर्षांत शिकविले जाणारे विषय – मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, फाऊंडेशन ऑफ मॅनेजमेंट. आयपीएमच्या दुसऱ्या बॅचमधील विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट मिळून सरासरी रु. १२.५२ लाख प्रतिवर्ष वेतनावर नोकरी मिळाली.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन www.iimidr.ac.in या संकेतस्थळावर दि. १८ एप्रिल, २०१८ पर्यंत करावेत.

इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड (एसपीएमसीआयएल भारत सरकारची मालकी) ज्युनियर ऑफिस असिस्टंट लेव्हल बी – ३च्या एकूण ३५ पदांची भरती

(अजा – ७, अज – ३, इमाव – ८, यूआर – १७) (१ पद ओएच /एचएचसाठी राखीव.)

पात्रता – किमान ५५% गुणांसह पदवी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायिपग ४० श.प्र.मि./िहदी टायिपग ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा – दि. २ मे, २०१८ रोजी १८ ते २८ वष्रे (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज – ३३ वष्रेपर्यंत.)

ऑनलाइन अर्ज  https://ispnasik.spmcil.com या संकेतस्थळावर २ मे, २०१८ पर्यंत करावेत.

स्किल टेस्ट /ऑनलाइन परीक्षा मे/जून, २०१८ मध्ये आयोजित केली जाईल.

suhassitaram@yahoo.com