माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई -४०० ०१० (जाहिरात क्र. एमडीएल/एटीएस/ ०१/२०१७) वर्ष २०१७ करिता व्यवसाय प्रशिक्षणार्थीची (ट्रेड अ‍ॅप्रेंटिस) निवड.

(ए) ग्रुप ‘ए’

(१) इलेक्ट्रिशियन (२७ पदे.  अराखीव – १६, इमाव – ७, अजा – २, अज – २).

(२) फिटर (४२ पदे. अराखीव – २४,

इमाव – ११, अजा – ४, अज – ३).

ए (१) व (२) ट्रेडसाठी प्रशिक्षण कालावधी २वष्रे.

(३) मेकॅनिकल ड्राफ्ट्समन (२० पदे.

अराखीव – १२, इमाव – ५, अजा – २, अज – १).

(४) पाइप फिटर (२५ पदे. अराखीव -१५,

इमाव – ६, अजा – २, अज – २).

(५) स्ट्रक्चरल फिटर (१४ पदे. अराखीव – ९, इमाव – ३, अजा – १, अज – १).

ए (३) ते (५) ट्रेडसाठी प्रशिक्षण कालावधी ३ वष्रे.

ए (१) ते (५) ट्रेड्ससाठी वयोमर्यादा – दि. १ जुल २०१७ रोजी १५ ते १९ वष्रे.

पात्रता – गणित व विज्ञान विषयासह १०वी प्रथम प्रयत्नात किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज उमेदवारांना गुणांची अट नाही.)

(सी) ग्रुप ‘सी’

(१) रिगर (२४ पदे. अराखीव – २०, इमाव – ९, अजा – ३, अज – २)

(२) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) (२८ पदे. अराखीव – १७, इमाव – ७, अजा – २, अज – २).

ट्रेड सी (१) आणि (२) साठी प्रशिक्षण कालावधी २ वष्रे.

वयोमर्यादा – दि. १ जुल २०१७ रोजी १४ ते १८ वष्रे.

पात्रता – गणित व विज्ञान विषयांसह इयत्ता ८वी प्रथम प्रयत्नात किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अजसाठी गुणांची अट नाही.) उच्चशिक्षित उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. मात्र पात्रता इयत्ता ८वीच्या परीक्षेतील गुणांच्या आधारित असेल.

(ए) ग्रुप ‘ए’ आणि ग्रुप ‘सी’ ट्रेड्ससाठी स्टायपेंड रु.६,९३०/- (प्रथम वर्ष), रु.७,९२०/- (द्वितीय वर्ष), रु. ८,९१०/- (तृतीय वर्ष).

(बी) ग्रुप ‘बी’

(१) मरिन पेंटर (१५ पदे. अराखीव – ९, इमाव – ४, अजा – १, अज – १). (२) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (३० पदे.

अराखीव – १८, इमाव -८, अजा – २, अज -२) ट्रेड बी (१), (२) साठी प्रशिक्षण कालावधी १वर्ष स्टायपेंड रु. ८,९१०/- प्रतिमाह.

(३) कारपेंटर (६ पदे. अराखीव – ५, इमाव – १)

(४) स्ट्रक्चरल फिटर (३८ पदे. अराखीव – २२, इमाव – १०, अजा – ३, अज – ३). बी (३) व (४) ट्रेडसाठी प्रशिक्षण कालावधी २ वष्रे. स्टायपेंड रु. ७,९२०/- (प्रथम वर्ष), रु.८,९१०/- (द्वितीय वर्ष).

ट्रेड बी (१) ते (४) साठी वयोमर्यादा – १ जुल २०१७ रोजी १६ ते २१ वष्रे.

पात्रता – आयटीआय प्रथम प्रयत्नात किमान ५०%  गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी गुणांची अट नाही.) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अंतिम वर्षांतील उमेदवार अर्ज करू शकतात. परंतु त्यांना आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बोनाफाइड प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अजा/अज/इमाव यांनी जातीचा दाखला शिवाय (इमाव – एनसीएल) दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक. सर्व उमेदवारांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या सही-शिक्क्यासह ‘प्रथम प्रयत्न प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक.

नमुना प्रमाणपत्र जाहिरातीत ९व्या पानावर दिलेले आहे. ग्रुप ‘ए’ आणि ग्रुप ‘सी’ या दोन्ही पदांसाठी पात्र उमेदवार वेगवेगळे अर्ज सादर करू शकतात.

ऑनलाइन अर्ज www.mazdock.com या संकेतस्थळावर दि. २० जुल २०१७ पर्यंत करावेत.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), मुख्यालय बँगलोर, हस्सन येथे िहदी टायपिस्टच्या ४ पदांची भरती.

पात्रता – आर्ट्स/सायन्स/कॉमर्स/मॅनेजमेंट/कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमधील प्रथम वर्गातील पदवी. दहावी िहदी विषय किंवा िहदी माध्यमातून उत्तीर्ण. िहदी टंकलेखन २५ श.प्र.मि.  इंग्रजी टायिपग (डिझायरेबल).

वयोमर्यादा – २१ जुल २०१७ रोजी २६ वष्रे (अजा – ३१ वष्रे).

(२) टेक्निशियन (बी), इलेक्ट्रिशियन – पात्रता – १०वी. आयटीआय उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. २१ जुल २०१७ रोजी ३५वष्रे. विहीत नमुन्यातील अर्ज http://www.isro.gov.in/isro-centres.html या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पूर्ण भरलेले अर्ज पासपोर्ट साइज फोटो दिलेल्या जागी चिकटवून आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वसत्यापित प्रतींसह लिफाफ्यामध्ये भरून त्यावर ‘िहदी टंकक के पद के लिए आवेदन’/ ‘तकनिशियन ‘बी’ के पद के लिए आवेदन’ असे लिहून प्रशासन अधिकारी (भरती), इस्रो, मु. अंतरिक्ष भवन, न्यू बी.ई.एल. रोड, बंगळुरु-५६० ०९४ पत्त्यावर साध्या पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने दि. २१ जुल २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.