महिला आणि बालकल्याण मंत्रालयात कन्सल्टन्ट अकाऊंटस्च्या २ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ८ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा http://www.wcd.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज अंडर सेक्रेटरी (डब्ल्यूबीपी), मिनिस्ट्री ऑफ वुमेन अ‍ॅण्ड चाइल्ड डेव्हलपमेंट, १ ला मजला, जनपथ हॉटेल, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटी तारीख २० जुलै २०१६.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मानव संसाधन विभागातील संधी– अधिक माहिती व तपशिलासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या https://bharatpetroleum.com/ careers/ careers.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१६.

इस्रो वेल्लोर येथे टेक्निशियन -फिटरच्या १८ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे फिटर पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जुलै २०१६ च्या अंकातील इस्रोची जाहिरात पाहावी अथवा https://sdsc.shar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१६.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, मोहल्ली येथे टेक्निकल सुपरवायझरच्या ९ जागा
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ जून ते १ जुलै २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा http://www.niper.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, सेक्टर ६७, एसएसएस नगर, मोहाली (पंजाब) १६००६२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०१६.
साहा इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लीअर फिजिक्स-कोलकोता येथे रिसर्च असोसिएटसच्या २२ जागा-
अर्जदार फिजिकल वा बायोलॉजिकल सायन्सेसमधील पीएचडीधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ८ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्ट्रार, साहा इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लीअर फिजिक्स, सेक्टर- १, ब्लॉक एएफ, विधाननगर, कोलकोता- ७०००६४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०१६.

भारतीय वायुदलात नवी दिल्ली येथे कनिष्ठ कारकुनांच्या १० जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असायला हवेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ जून ते १ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एअर ऑफिसर कमांडिंग, एअरफोर्स स्टेशन, रेस कोर्स, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०१६.

सीमा सुरक्षा दलात सब-इन्स्पेक्टर ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल)च्या ५ जागा
अर्जदार इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ जून ते १ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा http://www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०१६.

सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग अ‍ॅण्ड फ्युअल रिसर्चमध्ये साहाय्यकांच्या २० जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असायला हवेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ८ जुलै २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा http://www.cimfr.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटी तारीख २५ जुलै २०१६.