आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे पशुवैद्यक पर्यवेक्षकासाठी संधी-
उमेदवार विज्ञान वा प्राणीशास्त्र विषयातील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा
५ वर्षांचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ मे ते ३ जून २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, आर्मड फोर्सेस मेडिकल सव्‍‌र्हिसेस (प्लॅनिंग) ऑफिस ऑफ डीजीएएफएमएस, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, ‘एम’ ब्लॉक, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०१६.

संरक्षण मंत्रालयांतर्गत आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये ज्युनिअर वर्क्‍स मॅनेजर्सच्या १५३ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ जुलै २०१६ च्या अंकातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in किंवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०१६.

संरक्षण उत्पादन विभागात सीनिअर सायंटिफिक असिस्टंटच्या २० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ जुलै २०१६च्या अंकातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी. अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in किंवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०१६.

भाभा अणु-संशोधन केंद्र, मुंबई येथे रिसिप्शनिस्टच्या २ जागा-
उमेदवारांनी बारावीची परीक्षा कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना रिसिप्शनिस्ट म्हणून काम करण्याचा १ वर्षांचा अनुभव असायला हवा. उत्तम संवाद कौशल्य आवश्यक.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ जुलै २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा बीएआरसीच्या http://www.barc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०१६

संरक्षण उत्पादन विभागात चार्जमनच्या
३२ जागा-
अर्जदार इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक अथवा बीएस्सी असावेत व त्यांना उत्पादन क्षेत्रातील कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जुलै २०१६च्या अंकातील जाहिरात पहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडिंग ऑफिसर, एक्यूएडब्ल्यू (ए), डीजीएक्सए, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, खमारिया, जबलपूर (म.प्र.) ४८२००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१६.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड, तळोजा येथे प्रशिक्षार्थी- वेल्डरसाठी संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी हिंदुस्थान कॉपरच्या http://www.hindustancopper.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज हिंदुस्थान कॉपर लिमिटेड, ताम्र भवन, १, आशुतोष चौधरी एव्हेन्यू, कोलकोता- ७०० ०१९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१६.

भारतीय वायुदलात कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या १४ जागा-
अर्जदार बारावी उत्तीर्ण व हिंदी टंकलेखनाची
३० शब्द प्रतिमिनिट पात्रता असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जुलै २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स सेंट्रल अकाउंटंस् ऑफिस, सुब्रतो पार्क,
नवी दिल्ली ११० ०१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१६.

सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल- कुशल कारागिरांच्या ६ जागा-
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी सीमा सुरक्षा दलाच्या http://www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील अर्ज गृहव्यवहार मंत्रालय, डायरेक्टोरेट जनरल- बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ब्लॉक नं. १०, ८ वा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१६.

सीएसआयआर अंतर्गत ‘नीरी’, नागपूर येथे सुरक्षा सहाय्यकांसाठी संधी-
उमेदवार सैन्यदलातील निवृत्त झालेले असावेत व ते अग्निशमनविषयक पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ जुलै २०१६ च्या अंकातील ‘नीरी’ची जाहिरात पहावी अथवा नीरीच्या http://www.neeri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कंट्रोलर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, ‘नीरी’, नेहरू मार्ग, नागपूर- ४४००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०१६.

केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागात कॅन्टिन असिस्टंटच्या ७ जागा-
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० जून २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अ‍ॅण्ड ट्रेनिंग, रूम नं. ३, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली- ११० ००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१६.

इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलात पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या ८ जागा-
उमेदवार पशुविज्ञान विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत आणि त्यांचे व्हेटर्नरी काऊंसिलमध्ये पंजीकरण झालेले असावे.
अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० जून २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (पर्सोनेल) डायरेक्टोरेट जनरल, इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दल, ब्लॉक-२, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११० ००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१६.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात सिनिअर असिस्टंट – स्टेनोग्राफर्सच्या चार जागा : उमेदवार पदवीधर व लघुलेखनाची ऐंशी शब्द प्रतिमिनिट तर टंकलेखनाची चाळीस शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा चाळीस वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या १६ ते २२ जुलै २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी. अथवा http://www.aai.aero या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सैन्यदलात नर्सिग पात्रताधारकांसाठी संधी : महिला उमेदवार नर्सिगमधील पदवी वा पदव्युत्तर पात्रताधारक असाव्यात व त्यांचे नर्सिग काऊंसिलमध्ये पंजीकरण झालेले असावे. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या १६ ते २२ जुलै २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा http://www.joinindianarmy.nic.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१६.

नॅशनल सेंटर फॉर सेल सायंस, पुणे येथे ऑफिसर अकाऊंटस्च्या दोन जागा :
अधिक माहिती व तपशीलासाठी http://www.uccs.nes.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायंस, एनसीसीएस कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेश खिंड, पुणे ४११०००६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०१६.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग. शासनाच्या विक्रीकर विभागातील ‘कर सहाय्यक, गट-क’ च्या ४५० पदांची भरती परीक्षा आहे २८ ऑगस्ट २०१६. पात्रता – (१) पदवी उत्तीर्ण. (२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र. वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१६ रोजी १८ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय १८-४३ वष्रे). परीक्षेचा टप्पा – फक्त लेखी परीक्षा ४०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची, वेळ २ तास. विषय – (१) मराठी, (२) इंग्रजी, (३) सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, (४) बुक किपींग आणि अकाऊंटन्सी. परीक्षा शुल्क – ३७३ रुपये अमागास, २७३ रुपये मागासवर्गीय, २३ रुपये मा.स. ऑनलाईन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर २५ जुलै २०१६ पर्यंत सादर करावेत.

पदवीधर उमेदवारांना सेना दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी. संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी). कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा – २०१६. २३ ऑक्टोबर २०१६ रोजी घेणार. यातून खालील ठिकाणच्या कोस्रेससाठी प्रवेश – (१) इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून (आय्एम्ए) – १५० जागा (१९ जागा एनसीसी प्रमाणपत्र धारकांसाठी राखीव). (२) इंडियन नेव्हल अकादमी (आय्एन्ए) इझीमला – ४५ जागा. (३) एअर फोर्स अकादमी (एएफ्ए) हैदराबाद – ३२ जागा. (४) ऑफिसर्स ट्रेिनग अकादमी (ओटीए) चेन्नई – १७५ जागा (पुरुष) आणि ११ जागा (महिला) एकूण ४१३ जागा. वयोमर्यादा – १ जुल २०१७ रोजी (१) २० ते २४ वष्रे. (२) ओटीएसाठी १९ ते २५ वष्रे. पात्रता – (पदवीच्या अंतिम वर्षांत शिकणारे उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र) (१) आय्एम्ए/ओटीए – पदवी (कोणत्याही शाखेतील) (२) आय्एन्ए – अभियांत्रिकेतील पदवी, (३) एएफ्ए – पदवी (१२ वी फिजिक्स आणि गणित विषयांसह) किंवा अभियांत्रिकीमधील पदवी. शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी. आर्मीसाठी, १५७ सें.मी. नौदलासाठी, १६२.५ सें.मी. वायुसेनेसाठी. महिला उंची – १५२ सें.मी. परीक्षा शुल्क – २०० रुपये (महिला/अजा/अज यांना फी माफ). परीक्षा पद्धती – (१) लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (२) एस्एस्बी – मुलाखत. (३) लेखी परीक्षा – आय्एम्ए, आय्एन्ए आणि एएफ्एसाठी – (अ) इंग्रजी, (ब) सामान्य ज्ञान आणि (क) प्राथमिक गणित या विषयांवर आधारित प्रत्येकी १०० गुणांसाठी वेळ प्रत्येकी दोन तास. एकूण ३०० गुण अधिक मुलाखत ३०० गुण.
(२) ओटीएसाठी इंग्रजी आणि सामान्यज्ञान विषयांवर आधारित प्रत्येकी १०० गुणांसाठी वेळ प्रत्येकी २ तास. एकूण २०० गुण मुलाखत २०० गुण. ऑनलाईन अर्ज http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर १२ ऑगस्ट २०१६ पर्यंत करावेत. ठाणे जिह्यतील सीडीएस् परीक्षा २०१६ साठी इच्छुक उमेदवारांना खुशखबर. जिल्हा सनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे दिनांक २८ जुल २०१६ रोजी मुलाखत.

इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) (गृहमंत्रालय, भारत सरकार) मध्ये सिक्युरीटी असिस्टंट (मोटार ट्रान्सपोर्ट) च्या एकूण २१९ पदांची भरती. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथील आयबीच्या कार्यालयात एकूण ११ पदांची भरती. आयबीचे मुख्यालय दिल्ली येथे ४५ पदांची भरती. पात्रता – (१) एस्एससी उत्तीर्ण, (२) हलके वाहन चालविण्याचा परवाना, (३) मोटार गाडीची देखभाल दुरुस्ती करण्याची आवश्यक अशी माहिती असणे गरजेचे आहे. (४) किमान एक वर्षांचा गाडी चालविण्याचा अनुभव आवश्यक. इष्ट पात्रता – मोटार सायकल चालविण्याचा परवाना. वयोमर्यादा – ३० वष्रे (अजा/अज – ३५ वष्रे, इमाव – ३३ वष्रे) निवड पद्धती – स्कील टेस्ट (५० गुण ड्रायव्हींग स्कील टेस्टसाठी आणि ५० गुण मोटार मेकॅनिझमसाठी. परीक्षा शुल्क – ५० रुपये महिला/अजा/अज यांना फी माफ. ऑनलाईन अर्ज http://www.mha.nic.in या संकेतस्थळावर ६ ऑगस्ट २०१६ पर्यंत.

संघ लोकसेवा आयोग ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डासाठी (संरक्षण मंत्रालय) ज्युनियर वर्कस मॅनेजर ग्रुप बी गॅझेटेड च्या खालील पदांची भरती सिलेक्शन पद्धतीने करणार आहे. (जाहिरात क्र. १२/२०१६) पे स्केल ९,३००-३४,८०० रुपये (पे बँड-२) अधिक नियमानुसार टीए घर भाडे भत्ता. (१) ज्युनियर वर्कस मॅनेजर (केमिकल) (६ पदे), (२) ज्युनियर व. मॅनेजर (सिव्हिल) (४ पदे) (३) ज्युनिअर व. मॅनेजर (क्लोिदग टेक्नॉलॉजी) (९ पदे) (४) ज्युनिअर व. मॅनेजर (इलेक्ट्रीकल) (५ पदे), (५) ज्युनिअर व. मॅनेजर (मेकॅनिकल) (१५३ पदे). पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी. पद क्र. (१) ज्युनिअर व. मॅनेजर (केमिकल) साठी – बी.ई. व्यतिरिक्त एमएससी (केमिस्ट्री) उमेदवार पात्र आहेत. वयोमर्यादा – २८ जुल २०१६ रोजी ३० वष्रे. अर्ज शुल्क – २५ रुपये (महिला/अजा/अजसाठी फी माफ) निवड पद्धती – उमेदवारांची निवड फक्त मुलाखतीद्वारा अथवा भरती परीक्षेनंतर मुलाखतीद्वारा केली जाईल. ऑनलाईन अर्ज (ओआर्ए) http://www.upsconline.nic.in २८ जुल २०१६ पर्यंत करावेत. ऑनलाईन पद्धतीने पूर्ण भरलेल्या अर्जाची पिंट्रआऊट काढण्याची शेवटची तारीख २९ जुल २०१६.