अभियांत्रिकीच्या अंतिम पूर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सैन्यदलात २६ जागा- उमेदवार सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग यांसारख्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम पूर्व वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.

वयोमर्यादा २४ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या

३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकातील सैन्यदलाची जाहिरात पहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१६.

केंद्र शासित प्रदेश दादरा व नगरहवेली प्रशासनात ईजीसी टेक्निशियन्ससाठी संधी- उमेदवार बारावी उत्तीर्ण व ईसीजी टेक्नॉलॉजीमधील पदविकाधारक असावेत.

वयोमर्यादा २७ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या

३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६च्या अंकातील दादरा व नगरहवेली प्रशासनाची जाहिरात पहावी. अथवा http://www.dnh.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर (मेडिकल अ‍ॅण्ड हेल्थ सव्‍‌र्हिसेस) दादरा अ‍ॅण्ड नगर हवेली सिल्वासा या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१६.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रॉलॉजी, रुडकी येथे संशोधकांच्या ६ जागा- अर्जदार इंजिनीअरिंगमधील पदवीधर वा पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना संशोधनविषयक कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा.

वयोमर्यादा ३५ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रोलॉजीची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nih.ernet.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रोलॉजी, जल विज्ञान भवन, रुडकी २४७६६७ (उत्तराखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०१६.

म. गांधी मिशन, औरंगाबाद येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी- अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली म. गांधी मिशनची जाहिरात पहावी अथवा मिशनच्या http://www.mgmcabt.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्रेटरी, महात्मा गांधी मिशन, एन-६, सिडको, औरंगाबाद ४३१००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१६.

आयुध निर्माणी देहराडून येथे कुशल कामगारांच्या १२२ जागा- अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी, देहराडूनची जाहिरात पहावी अथवा http://www.ofdun.asrb2014.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१६.

इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगलोर येथे स्टेनोग्राफर्ससाठी संधी- उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. ८० शब्द प्रतिमिनिट टंकलेखन व ५० शब्द ट्रान्सक्रिप्शनची पात्रता असलेले असायला हवेत.

वयोमर्यादा २७ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा http://www.ipirti.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, पिन्या मेट्रो स्टेशनच्या मागे, एचएमटी लिंक रोड, तुमकुर रोड, यशवंतपूर, बंगलोर- ५६००२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१६.

पंजाब नॅशनल बँकेत अधिकाऱ्यांच्या १९१ जागा- अधिक माहिती व तपशिलासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या http://www.pubindia.in>Link-Recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१६.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे सहाय्यक ग्रंथपालांच्या ३ जागा- उमेदवारांनी ग्रंथालय विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६च्या अंकातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.iisc.ernet.in/opportunities/library_positions_appln.pdf  या संकेत स्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट रजिस्ट्रार, युनिट १ ए, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर ५६००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१६.

भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी (डीएई), डायरेक्टोरेट ऑफ पच्रेस अ‍ॅण्ड स्टोअर्स (डीपीएस), मुंबई येथे कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ वखार व्यवस्थापकच्या एकूण ८४ पदांची भरती. – (अजा – ४, अज – ११, इमाव – ३९, खुला – ३०) जाहिरात क्र. १/डीपीएस्/२०१६.

पात्रता – दि. १४ सप्टेंबर २०१६ रोजी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण. (मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदविका धारकांना प्राधान्य).

वयोमर्यादा – १८ ते २७ वष्रे (अजा/अज – १८ ते ३२ वष्रे, इमाव – १८ ते ३० वष्रे)

वेतन – रु. २५,५००/- अधिक केंद्र सरकारच्या नियमानुसार लागू असलेले भत्ते.

निवड पद्धती – (अ) टायर-१ – पात्र उमेदवारांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा एकूण २०० गुणांसाठी. कालावधी – दोन तास. सामान्य बुद्धिमत्ता आणि कारणे, सामान्यज्ञान, गणितीय क्षमता, इंग्रजी या विषयांवर आधारित प्रत्येकी ५० प्रश्न.

ज्या उमेदवारांना टायर-१ मध्ये १०पेक्षा कमी गुण मिळतील, ते टायर-२ परीक्षेसाठी अपात्र असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील. (ब) टायर-२ वर्णनात्मक लेखी परीक्षा १०० गुणांसाठी अंकगणित आणि इंगजी या विषयांवर कालावधी तीन तास.

अर्ज कसा करावा – अर्ज ऑनलाइन पद्धतीने rect.dpsdae.gov.in किंवा http://www.dpsdae.gov.in <http://www.dpsdae.gov.in/&gt;  या संकेतस्थळावर दि. १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत करावा. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०ऑगस्ट २०१६ च्या अंकात पहावी.

विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी कारकूनपदाच्या मोठय़ा संधी- इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनतर्फे महाराष्ट्रातील उमेदवारांची कारकून म्हणून निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-

जागांची संख्या : उपलब्ध जागांची संख्या १३४३ असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

समाविष्ट बँका : या निवड प्रक्रियेत समाविष्ट बँकांमध्ये अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया व विजया बँक या राष्ट्रीयीकृत बँकांचा समावेश आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना संगणकाचे ज्ञान असायलाहवे.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय २८ वर्षांहून अधिक असू नये. वयोमर्यादेची अट अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी ५ वर्षांनी तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षांनी शिथिलक्षम आहे.

निवड प्रक्रिया- पात्रताधारक उमेदवारांना निवड परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा संगणकीय पद्धतीने प्राथमिक निवडपरीक्षा म्हणून २६ व २७ नोव्हेंबर व ३ व ४ डिसेंबर २०१६ रोजी घेण्यात येईल.

प्राथमिक निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांची मुख्य निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने डिसेंबर २०१६ रोजी घेण्यात येईल त्याआधारे त्यांची पुढील निवड करण्यात येईल.

निवड परीक्षेत समाविष्ट विषय- वरील निवड परीक्षांमध्ये खालीलप्रमाणे विषयांचा समावेश असेल-

प्राथमिक निवड परीक्षा- इंग्रजी भाषा, गणितीय क्षमता व वैचारिक कल.

मुख्य निवड परीक्षा- आकलन शक्ती, इंग्रजी भाषा, सांख्यिकी कल, सामान्य ज्ञान व संगणकीय ज्ञान.

परीक्षा पूर्व प्रशिक्षण- उमेदवारांना निवड परीक्षा पूर्व प्रशिक्षण दि. ७ ते १२ नोव्हेंबर २०१६ च्या दरम्यान देशांतर्गत निर्धारित केंद्रांवर देण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद या प्रशिक्षण केंद्रांचा समावेश असेल.

अर्जासह भरावयाचे शुल्क- उमेदवार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी आपल्या अर्जासह ६०० रु. (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी १०० रु.) प्रवेश शुल्क म्हणून संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशील- उमेदवारांनी या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २० ते २६ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ibps.in – cwc clerks या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१६ आहे.

भारतीय नौदलात खलाशी पदांची भरती-

खलाशी, वरिष्ठ सेकंडरी रिक्रूट्स (एसएसआर)-०१/२०१७ च्या तुकडीसाठी मुंबई येथे ९ सप्टेंबर २०१६ रोजी नियोजित भरती प्रक्रिया.

पात्रता – गणित व भौतिकशास्त्र विषयांसह १२ वी उत्तीर्ण.

वय – उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी १९९६ ते ३१ जानेवारी २००० दरम्यान झालेला असावा.

निवडीचे निकष – लेखी परीक्षा – बहुपर्यायी स्वरूपाची इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान यांवर आधारित असेल. अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया http://www.joinindiannavy.gov.in <http://www.joinindiannavy.gov.in/&gt;  या संकेतस्थळावर पाहता येईल.

शारीरिक क्षमता चाचणी – (पीएफटी) १.६ कि.मी. ७ मिनिटांत धावणे,  २० बठका (उठा-बशा), १० जोर, वैद्यकीय तपासणी.

पात्र उमेदवारांनी खालील ठिकाणी ९ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ७ वाजता पुढे दिलेल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. भारतीय नौदलाचे जहाज- हमला मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५

कागदपत्रांची यादी – मूळ प्रमाणपत्र आणि स्वयंसाक्षांकित प्रत, १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, १२ वी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, असल्यास एनसीसी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रु. १०/- चा स्टँप लावलेला २२ ७ १० सें.मी. आकाराचा स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा, सध्याच्या पारपत्र आकाराची सात छायाचित्रे. अधिक तपशील http://www.joinindiannavy.gov.in <http://www.joinindiannavy.gov.in/>  या संकेतस्थळावर.

नौदल स्टेशन वर्कशॉप, कुलाबा, मुंबई येथे टेलिकॉम मेकॅनिक म्हणून संधी-

उमेदवार बारावी उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. राष्ट्रीय कौशल्य पात्रताधारकांना प्राधान्य.

वयोमर्यादा २५ वर्षे.

अर्जाचा नमुना  व  तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६च्या अंकातील नौदल स्टेशन वर्कशॉप, मुंबईची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडिंग ऑफिसर, स्टेशन वर्कशॉप, ईएमई, कुलाबा पोलीस स्टेशनजवळ, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, कुलाबा, मुंबई- ४००००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१६.

नौदलात अभियंत्यांसाठी संधी-

उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन, मेटॅलर्जी, पॉवर इंजिनीअरिंग एरोनॉटिकल इंजिनीअरिंग, इंस्ट्रमेंटेशनमधील पदवी अथवा नेव्हल आर्किटेक्चरमधील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.

वयोमर्यादा २५ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पहावी अथवा नौदलाच्या http://www.joinindianarmy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१६.

डिफे न्स फूड रिसर्च लेबॉरेटरी, म्हैसूर येथे रिसर्च

फेलोशिपच्या २ संधी-

अर्जदारांनी अ‍ॅनलॅटिकल वा ऑर्गेनिक केमिस्ट्री यांसारख्या विषयातील एमएस्सी पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी यूजीसी नेट, सीएसआयआर, यूजीसी नेटसारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी.

वयोमर्यादा २८ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ ऑगस्ट २०१६च्या अंकातील जाहिरात पहावी. अथवा http://www.drdo.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेंस फूड रिसर्च लेबॉरेटरी, म्हैसूर ५६००११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१६.

शिकू आनंदे

पीएचडी पूर्व परीक्षा २०१६- मुंबई विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, विधी आणि अभियांत्रिकी शाखेत पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पीएचडी पूर्व परीक्षा २०१६ (पीईटी)

दि. १७ सप्टेंबर २०१६ रोजी.

पात्रता – संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ५५. गुणांसह उत्तीर्ण. (मागासवर्गीयांसाठी गुणांची अट ५०).

परीक्षा पद्धती – पीएचडी पीईटी – वस्तुनिष्ठ प्रश्न (४० गुण), थोडक्यात उत्तरे (३० गुण), दीर्घ उत्तरे (३० गुण) अशाप्रकारची एकूण १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल. किमान ५० गुण मिळविणारे पीएचडी प्रवेशास पात्र. हा निकाल तीन वर्षांसाठी ग्राह्य़ धरला जाईल. ऑनलाइन अर्ज <http://www.mu.ac.in/&gt;  या संकेतस्थळावर करावेत.

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर), नवी दिल्ली यांची लेक्चरशीप (एलएस) आणि ज्युनियर रिसर्च फेलोशीप (जेआरएफ) साठी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (एनइटी) दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी घेणार आहे.

पात्रता – एमएस्सी/बीई/बीटेक/बीफार्म/एमबीबीएस किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांगांसाठी किमान ५० गुण) ज्यांनी एमएस्सीला प्रवेश घेतला आहे असे उमेदवार रिझल्ट अवेटेड (आरए) कॅटेगरीमध्ये एनईटीसाठी पात्र आहेत. (त्यांना दोन वर्षांच्या वैधता कालावधीत आवश्यक अर्हता प्राप्त करावी लागेल.)

परीक्षेसाठीचे विषय –  रासायनिक विज्ञान, जीवन विज्ञान, भौतिक विज्ञान, मॅथेमॅटिकल सायन्सेस इ. नेट परीक्षा जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. २०० गुणांसाठी, कालावधी तीन तास. ज्याचा अंतिम निकाल मार्च/एप्रिल २०१७ मध्ये जाहीर होईल. देशभरातील २७ परीक्षा केंद्रांमध्ये या परीक्षेसाठी महाराष्ट्रात फक्त पुणे आणि नागपूर ही दोन केंद्रे नियुक्तकेली आहेत.

परीक्षा शुल्क – रु. १,०००/- (खुला गट)/रु. ५००/- (इमाव)/रु. २५०/- (अजा/अज/विकलांग). ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी http://www.csirhrdg.res.in <http://www.csirhrdg.res.in/&gt;  या संकेतस्थळावरून चलन डाऊनलोड करून घ्यावे व इंडियन बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा एनइएफ्टी माध्यमातून परीक्षा शुल्क भरावे ऑनलाइन अर्जाची प्रत (पिंट्रआऊट) त्यावर कृष्णधवल पारपत्र आकाराचा फोटो चिकटवून योग्य जागी सही करून जातीच्या दाखल्यासह खालील पत्त्यावर दि. १६ सप्टेंबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. ‘ The Deputy Secretary (Exam), Human Resource Development Group, Examination Unit, CSIR Complex, Library Avenue, Pusa, New Delhi – 110 012.l

बँक, रेल्वे, एलआयसी इ. लिपिक वर्गीय पदांच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधक व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण.

प्रशिक्षण केंद्रात प्रत्येकी ५० उमेदवारांची निवड.

पात्रता – १२वी उत्तीर्ण, वय १८ ते ३५ वष्रे.

प्रशिक्षण संस्थेचे दूरध्वनी क्र.

नवी मुंबई – ७२०८९८६१७१/९१६७०५१३२१,

मुंबई ९८३३९१३६५२/९९२०७४५७९४/८१०८०१६४५५

ठाणे ग्रामीण – ९८३३२८०५३१/९७६९५२२७५९

ठाणे – ९८३३०७१४२६/९००४३४४८३३

प्रशिक्षण संस्थेचे नाव आणि पत्ता यासाठी २७ ऑगस्ट २०१६च्या अंकातील बार्टीची जाहिरात पाहावी. संबंधित संस्थेकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१६. संस्थेमार्फत

दि. १८ सप्टेंबर २०१६ रोजी उमेदवारांची चाळणी परीक्षा घेतली जाईल. यातून निवडलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण

दि. २६ सप्टेंबर २०१६ पासून सुरू होणार. पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु. ३,०००/- विद्यावेतन दिले जाईल.