*   महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (मर्यादित) मध्ये भरती.  (जाहिरात क्र. ०९ ऑक्टोबर/२०१६)  साहाय्यक अभियंता (४०० पदे) व कनिष्ठ अभियंता (२५० पदे) या पदांकरिता भरती.

पात्रता –

(१) साहाय्यक अभियंता – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन व पॉवर या अभियांत्रिकी शाखेतील पदवी. (महानिर्मिती कंपनीमधील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी संबंधित पदवी ५ वर्षांचा अनुभव – रिक्त पदे २०)

(२) कनिष्ठ अभियंता – वरील अभियांत्रिकी शाखांमधील पदविका (महानिर्मिती कंपनीमधील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी संबंधित पदविका ५ वर्षांचा अनुभव – रिक्त पदे १३)

वयोमर्यादा – दि. ७ नोव्हेंबर २०१६ रोजी १८ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय १८ ते ४३ वष्रे) (अपंग – १८ ते ४५ वष्रे) (महानिर्मिती कर्मचाऱ्यांसाठी ५७ वष्रेपर्यंत)

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षेच्या गुणांच्या आधारे

परीक्षा शुल्क – साहाय्यक अभियंता – खुला प्रवर्ग रु. ८००/- (मागास प्रवर्ग रु. ६००/-), कनिष्ठ अभियंता – खुला प्रवर्ग रु. ५००/- (मागास प्रवर्ग रु. ३००/-).

ऑनलाइन पद्धतीने अर्ज  http://www. mahagenco.in या संकेतस्थळावर दि. ७ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत.

*   पार्लमेंट ऑफ इंडिया (लोकसभा) मध्ये ‘एक्झिक्युटिव्ह/लेजिस्लेटिव्ह/कमिटी/प्रोटोकॉल असिस्टंट’च्या एकूण ३५ पदांची भरती

(अजा – ८, अज – १, इमाव – १३, अराखीव – १३)

पात्रता आणि वयोमर्यादा दि. १ डिसेंबर २०१६ रोजी

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण

वयोमर्यादा – २७ वष्रे (इमाव – ३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रे)

वेतन – ९,३००-३४८०० (पीबी-२)  ग्रेड पे रु. ४,६००/- एकूण वेतन रु. ५३,६४२/-

परीक्षा केंद्र – मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई.

निवड पद्धती –

पूर्व परीक्षा –  सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, जनरल इंग्लिश प्रत्येकी ५० गुण एकूण वेळ ५० मिनिटे,  मुख्य परीक्षा – पेपर-१ इंग्रजी निबंध (६० गुण), प्रेसे (४० गुण), कॉम्प्रिहेन्शन (२५ गुण), ग्रामर (२५ गुण) – एकूण १५० गुण.

पेपर-२- भारतीय राज्यघटना १०० गुण.

कालावधी प्रत्येकी तीन तास. ऑनलाइन पद्धतीने अर्ज  http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर दि. २ नोव्हेंबर २०१६ ते १ डिसेंबर २०१६ दरम्यान करावेत.

*   दिव्यांग उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत विशेष भरती मोहीम.

(१) आया (केवळ स्त्री उमेदवार) एकूण ३० पदे (अंधत्व/क्षीण दृष्टी – ११ पदे, चलनवलन विकलांग – ११ पदे, श्रवणशक्तीतील दोष – ८ पदे)

(२) कामगार/कक्ष परिचर/हमाल इ. – एकूण ५७० पदे (अंधत्व/क्षीण दृष्टी – २२८ पदे, चलनवलन विकलांग – १७९ पदे, श्रवणशक्तीतील दोष – १५२ पदे)

पात्रता – मराठी विषयासह एस्.एस्.सी. किमान ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी १८ ते ४५ वष्रे.

विस्तृत जाहिरात आणि अर्जाचा विहित नमुना http://portal.mcgm.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध. पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील स्वहस्ताक्षरात पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतींसह (शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गुणपत्रिका, जाती प्रमाणपत्र, जाती वैधतेचे प्रमाणपत्र, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, किमान ४०. अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र इ.) ‘नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर नॅशनल पार्कजवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०० ०६६’ या भरतीच्या ठिकाणी जमा करावेत. यातील अंधत्व/क्षीण दृष्टी असलेल्या उमेदवारांनी दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी, तर चलनवलनविषयक विकलांगांना दि. ९ नोव्हेंबर २०१६ रोजी, श्रवणशक्तीतील दोष असलेल्यांनी – दि. १० नोव्हेंबर २०१६ रोजी ज्या उमेदवारांना एसएससीमध्ये  ६०टक्के पेक्षा गुण मिळाले आहेत, त्यांनी सकाळी ९.३० ते १२.३० वाजेपर्यंत तर ज्यांना एसएससीला ४० ते ६० टक्के गुण  मिळाले आहेत त्यांनी दुपारी १.३० ते ४.३० वाजेपर्यंत ठरलेल्या दिवशी हजर रहावे.