स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट कोचच्या १७० जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या http://www.sportsauthorityofindia.nic.in, http://www.nsnis.org अथवा http://www.yas.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१६.

आयडीबीआय बँकेत एकूण ५०० ‘एक्झिक्युटिव्ह’ पदांची भरती.

जाहिरात क्र. १/२०१६-१७

पात्रता – (दि. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी) पदवी किमान ६०% गुण (अजा/अज/विकलांग – ५५% गुण)

वयोमर्यादा – (दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी) २० ते २५ वष्रे (अजा/अज- ३० वष्रे, इमाव- २८ वष्रे) (विकलांग-खुला- ३५ वष्रे, इमाव- ३८ वष्रे, अजा/अज- ४० वष्रे)

परीक्षा शुल्क – रु. ७००/- (अजा/अज/विकलांग रु. १५०/-)

वेतन – दरमहा पहिले वर्ष रु. १७,०००/-, दुसरे वर्ष रु. १८,५००/-, तिसरे वर्ष रु. २०,०००/-  तीन वर्षांच्या करार पद्धती नियुक्ती यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ४)’ या पदावर नियुक्त केले जाईल.

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा (दि. १६ जानेवारी २०१७)

टेस्ट ऑफ (१) रिझिनग, (२) वर्किंग इंग्लिश लँग्वेज, (३) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड प्रत्येकी ५० गुणांसाठी. वेळ – ९० मिनिटे.

परीक्षा पूर्व प्रशिक्षण – अजा/अज/इमाव यांच्यासाठी दि. २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत (६ दिवसांचे) मुंबई, पुणे, नागपूर इ. केंद्रांवर. ऑनलाइन अर्ज http://www.idbi.com  वर दि. ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत.

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयात साहाय्यक कामगार आयुक्तांच्या ३३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in  अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१६.

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनतर्फे ४१२२ अधिकाऱ्यांची भरती –

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनतर्फे विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अधिकारी पदावर निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवड परीक्षेअंतर्गत अधिकाऱ्यांच्या ४१२२ जागाभरावयाच्या आहेत. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९ ते २५ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ibps.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळाला अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१६.

एल अ‍ॅण्ड टी बिल्ड – इंडिया स्कॉलरशिप

आयआयटी – मद्रास/दिल्ली/एनआयटी – तिरुचिरापल्ली/कर्नाटक येथे जुल, २०१७मध्ये सुरू होणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट’ विषयात ‘एम.टेक.’ कोर्स करण्यासाठी.

पात्रता – १) सिव्हिल/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २०१७ मध्ये पास. २) दहावी/बारावीला किमान ६०% गुण/सीजीपीएप्रमाणे ६.५० गुण स्केल १० वर. ३) बी.ई./बी.टेक. किमान ६०% गुणांसह किंवा सीजीपीए ६.७५ स्केल १० वर.

वय – दि. १ जुल २०१७ रोजी २३ वष्रेपर्यंत, उंची – १६० सें.मी., वजन – किमान ५० किलो.

स्टायपेंड दरमहा रु. १३,४००/- आयआयटी/एनआयटीसाठी स्कॉलरशीप आणि टय़ूशन फी. २४ महिने कालावधीचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास उमेदवारांना लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कन्स्ट्रक्शन कंपनीत ६ लाख रुपये वेतन दरमहा.

ऑनलाइन अर्ज http://www.lntecc.com वर दि. ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत.