News Flash

नोकरीची संधी

अर्जदार कायदा विषयातील पदवीधर असावेत व त्यांना न्यायदान क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असायला हवा.

*   गुजरात उच्च न्यायालयांतर्गत दिवाणी न्यायाधीशांच्या ११२ जागा-

अर्जदार कायदा विषयातील पदवीधर असावेत व त्यांना न्यायदान क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ डिसेंबर २०१६ च्या अंकातील गुजरात उच्च न्यायालयाची जाहिरात पाहावी अथवा गुजरात उच्च न्यायालयाच्याhttp://gujarathighcourt.nic.in अथवा http://hc-ojas.guj.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१६.

*   नॉर्दन कोलफिल्ड्समध्ये ज्युनिअर ओव्हरमनच्या १९७ जागा-

उमेदवारांनी माइनिंग विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व ते ओव्हरमन विषयक पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ ते ११ नोव्हेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नॉर्दन कोलफिल्ड्सची जाहिरात पाहावी अथवा www.nclcil.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर (पी-एमपी अ‍ॅण्ड रिक्रुटमेंट) नॉर्दन कोल्डफिल्ड्स लि., सिंगरोली (मध्य प्रदेश) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१६.

*  आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून संधी-

अर्जदार पदव्युत्तर पात्रताधारक व पर्सोनेल मॅनेजमेंट, ह्य़ुमन रिसोर्सेस, कायदा यासारख्या विषयातील पात्रताधारक असावेत. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा १२ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ४५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ नोव्हेंबर २०१६च्या अंकातील आघारकर संशोधन संस्था, पुणेची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या http://www.aripune.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज संचालक, आघारकर संशोधन संस्था, जी. जी. आगरकर मार्ग, पुणे- ४११००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१६.

*   भारत इलेक्ट्रॉनिक्स, बंगलोर येथे डेप्युटी इंजिनीअरच्या ३ जागा-

उमदेवार माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ डिसेंबर २०१६ च्या अंकातील प्रकाशित झालेली भारत इलेक्ट्रॉनिक्सची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज दि मॅनेजर (एचआर/ टी अ‍ॅण्ड बीएस), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहाली पोस्ट, बंगलोर ५६००१३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१६.

*   पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये एक्झिक्युटिव्ह (फायनान्स)च्या २२ जागा-

उमेदवारांनी सीए, आयसीडब्ल्यूए यासारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ डिसेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.powergridindia.com ¹ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१६.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:01 am

Web Title: job opportunities 47
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा भाग – २
2 वेगळय़ा वाटा : करिअरचा ‘जपानी’ मार्ग
3 करिअरमंत्र
Just Now!
X