*  भारतीय प्लायवूड संशोधन संस्था, बंगलोर येथे स्टेनोग्राफर्सच्या २ जागा-

अर्जदार बारावी उत्तीर्ण व लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट तर इंग्रजी ट्रान्सक्रिप्शनची ५० शब्द प्रतिमिनिट तर हिंदी ट्रान्सक्रिप्शनची ६५ शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय प्लायवूड संशोधन संस्था, बंगलोरची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या http://www.ipirti.gov.in ¹या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज इंडियन प्लायवूड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, एचएमटी लिंक रोड, तुमकर रोड, यशवंतपूर पोस्ट, बंगलोर ५६००२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०१७.

Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…
cetcell latest marathi news, pune cetcell fee, one thousand fee cet cell marathi news
सीईटी सेलचा मोठा निर्णय : उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी एक हजार रुपये शुल्क

*  संरक्षण मंत्रालयांतर्गत स्टेशन वर्कशॉप, ईएमई, बंगलोर येथे ट्रेडमनच्या ८ जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ डिसेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली स्टेशन वर्कशॉप, बंगलोरची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडिंग ऑफिसर, स्टेशन वर्कशॉप ईएमई, अग्राम पोस्ट, बंगलोर- ५६०००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०१७.

*  डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणे येथे प्रोजेक्ट असिस्टंट पदासाठी थेट मुलाखत-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ डिसेंबर २०१६ या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणेची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिीटय़ूटच्या http://diat.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व संबंधित कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, गिरिनगर, पुणे- ४११०२५ येथे ४ जानेवारी २०१७ रोजी सकाळी १० वाजता.

*  संरक्षण मंत्रालयांतर्गत सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंटमध्ये मुंबई येथे खेळाडूंना कनिष्ठ कारकून म्हणून संधी-

अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदूी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत व त्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंटची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एसक्यूएक्यू, सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट (जीएस) डीजीक्यूए कॉम्प्लेक्स, लालबहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई- ४०००८३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०१७.

* मध्य रेल्वेअंतर्गत मुंबई येथे सांस्कृतिक कलाकारांना संधी-

उमेदवार बारावी उत्तीर्ण व संगीत-कला विषयक पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २९ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ डिसेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वे मुंबईची जाहिरात पाहावी अथवा मध्य रेल्वेच्या http://www.rrccr.comया संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०१७.