मिश्र धातू निगममध्ये ज्युनिअर सिक्युरिटी इन्स्पेक्टरच्या ४ जागा-

वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी मिधानीच्या http://www.midhani.com या संकेतस्थळाला भेट द्या.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०१७.

सी-डॅक, पुणे येथे अभियंता व साहाय्यक म्हणून संधी-

अधिक माहितीसाठी सी-डॅकच्या https://cdac.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज प्रगत संगणक विकास केंद्र, (सी-डॅक), पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड, पुणे- ४११००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०१७.

जनकल्याण सहकारी बँक, मुंबई येथे व्यवस्थापकपदाच्या विविध संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी जनकल्याण सहकारी बँकेच्या  www.jksbl.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०१७.

 

टीएचडीसी इंडिया लिमिटेडमध्ये प्रशिक्षार्थी पदविका इंजिनीअर्ससाठी संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली टीएचडीसी इंडिया लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.thdc.co.in/ या संकेतस्थळावरील रिक्रूटमेंट विभागाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१७.

संरक्षण मंत्रालयांतर्गत सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट, मुंबई येथे कर्मचारी म्हणून संधी-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमून्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एसक्यूएक्स सीनिअर क्वालिटी अ‍ॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट (जीएस), डीजीक्यूए कॉम्प्लेक्स, लालबहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई- ४०००८३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१७.

भारतीय वायुदलात स्टोअर्स कीपर म्हणून संधी-

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावे. स्टोअर्ससह अकाउंट्सविषयक अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमून्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज

कमांडिंग ऑफिसर, टेट्रा एअर फोर्स स्टेशन, बराकपूर (प. बंगाल) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१७.

पुणे महानगर परिवहन महामंडळात बदली कंडक्टर ४९०० जागा, बदली ड्रायव्हर २४४० जागा व बदली क्लीनर ७००  जागा अशा मोठय़ा संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MaharecruitmentMainPage.aspx   या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०१७.

सशस्त्र सीमा बलामध्ये हेड कॉन्स्टेबलच्या ३७४ जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक अथवा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रासह बारावी उत्तीर्ण आणि शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत. वयोमर्यादा २३ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा बलाची जाहिरात पाहावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज इन्स्पेक्टर जनरल, फ्रंटियर हेडक्वार्टर्स सीमा सुरक्षा बल, गानियादेवली, रानीखेत, जि. अल्मोरा २६३६४५ (उत्तराखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१७.