14 November 2019

News Flash

नोकरीची संधी

संशोधकांच्या आणि अभियंत्यांच्या ‘एससी’च्या ३७५ पदांची भरती करण्यात येत आहे

इस्रोमध्ये संशोधकांची पदे
संशोधकांच्या आणि अभियंत्यांच्या ‘एससी’च्या ३७५ पदांची भरती करण्यात येत आहे- इलेक्ट्रॉनिक्स- २१६ पदे. मेकॅनिकल- १०९ पदे. कॉम्प्युटर सायन्स- ५० पदे.
वेतनश्रेणी : पे बँड रु. १५६०० – ३९१०० + ग्रेड पे रु. ५४०० किमान वेतन- रु. ६०७५० पात्रता- बी. ई./बी.टेक किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (सीजीपीए ६.८४) अंतिम परीक्षेस बसलेले विद्यार्थीसुद्धा पात्र आहेत.
वयोमर्यादा : २५ मे २०१६ रोजी ३५ वष्रे.
निवड पद्धती : लेखी परीक्षा आणि मुलाखत. लेखी परीक्षा ३ जुल २०१६ रोजी होईल.
अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.isro.gov.in या संकेतस्थळावर २५ मे २०१६ पर्यंत करावा.

मुंबई विद्यापीठात स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षणवर्ग
bमुंबई विद्यापीठ प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमीची स्थापना २००३ साली झाली. याअंतर्गत यूपीएससी/ एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी ८० उमेदवारांना प्रवेश
दिला जातो.
पात्रता : पदवी उत्तीर्ण. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात सहभागी होण्यासाठी प्रवेश परीक्षा अर्ज २९ जून २०१६ पर्यंत भरावेत.
संपर्क : प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमी, मुंबई विद्यापीठ, जे.पी. नाईक भवन, पहिला मजला, खोली क्र. ४, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई- ४०००९८. वेळ सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत.
संकेतस्थळ : www.mu.ac.in / faculty / others /aas / profile html.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी भरती
केंद्र सरकारच्या या अंगीकृत उपक्रमात
१२८ प्रशिक्षणार्थीची भरती करण्यात येत आहे.
अ) स्टायपेंडरी ट्रेनी / सायन्टिफिक असिस्टंट (एसटी/एसए) प्रवर्ग-क- डिप्लोमा इंजिनीयर इलेक्ट्रिकल- ९ पदे. मेकॅनिकल- १३ पदे. केमिकल- ६ पदे. इलेक्ट्रॉनिक्स- ८ पद. पात्रता- संबंधित अभियांत्रिकी पदविका किमान ६० गुणांसह उत्तीर्ण.
ब) एसटी/एस ए – प्रवर्ग क – बीएस्सी फिजिक्स- ९ पदे. केमिस्ट्री- ७ पदे. पात्रता- किमान ६० गुणांसह बीएस्सी फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा पीसीएम या विषयांसह उत्तीर्ण.
क) स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन (एसटी/टीएम) प्रवर्ग कक – प्लँट ऑपरेटर- २६ जागा. पात्रता- बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण (विज्ञान व गणित या विषयांत प्रत्येकी ५० गुण).
(ड) एसटी/टीएम प्रवर्ग- कक मेंटेनर : इलेक्ट्रिशियन- ८ पदे. इन्स्ट्रमेंट मेकॅनिक- ८ पदे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- ४ पदे. फिटर- २८ पदे. वेल्डर – ४ पदे. पात्रता- दहावी उत्तीर्ण विज्ञान व गणित विषयांत किमान ५० गुण प्रत्येकी + संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण.
वयोमर्यादा- ४ जून २०१६ रोजी प्रवर्ग ‘अ’ आणि ‘ब’साठी- १८-२५ वष्रे, प्रवर्ग- क व ड साठी १८-२४ वष्रे. उच्चतम वयोमर्यादेत सवलत (अजा/अज- ५ वष्रे, इमाव- ३ वष्रे) अंतिम परीक्षेस बसलेले ज्यांचा निकाल ४ जून २०१६ पूर्वी जाहीर होईल असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र.
विद्यावेतन दरमहा रु. ९३०० ‘क’ आणि ‘ड’साठी प्रशिक्षण कालावधी- २ वष्रे. विद्यावेतन दरमहा रु. ६२०० (पहिले वर्ष) आणि दरमहा रु. ७२००(दुसरे वर्ष) प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास प्रवर्ग- ‘क’मधील उमेदवारांना सायंटिफिक असिस्टंट / ‘बी’ या पदावर नेमणूक (पे बँड -२ : रु. ९३००-३४८०० + ग्रेड पे रु. ४२००, प्रवर्ग- कक उमेदवारांना टेक्निशियन/बी या पदावर नेमणूक (पे बँड – १ : रु. ५२००-२०२०० + ग्रेड पे रु. २०००) सविस्तर माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’चा ७ मे २०१६ चा अंक पाहावा किंवा संकेतस्थळावरून डाऊनलोड करून भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतींसह वरील पत्त्यावर ४ जून २०१६ पर्यंत पोहोचतील असे टपालाने पाठवावेत.
पत्ता- काक्रापार गुजरात साइट, पो. अनुमला, तापी, गुजरात पिन- ३९४ ६५१.

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे स्टेनोग्राफर परीक्षा
cस्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे ३१ जुल २०१६ रोजी केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील स्टेनोग्राफर पदांच्या भरतीसाठी स्टेनोग्राफर्स (ग्रेड ‘सी’ आणि ग्रेड ‘डी’) परीक्षा- २०१६ घेण्यात येणार आहे.
पात्रता : किमान बारावी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : १८ ते २७ वष्रे. उच्चतम वयोमर्यादा अजा/अज- ५ वर्षांनी, इमाव- ३ वर्षांनी (स्टेनो ग्रुप डीसाठी परित्यक्ता /विधवा अराखीव ८ वष्रे + इमाव – ११ वष्रे + अजा /अज- १३ वष्रे शिथिलक्षम.
निवड पद्धती : १. लेखी परीक्षा- वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाची सामान्य बुद्धिमत्ता- ५० गुण, सामान्य आकलन (जनरल अवेअरनेस)- ५० गुण आणि इंग्रजी भाषा आणि तिची व्याप्ती-१०० गुण. एकूण २०० गुण. कालावधी- २ तास.
२. स्किल टेस्ट इन स्टेनोग्राफी लेखी परीक्षेत किमान पात्रतेचे गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना कौशल्य चाचणी द्यावी लागेल, जी फक्त अर्हतेसाठी असेल. स्टेनोग्राफर ‘ग्रेड सी’साठी १० मिनिटांचे डिक्टेशन १०० श. प्र.मि. या वेगाने दिले जाईल. ट्रान्सक्रिप्शनसाठी वेळ ५० मि.(इंग्रजी), ६५ मि. (हिंदी), स्टेनोग्राफर ‘ग्रेड डी’साठी १० मि.चे डिक्टेशन ८० श.प्र.मि. या वेगाने. ट्रान्सक्रिप्शनसाठी ४० मि. इंग्रजी, ५५ मि. हिंदी. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने ssconline.nic.in या संकेतस्थळावर ३ जून २०१६ पर्यंत करावेत. परीक्षा शुल्क- रु. १०० (महिला/ अजा/ अज/ पीडब्ल्यूडी उमेदवारांना शुल्कमाफ) प्रवेश प्रमाणपत्र आणि इतर शंकांसाठी कमिशनच्या विभागीय कार्यालयात संपर्क साधावा. पत्ता : रिजनल ऑफीसर, स्टाफ सिलेक्शन कमिशन, पहिला मजला, प्रतीक्षा भवन,
मुंबई- ४०००२०.
प्रवेश प्रमाणपत्र हे कमिशनच्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या www.sscwr.net या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे.

‘एमटीएस’च्या ४० पदांची भरती
संरक्षण मंत्रालय, बॉम्बे इंजिनीयर ग्रुप अ‍ॅण्ड सेंटर, खडकी, पुणे- ४११००३ येथे एलडीसी, स्टोअरकीपर, लस्कर, एमटीएसच्या ४० पदांची भरती करण्यात येत आहे.
१. लोअर डिव्हिजन क्लार्क- ४ पदे. पात्रता- बारावी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टंकलेखन ३५ श.प्र.मि. किंवा िहदी टंकलेखन ३० श.प्र.मि.
२. सिव्हिलियन स्टोअरकीपर- ३ पदे. पात्रता – बारावी + १ वर्षांचा अनुभव स्टोअरकीिपग /स्टोअर मॅनेजमेंटमधील प्रमाणपत्र कोर्स.
३. सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर- ७ पदे. पॅटर्न मेकर/ कारपेंटर/ इंजिन आर्टिफिसर/ फिटर/ ऑफसेट िपट्रर/ वेल्डर – पात्रता दहावी + एनसीव्हीटी उत्तीर्ण.
४. लस्कर- ११ पदे. एमटीएस मेसेंजर- ३ पदे. गार्डनर- ६ पदे. वॉटरमन- २ पदे. सफाईवाला- ३ पदे. पात्रता- दहावी उत्तीर्ण. १ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा – १८ ते २५ वष्रे (अजा/अज १८ ते ३० वष्रे, इमाव १८ ते २८ वष्रे).
अर्जाचा नमुना आणि प्रवेशपत्र www.bsakirkee.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह २७ मे २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अधिक माहितीसाठी
७ मेच्या ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मधील जाहिरात पाहावी.

संरक्षण मंत्रालयात ट्रेड्समनची भरती
केंद्र सरकार संरक्षण मंत्रालय, ऑर्डनन्स फॅक्टरी खामारिया, जबलपूर, मध्य प्रदेश- ४८२००५ येथे सेमीस्किल्ड ट्रेड्समनच्या ८५६ पदांची भरती करण्यात येत आहे. पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- डी.बी. वर्कर- ४४८ पदे. मशीनिस्ट- १६४ पदे. एक्झामिनर- ६७ पदे. इलेक्ट्रिशियन – ७३ पदे. मिलराइट- २३ पदे. पेंटर- १० पदे. फिटर- जनरल- २५ पदे. इलेक्ट्रोप्लेटर- ११ पदे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.ordkham.org या संकेतस्थळावर
३० मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

ऑर्डनन्स फॅक्टरी, नालंदा येथे ट्रेड्समनची भरती
ऑर्डनन्स फॅक्टरी, नालंदा येथे सेमीस्किल्ड ट्रेड्समनच्या १२९ पदांची भरती करण्यात येत आहे. १. सीपीडब्ल्यू-३२ पदे. फिटर, वेल्डर, मशीनिस्ट. पात्रता – १) डीबीडब्ल्यू /सीपीडब्ल्यू- अ‍ॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण. एनएसी / एनटीसी खालील ट्रेडमधील- केमिकल प्लान्टमधील अटेंडंट (ऑपरेटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिकल मेंटेनन्स/ लॅबोरेटरी असिस्टंट, फिटर जनरल, मशीनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्री आणि एसी मेकॅनिक आणि इतर पदांसाठी आवश्यक एनएसी/एनसीटी उत्तीर्ण. वयोमर्यादा- १८ ते ३२ वष्रे. परीक्षा शुल्क- रु. ५० (अजा/अज/महिला/ पीडब्ल्यूडी यांना फी माफ).
निवड पद्धती- १०० गुणांची लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) आणि ट्रेड टेस्ट प्रॅक्टिकल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.ofb.gov.in या संकेतस्थळावर ३० मे २०१६ पर्यंत पाठवावेत.
ऑनलाइन अर्जाची पिंट्र आऊट पोस्ट बॉक्स क्र. २०९१, अदयार पोस्ट ऑफिस, चेन्नई या पत्त्यावर
४ जून २०१६ पर्यंत पोहोचेल अशी पाठवावी.

इंडियन ऑइलमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या ७० जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २५ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये अनुभवी केमिकल अभियंत्यांना संधी
उमेदवारांनी केमिकल अभियांत्रिकीमधील पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा ३ ते १२ वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या www.bharatpetroleum.com> Careens Link> Current openingsया संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २६ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

युनायटेड इंडिया विमा कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ३०० जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.uiic.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २७ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथे फार्मासिस्टच्या २ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण व त्यानंतर फार्मसी विषयातील पदविका उत्तीर्ण असावेत. त्यांनी फार्मसी विषयातील तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.barc.gov.in किंवा www.barcrecruit.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर २७ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागात विकास अधिकाऱ्यांच्या जागा
विकास अधिकाऱ्यांच्या २०० जागा भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी socialwelfare maharashtra.org संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २८ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन- इंडिया, अहमदाबाद येथे फेलोशिप
याअंतर्गत २५ फेलोशिप्स देण्यात येणार आहेत. उमेदवार विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, जैवशास्त्र, कृषी विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, जन-संवाद यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. वयोमर्यादा
३५ वर्षे. अधिक माहितीसाठी www.nif.org.in/join-४२ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज दि एक्झीक्युटिव्ह व्हाइस चेअरपर्सन, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन-इंडिया, सॅटेलाइट कॉम्प्लेक्स, जोधपूर टेकरा, प्रेमचंद नगर, वस्त्रपूर, अहमदाबाद ३८००१५ या पत्त्यावर
२७ मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

eआयुध निर्माणी, जबलपूर येथे कुशल कामगारांच्या १०० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रता त्यांनी प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.ordkham.org किंवा www.ofb.gov.in संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर २८ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

आर्मड् फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपो, मुंबई येथे स्टोअरकीपरच्या ५ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात बघावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि कमांडंट, आर्मड् फोर्सेस मेडिकल स्टोर्स डेपो, आकुर्ली क्रॉस रोड नं. ३, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ या पत्त्यावर
२६ मे २०१६ पर्यंत पाठवावेत. ल्ल

एमएस्सी (हॉस्पिटॅलिटी) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन : प्रवेश पात्रता परीक्षा
fनॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजीद्वारा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या एमए इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेश
देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येते. यंदाच्या प्रवेश परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू
झाली आहे.
शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयातील बीएस्सी पदवी अथवा हॉटेल मॅनेजमेंटमधील पात्रता पूर्ण केलेली असावी अथवा ते वरील पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवडपरीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर
१८ जून २०१६ रोजी घेण्यात येईल.
उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. ल्ल

अर्जासह भरायचे शुल्क
अर्जासह भरायचे शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गातील अर्जदारांनी ९०० रु. (राखीव गटातील अर्जदारांनी ४५० रु.) संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी काउन्सिलच्या www.thims.gov.in अथवा www.nchm.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २७ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पदविका अभ्यासक्रम
gनवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या तीन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रमाचे माध्यम : वरील अभ्यासक्रम इंग्रजी व हिंदी या दोन्ही माध्यमांत उपलब्ध आहे.
आवश्यक अर्हता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी किमान
६ नाटय़प्रयोगांमध्ये भाग घेतलेला असावा. त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमदेवारांना प्राथमिक निवड चाचणी, अभिनय क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलावून त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रदेश देण्यात येईल. वरील चाचण्या देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येतील व त्यामध्ये मुंबई केंद्राचा समावेश आहे. मुंबई केंद्रावरील चाचणी २५ ते २६ जून २०१६ दरम्यान घेण्यात येईल.
आर्थिक साहाय्य- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीत दरमहा ६०० रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येईल. ल्ल

अर्ज व माहितीपत्रक– प्रवेश अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास २२५ रु.
‘दि डायरेक्टर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली’ यांच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.nsd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
अर्ज पाठविण्याची मुदत
अर्ज ‘डीन अ‍ॅकॅडेमिक्स, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, भवालपूर हाउस, भगवानदास रोड, नवी दिल्ली- ११०००१’ या पत्त्यावर ३० मे २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अ‍ॅकेडमी ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्चचे अभ्यासक्रम
hकौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अ‍ॅकेडमी ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इनोव्हेशन रिसर्च येथे एमएस्सी- पीएच.डी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-
* विज्ञान विषयातील पीएच.डी : समाविष्ट विषय- बायोलॉजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस व मॅथेमॅटिकल आणि
इन्फर्मेशन सायन्सेस.
* अभियांत्रिकीतील पीएच.डी : समाविष्ट विषय- इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान अंतर्गत विविध विषय.
* एकात्मिक स्वरूपाचा एमएस्सी- पीएच.डी अभ्यासक्रम : सेंट्रल फूड टेस्टिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, म्हैसूर.
* विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयातील पीएच.डी : अर्जदार संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत.
* न्युट्रिशिनल बायोलॉजी विषयातील एमएस्सी – पीएच.डी एकात्मिक अभ्यासक्रम : अर्जदारांनी फूड टेक्नॉलॉजी अथवा संबंधित विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदारांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. त्यांना संशोधनपर विषयात रुची असावी. संगणकाचे अद्ययावत ज्ञान आवश्यक आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना कल चाचणी स्वरूपातील निवड
परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. त्यामध्ये निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी अ‍ॅकेडमीच्या acsir.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २६ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीचा बी. टेक. अभ्यासक्रम
kबारावी (१०+२) विज्ञान पीसीएम विषयांसह उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी येथे बी. टेक्साठी प्रवेश देण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप : भारतीय नौदलातर्फे १०+२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी. टेक कॅडेट एन्ट्री स्कीम हा चार वर्षांचा बी. टेक डिग्री अभ्यासक्रम जानेवारी २०१७ पासून सुरू होणार आहे.
निवड प्रक्रिया : बारावी (पीसीएम) मधील गुण किंवा जेईई (मेन) मधील रँकनुसार एसएसबीसाठी उमेदवारांची निवड होईल.
अर्ज करताना उमेदवार दोघांमधील वरील एका पर्यायाची निवड करू शकतात. दोन्ही पर्यायांमधून समसमान उमेदवार एसएसबीसाठी निवडले जातील. एसएसबीतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
जर कोणी उमेदवाराने दोन्ही पर्याय निवडून अर्ज केले तर त्याला परीक्षेतून बाद ठरवले जाईल.
अधिक माहिती : अभ्यासक्रमाबाबतच्या अधिक माहितीसाठी www.joinindiannavy.gov.in संकेतस्थळाला भेट द्या. अर्ज ऑनलाइन पद्धतीने २७ मे २०१६ पर्यंत करावेत.

सुहास पाटील, द. वा. आंबुलकर

First Published on May 23, 2016 1:02 am

Web Title: job opportunities 6