’  सेना दल आरोग्य सेवेअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे पुणे व इतरत्र संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी

सेना दलाच्या एएफएमएसच्या http://www.afmcdg1d.gov.in/

या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.

महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन अंतर्गत पुणे नागपूर येथे सीनिअर ऑफिस असिस्टंट (एचआर) च्या ४ जागा– अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र मेट्रोच्या http://www.metrorailnagpur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज जॉइंट जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो हाउस, २८/२, सी. के. नायडू मार्ग, आनंदनगर, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.

*  ललित कला अकादमीमध्ये सुपरवायझर्सच्या ७ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ललित कला अकादमीची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या http://www.lalitkala.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.

*  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबई येथे प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या जागा-

अर्जदारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केली असावी व त्यांनी जीएटीई- २०१७ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली माझगाव डॉक शिपबिल्डर्सची जाहिरात पाहावी अथवा http://www.mazdock.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.

*  नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कं. लिमिटेडला मुंबई येथे कंपनी सचिवाची आवश्यकता-

अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टीच्या   http://www.ncgtc.in/

या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लि. एमएसएमई डेव्हल्पमेंट सेंटर, दुसरा मजला, सी- ११, जी- ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.

*  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. बंगलोर येथे मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) च्या ७५ जागा-

अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय जीएटीई- २०१७ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या http://www.hal-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.

*   भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित (भारत सरकारचा उपक्रम) मरिन ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, पवई, मुंबई येथे ‘ग्रॅज्युएट मरिन इंजिनीयर’ ४० उमेदवारांच्या मार्च २०१७ बॅचकरिता ८ महिन्यांचे शोअर बेस्ड ट्रेिनग.

त्यानंतर ६+४ महिन्यांचे बोर्ड ट्रेिनग दिले जाईल.

पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदवी ऑनलाइन अर्ज http://www.shipindia.com / या संकेतस्थळावर ूंcareers/fleetpersonnel ’ या विभागात  दि. ६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.

*  इंडियन आर्मीमध्ये एनसीसी विशेष भरती योजना

एनसीसी – पुरुष – ५० पदे. एनसीसी – महिला – ४ पदे. पात्रता – किमान ५०% गुणांसह पदवी (कोणत्याही शाखेतील). पदवीच्या अंतिम वर्षांतील उमेदवार पात्र  एनसीसीमध्ये बी ग्रेड सर्टििफकेट  २ वर्षांचे ट्रेिनग. वयोमर्यादा – १९ ते २५ वष्रे. (उमेदवाराचा जन्म २ जुल १९९२ ते

१ जुल १९९८ दरम्यानचा असावा.)

उंची – पुरुष – १५७.५ सें.मी.,

महिला – १५२ सें.मी.

शारीरिक क्षमता – (१) २.४ कि.मी. १५ मिनिटांत धावणे, (२) २५ सीटअप्स, (ग्ग्ग्) १३ पुशअप्स, (ग्न्) ६ चिनअप्स, (न्) ३-४ मीटर दोरावर चढणे. निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणांनुसार एसएसबी मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील. उमेदवारांनी एसएसबी सिलेक्शन सेंटर यापकी एक निवडावे. अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर,

कापुरथाला (पंजाब).

ट्रेिनग – स्टायपेंड रु. २१,०००/- दरमहा. ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवडय़ांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लेफ्टनंट पदावर नियुक्ती १० वर्षांसाठी. ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी.

ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in

या संकेत स्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०१७ (सकाळी १०.00) पर्यंत करावेत.

वेतन – रु. ८०,०००/- सीटीसी. आर्मी ग्रुप इन्शुरन्स रु. ७५लाख.

संपर्कासाठी दूरध्वनी –

०११-२६१७३२१५ (वेळ दु. २ ते ५)