माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई आपल्या विविध विभागांतील कुशल व अर्ध-कुशल तांत्रिक कर्मचारी या एकूण १०४० पदांसाठी दोन र्वष कालावधीकरिता करारावर भरती.

कुशल श्रेणी-१ (१) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (३३६ पदे), (२) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) (३४ पदे), (३) पाइप फिटर (८७ पदे), (४) फिटर (६९ पदे), (५) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (४२पदे), (६) इलेक्ट्रिशियन (३४ पदे), (७) कॉम्पोझिट वेल्डर (९० पदे), (८) रिगर (९४ पदे) इ.

पात्रता – संबंधित ट्रेडमधील नॅशनल अप्रेंटिसशिप परीक्षा उत्तीर्ण.

(९) ज्युनियर प्लॅनर एस्टीमेटर (मेकॅनिकल – २० पदे) (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स – १८ पदे) पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका किमान ५५ % गुणांसह किंवा पास क्लासमधील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.

(१०) ज्युनियर क्युसी निरीक्षक – (२८पदे) पात्रता – मेकॅनिकल/मरिन विषयांतील पदविका किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.

(११) स्टोअर किपर (२५ पदे) पात्रता – इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, कॉम्प्युटर इ. मधील अभियांत्रिकी पदविका.

(२) अकुशल लस्कर (१० पदे), फायर फायटर (२३ पदे), युटिलिटी हँड (३४ पदे), चिपर ग्राइंडर (२४ पदे.) पात्रता – संबंधित विषयांतील एनएसी प्रमाणपत्र उत्तीर्ण. वयोमर्यादा – १८ ते ३३ वष्रे (इमाव – ३६ वष्रे, अजा/अज – ३८ वष्रे). ओएच/एचएच विकलांगांसाठी २१ जागा राखीव. अर्जाचा विहित नमुना http://www.mazdock.com//  या संकेतस्थळावरून ‘करिअर नॉन-एक्झिक्युटिव्ह’ लिंकमधून डाऊनलोड करता येईल. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. ९ फेब्रुवारी २०१७.

देशभरातील आयुध निर्माण कारखान्यात (ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये) प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदांच्या एकूण ७०४८ पदांची भरती.

<(१) अटेंडंट ऑपरेटर, (२) इलेक्ट्रिशियन, (३) फिटर, (४) मशिनिस्ट, (५) टर्नर, (६) मेकॅनिकल मेंटेनन्स केमिकल प्लँट >

(१) अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी, पुणे (५०५ पदे), (२) हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी, पुणे (७३पदे), (३) मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ, ठाणे (४८ पदे), (४) ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ (२३० पदे), (५) ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर (४६३ पदे), (६) ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा (२६० पदे), (७) ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ (४३ पदे), (८) ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा (२६९ पदे), (९) ऑर्डनन्स फॅक्टरी, देहू रोड, पुणे (१२० पदे), (१०) ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव (१७५ पदे)

पात्रता – आयटीआय कॅटेगरीसाठी संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण.  नॉन-आयटीआय कॅटेगरीसाठी १० वी किमान ४०% गुणांसह उत्तीर्ण. (गणित/विज्ञानात प्रत्येकी किमान ४०% गुण आवश्यक) वयोमर्यादा – १४ ते २२ वष्रे (इमाव – २५वष्रे, अजा/अज – २७ वष्रे.) परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, नागपूर. कोणतेही परीक्षा शुल्क नाही. ऑनलाइन अर्ज <http://www.ofb.gov.in/>   या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.