भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये प्रशिक्षार्थी इंजिनीअर्सच्या संधी-

अर्जदारांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग वा केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी जीएटीई- २०१७ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

अधिक माहितीसाठी भारत पेट्रोलियमच्या कॉर्पोरेशनच्या https://bharatpetroleum.com/Careers/Current-Openings.aspx   या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थाळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१७.

नॅशनल केमिकल लेबॉरेटरी, पुणे येथे केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची फेलोशिप-

अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल केमिकल लेबॉरेटरी, पुणेच्या http://www.venturecenter.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा एनसीएलच्या ०२०- २५८६५८७५ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल केमिकल लेबॉरेटरी, एनसीएल इनोव्हेशन पार्क, पाषाण रोड, पुणे या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१७.

भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये ऑपरेटर्सच्या   ७० जागा-

अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित व विज्ञान विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांनी गणित व विज्ञान विषयांसह उत्तीर्ण केल्यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१ ते २७ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नाभिकीय विद्युत निगमची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर मॅनेजर (एचआर), भारतीय नाभिकीय विद्युत निगम, प्रोजेक्ट बिल्डिंग, कलपक्कम ६०३१०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१७.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मुंबई अंतर्गत अधिकारीपदावर इंजिनीअर्ससाठी संधी-

अर्जदारांनी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन, इन्स्ट्रमेन्टेशन अथवा केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व जीएटीई- २०१७ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूज च्या २४ ते ३० सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी. अथवा एचपीसीएलच्या www.hindustanpetroleum.co या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१७.