• कॉलेज ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, जबलपूर येथे संदेशवाहकांच्या १० जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली कॉलेज ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंट, जबलपूरची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि कमांडंट कॉलेज ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंट, जबलपूर- ४८२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१७.

  • राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स, मुंबई येथे सीनिअर मॅनेजर्सच्या जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकातील राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्सची जाहिरात पहावी अथवा आरसीएफच्या http://www.rcfltd.com/index.php/en/hr/recruitment या संकेत स्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज सीजीएम (एचआर), राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, मुंबई- ४०००७४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१७.

  • ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ऋषिकेश येथे सीनिअर रेसिडेंटच्या ८९ जागा-

अर्जदार एमडी, एमएस, डीएनबी पात्रताधारक असावेत. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.aiimsrishikesh.edu.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१७.

  • दूरसंचार विभाग- चेन्नई अंतर्गत कनिष्ठ कारकुनांच्या २० जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली दूरसंचार विभाग, चेन्नईची जाहिरात पहावी अथवा दूरसंचार विभागाच्या http://www.ccatn.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०१७.

  • डीआरडीओ अंतर्गत हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लेबॉटरी, पुणे येथे रिसर्च असोसिएट म्हणून संधी-

उमेदवारांनी पॉलिमर/ ऑर्गेनिक केमिस्ट्रीमधील एमएससी/ पीएचडी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित विषयातील संशोधनपर कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली डीआरडीओची जाहिरात पहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या इंडियन पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज डायरेक्टर, हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लेबॉरेटरी, डीआरडीओ- सुतारवाडी, पुणे- ४११०२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०१७.

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर येथे सीनिअर असिस्टंट कॅन्टीन ऑफिसरच्या २ जागा-

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी कॅटरिंग टेक्नॉलॉजी विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा ४० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकातील भारत इलेक्ट्रॉनिक्सची जाहिरात पहावी अथवा बीईएलच्या bel-india.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी मॅनेजर (एचआर/ ए अ‍ॅण्ड एफ) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., जलहल्ली पोस्ट, बंगलोर- ५६००१३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०१७.

  • आयडीबीआय बँकेत अधिकारी पदाच्या विविध संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली आयडीबीआय बँकेची जाहिरात पहावी अथवा बँकेच्या https://www.idbi.com:8443/index.asp संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१७.