केरळच्या तिरुअनंतरपुरम येथील एनसीईएसएस संस्थेत सायंटिफिक असिस्टंट ग्रेड ‘ए’ आठ पदांची भरती करण्यात येणार आहे. अर्हता-ो भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र यांपकी कोणत्याही एका विषयातील प्रथम वर्गातील पदवी किंवा अभियांत्रिकीमधील पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. * संगणकाचे कामचलाऊ ज्ञान. जिओग्राफिकल सामग्री आणि विश्लेषणात्मक सामग्री (उदा. एक्सआरडी/ एसईएम) हाताळण्याचा अनुभव.
* वय- २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे (अजा/ अज- ३३ वष्रे, इमाव- ३१ वष्रे). पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे निवडले जाईल. अर्ज ऑनलाइन पद्धतीने http://www.ncess.gov.in या संकेतस्थळावर १७ जून २०१६ पर्यंत करावेत.

पश्चिम रेल्वेमध्ये ग्रुप ‘डी’ पदांवर कार्यरत असलेल्या पदवीधरांसाठी संधी
* साहाय्यक स्टे.शन मास्टर- २१७ पदे.* गुडस् गार्ड- १७१ पदे. (थेट भरती. कोटय़ामधील रिक्त पदांच्या २५ टक्के जागा पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव.) पात्रता- * पे बँड – १ मधील ग्रेड पे १८००, १९००, २०००, २४०० च्या पदावर नियमित कार्यरत.* पदवी उत्तीर्ण. * वयोमर्यादा- १ जुल २०१६ रोजी ४२ वष्रे (अजा-अज – ४७ वष्रे, इमाव- ४५ वष्रे). पश्चिम रेल्वेतील पात्र कर्मचारी ऑनलाइन पद्धतीने http://www.rrc-wr.comया संकेतस्थळावर ६ जून २०१६ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या अर्जाच्या किमान तीन पिंट्रआऊटस् काढून घ्याव्यात. पिंट्रआऊटवर ठरलेल्या जागी निशाणी डावा अंगठा लावावा आणि दिलेला परिच्छेद दिलेल्या जागेत स्व-हस्ताक्षरात लिहून काढावा. अर्जाच्या दोन प्रतींसह पुढील प्रमाणपत्रांच्या प्रती जोडून आपल्या कंट्रोलिंग ऑफिसरकडे १० जून २०१६ पर्यंत सादर करावा- वयाचा दाखला/ दहावी प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेसंबंधित प्रमाणपत्रे/ गुणपत्रके, जातीचा दाखला (अजा/ अज/ इमावसाठी) उमेदवारांनी अर्जात दोन्ही पदांचा पसंतीक्रम द्यावा. दोन्ही पदांसाठी एकच परीक्षा होईल. लेखी परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने होईल. उमेदवारांना याबद्दल आरआरसीच्या संकेतस्थळावर सूचित केले जाईल. उमेदवारांनी नियमित http://www.rrc-wr.com या संकेतस्थळाचे अवलोकन करावे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल ज्यात सामान्य ज्ञान, अंकगणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि कारणे यांवर आधारित प्रश्न १०० गुणांसाठी असतील. कालावधी- ९० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/३ गुण वजा केले जातील.
गुणवत्तेनुसार असि. स्टेशन मास्टरच्या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट द्यावी लागेल. ज्याची सविस्तर माहिती आरडीएसओच्या http://www.rdso.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बारावी (विज्ञान) उत्तीर्ण उमेदवारांना सन्यदलात अभियंता होण्याची संधी
जानेवारी २०१७ बॅचकरता भारतीय सन्यदलात
१० + २ टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स- * पात्रता- १० + २ परीक्षा पीसीएम विषयांत ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण. * वयोमर्यादा- १ जानेवारी २०१७ रोजी १६ १/२ – १९ १/२ वष्रे. उमेदवाराचा जन्म १ जुल १९९७ – १ जुल २००० दरम्यान.* एकूण जागा- ९०. फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र आहेत.* प्रशिक्षण- ४ वर्षांचे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग (१ वर्ष ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी गया येथे; टेक्निकल ट्रेनिंग ३ वष्रे सीएमई, पुणे येथे किंवा एमसीटीई किंवा एमसीईएमई) १ वर्ष पोस्ट कमिशिनग ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास उमेदवाराला अभियांत्रिकी पदवी प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षणाचा पूर्ण खर्च भारतीय
सन्यदल करते. ३ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना स्टायपेंड रु. २१ हजार दिले जातील. चौथ्या वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना लेफ्टनंट रँकवर नियुक्त केले जाईल आणि त्यांना पूर्ण वेतन देय असेल. वेतन- रु. ६५ हजार सीटीसी
प्रति माह.
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ३० जून २०१६ पर्यंत करावेत.

सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (ट्रेडस्मन) (मेट)च्या ५६१ पदांची भरती.
राज्यातील उमेदवारांसाठी ५२ पदे उपलब्ध आहेत. कॉब्लर- ६, टेलर- ३, न्हावी- ४, धोबी- ४, वॉटर कॅरीअर- ५, कुक- १३, पेंटर- १, सफाईवाला- १४, वेटर- २, कारपेंटर- १.* वयोमर्यादा- १ ऑगस्ट २०१६ रोजी
१८ ते २३ वष्रे (अजा/अज/१८ ते २८ वष्रे, इमाव- १८ ते २६ वष्रे). * शैक्षणिक अर्हता- दहावी उत्तीर्ण. २ वर्षांचा संबंधित कामांचा अनुभव किंवा १ वर्षांचा आयटीआय कोर्स + १ वर्षांचा अनुभव किंवा दोन वर्षांचा आयटीआय कोर्स. * शारीरिक मापदंड- उंची : १६७.५ सेंमी (मराठा १६५ सेंमी, अज १६२.५ सेंमी ) छाती : ७८-८३ सेंमी (अज- ७६-८१सेंमी).
* निवड पद्धती- शारीरिक मापदंड मोजणी, शारीरिक क्षमता चाचणी (५ किमी २४ मिनिटांत धावणे), मूळ कागदपत्र पडताळणी, ट्रेड टेस्ट- (फक्त पात्रता स्वरूपाची), लेखी परीक्षा १०० गुणांची- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा कालावधी- २ तास. यात सामान्य ज्ञान, गणित, विश्लेषणात्मक क्षमता, हिंदी/ इंग्रजी भाषेचे ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न असतील. विहित नमुन्यातील अर्ज आणि अ‍ॅडमिट कार्ड (जे बीएसएफच्या http://www.bsf.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पिंट्र घ्यावी. पूर्ण भरलेला अर्ज आणि अ‍ॅडमिट कार्ड बीएसएफच्या संबंधित आरए/एचक्यूकडे २० जून २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जासोबत अ‍ॅडमिट कार्ड, परीक्षा शुल्क आणि इतर आवश्यक कागदपत्रे पाठवावीत.

ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा महाराष्ट्र येथे कनिष्ठ लिपिकांच्या १४ पदांची भरती.
* वयोमर्यादा- १८-२७ वष्रे (अजा/अज/३२ वष्रे, इमाव ३० वष्रे).* शैक्षणिक पात्रता- बारावी उत्तीर्ण, स्कील टेस्ट संगणकावर ३५ श.प्र.मि. इंग्रजी टायिपग आणि
३० श.प्र.मि. हिंदी टायिपग.* निवड पद्धती- लेखी परीक्षा २०० गुणांची आणि संगणकावर टायिपग टेस्ट (पात्रता स्वरूपाची) लेखी परीक्षेत ५० गुण. सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा, अंकगणित, सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न.* कालावधी- २ तास. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी- ०.२५ गुण वजा केले जातील. अर्ज जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात करावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीनियर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, पोस्ट ऑफिस चंद्रपूर, महाराष्ट्र- ४४२५०१.* अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख- ११ जून २०१६. ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ मे २०१६च्या अंकातील जाहिरात पाहावी.

ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर येथे भरती
याअंतर्गत ‘दरवान’ (२० पदे), कुक (४ पदे), सीएमडी (२ पदे), स्टोअर कीपर (२ पदे) यांची भरती. ‘दरवान’साठी पात्रता- दहावी उत्तीर्ण + शारीरिकदृष्टय़ा सक्षम. वयोमर्यादा- २० ते २७ वष्रे. (अजा/अज- २०-३२ वष्रे, इमाव- २०-३० वष्रे) स्टोअर कीपर पात्रता- बारावी उत्तीर्ण + संगणक अभ्यासक्रम. वयोमर्यादा- २७ वष्रे (अजा/अज ३२ वष्रे, इमाव ३०वष्रे) अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने http://www.ofajadmin.com या संकेतस्थळावर १६ जून २०१६ पर्यंत करावेत.

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये तांत्रिक भरती
आयटीआय/एनसीव्हीटी/अभियांत्रिकी पदविका/ कोणत्याही शाखेची पदवी यांची पदे भरण्यात येत आहेत. आयटीआय/एनसीव्हीटी- शिपराइट फिटर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, सेफ्टी स्टुअर्ड (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशिअन), स्ट्रक्चरल फिटर इ. अभियांत्रिकी पदविका- रेफ्रिजरेटर/एसी मेकॅनिक- ४, शिपबिल्डिंग इंजिनीअर- ७, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी- ३, मेकॅनिकल इंजिनीअर- ११, इलेक्ट्रिकल इंजिनीअर- ३. पदवीधरांसाठी- ऑफिस असिस्टंट (कमíशयल)- २, स्टोअर असिस्टंट- ४, यार्ड असिस्टंट- ५, अनस्किल्ड कामगार- ३६ पदे. दहावी उत्तीर्ण + १ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव- वयोमर्यादा- २८ वष्रे (इमाव ३१ वष्रे, अजा/अज- ३३ वष्रे).
http://www.goashipyard.com किंवा http://www.goashipyard.co.in या संकेतस्थळावर ७ जून २०१६ पर्यंत अर्ज करावेत. ऑनलाइन अर्जाची पिंट्रआऊट आवश्यक त्या कागदपत्रांसह २० जून २०१६ पर्यंत गोवा शिपयार्ड लिमिटेड, वाड्डेम, वास्को डी गामा, गोवा- ४००८०२ या पत्त्यावर पोहोचतील असे पाठवावेत.

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथील रिफायनरीमध्ये टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस पदविका
याअंतर्गत ३३ जागा भरण्यात येतील. प्रशिक्षणाचा कालावधी- १ वर्ष. अर्हता- अभियांत्रिकीमध्ये पदविका (रासायनिक/ यांत्रिक, इन्स्ट्रमेंटेंशन/ विद्युत/ स्थापत्य प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण. अंतिम वर्षांला किमान ६० टक्के गुण प्राप्त (अजा/अजसाठी किमान ५० टक्केगुण). अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. २०१३ पूर्वी उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र नाहीत.
निवड प्रक्रिया- जून/जुल महिन्यात ट्रेड टेस्ट घेण्यात येईल. यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होईल. विद्यावेतन- रु. १५,००० प्रतिमाह. अर्ज डीजीएम, (अ‍ॅडमिन टी अ‍ॅण्ड डी) एमआर, बीपीसीएल मुंबई रिफायनरी, माहूल, मुंबई- ४०० ०७४ या पत्त्यावर ८ जूनपर्यंत पाठवावेत.

सन्य दलात हवालदार (सर्वेअर ऑटोमेटेड काटरेग्राफर) पदभरती
पदे- २०. पात्रता- गणित विषयातील कोणतीही पदवी. शिवाय बारावी (पीसीएम) विषयांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा- २० ते २५ वष्रे.
शारीरिक मापदंड- (पश्चिम विभागासाठी) उंची- १७० सेंमी, वजन- ५० कि.ग्रॅ., छाती- ७७ सेंमी. (किमान ५ सेंमी फुगवता येणे आवश्यक).
निवड पद्धती-ोउमेदवारांची अर्हता पडताळणी : २५-२९ जुल २०१६ दरम्यान.ो शारीरिक क्षमता चाचणी. अ) १.६ कि.मी. किमान ६ मि. २० सेकंदांत धावणे ब) किमान ६ पुलअप्स, झिगझ्ॉग बॅलन्स पार करणे, ९ फुटांचा खड्डा पार करणेो वैद्यकीय तपासणीोलेखी परीक्षा- ३१ जुल २०१६ रोजी रुरकी येथे घेण्यात येईल. पेपर-१- गणित ५० प्रश्न १०० गुणांसाठी. पेपर-२- भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र ५० प्रश्न १०० गुणांसाठी. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी- ०.५० गुण वजा केले जातील.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर १० जून २०१६ पर्यंत करावेत. अ‍ॅडमिटकार्डच्या प्रिंटआउटसह उपस्थित राहावे.
सुहास पाटील