ओएनजीसीमध्ये विकलांगांसाठी भरती. (इतर उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात.)  रेग्युलर ए-२ लेव्हल पोस्ट्स –

(१) असिस्टंट टेक्निशियन (बॉयलर) – १२ पदे. पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका  प्रथम वर्गातील बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.

(२) मरीन रेडिओ असिस्टंट – ग्रेड-३ (१६ पदे). पात्रता – १०वी उत्तीर्ण  मरीन रेडिओ ऑपरेशनमधील प्रमाणपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशनमधील मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशनची पदविका.

(३) ज्युनियर असिस्टंट ऑपरेटर

(हेवी इक्विपमेंट) (२९ पदे).

पात्रता – १० वी उत्तीर्ण  जड वाहन चालक परवाना ३ वर्षांचा जड वाहन/क्रेन ऑपरेटरचा अनुभव.

(४) ज्युनियर रोस्टाबाऊट (२४ पदे). पात्रता – १० वी उत्तीर्ण  कार्गो चढविणे/उतरविणे/जहाज रंगविणे इ. कामांचा १ वर्षांचा अनुभव इ. पदांची भरती.

लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्क नसतील.

वयोमर्यादा – दि. १५ मार्च २०१७ रोजी ज्युनियर असिस्टंट ऑपरेटर (हेवी इक्विपमेंट) साठी ३५ वष्रे, इतरांसाठी ३० वष्रेपर्यंत. इमाव/अज/अजासाठी नियमानुसार शिथिल.

परीक्षा शुल्क ३००/- (अजा/अज/विकलांग यांना फी माफ).

ऑनलाइन अर्ज www.ongcindia.com http://www.ongcindia.com/ या संकेतस्थळावर दि. १५ मार्च २०१७ पर्यंत करावेत.