नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी आणि नेव्हल अ‍ॅकॅडमी एक्झाम (२) २०१७ दि. १० सप्टेंबर २०१७ रोजी घेण्याचे यूपीएससीने जाहीर केले आहे.

या परीक्षेतून आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी एन्डीएमधील १४०वा कोर्स आणि इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीच्या १०२व्या कोर्ससाठी प्रवेश दिला जाईल.

प्रवेश क्षमता –

(१) एनडीए – एकूण ३३५

(आर्मी – २०८, नेव्ही – ५५ आणि एअरफोर्स – ७२),

(२) नेव्हल अ‍ॅकॅडमी (१०+२ कॅडेट एन्ट्री) – ५५,  एकूण ३९०.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, पणजी इ. आपल्या आवडीचे परीक्षा केंद्र हवे असल्यास उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत.

पात्रता –

(१) आर्मी – १२वी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील),

(२) एअर फोर्स आणि नेव्हल िवग्स आणि १०+२ कॅडेट एन्ट्री – १२वी उत्तीर्ण (फिजिक्स आणि गणित विषयांसह) (बारावीला बसणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

बारावी पात्रतेबाबतचे मूळ प्रमाणपत्र आर्मी मुख्यालयात दि. २४ जून २०१८ पर्यंत सादर करावे लागेल.)

फक्त अविवाहित पुरुष पात्र आहेत.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २००२ दरम्यानचा असावा.

फी – रु. १००/- (अजा/अज यांना फी माफ).

निवड पद्धती –

ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षा – गणित ३०० गुण, जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट – (इंग्लिश – २०० गुण  जनरल नॉलेज – ४०० गुण) एकूण ६००गुण  प्रत्येकी २ तास ३० मिनिटांचा कालावधी आणि एसएसबी टेस्ट/मुलाखत ९०० गुण.

उंची – आर्मी, नेव्हीसाठी १५७ सें.मी. (एअरफोर्ससाठी १६२.५ सें.मी.)

वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन असावे.

ट्रेिनग – एनडीएसाठी निवडलेल्या उमेदवारांना ३ वर्षांचे शैक्षणिक आणि शारीरिक ट्रेिनग दिले जाईल. पहिले दोन ते अडीच वर्ष तीनही िवगसाठी सारखेच ट्रेिनग दिले जाते. ट्रेिनगनंतर जेएनयूकडून बी.एस्सी./बी.टेक. डिग्री दिली जाते. एन.डी.ए.तील ट्रेिनगनंतर उमेदवार जंटलमन कॅडेट म्हणून इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी (आर्मी) (डेहराडून), इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी (केरला), इंडियन एअर फोर्स अ‍ॅकॅडमी (हैद्राबाद) येथे एक वर्षांच्या (एअरफोर्स दीड वर्ष) यशस्वी ट्रेिनगनंतर ट्रेिनगसाठी जातील.

आर्मीमध्ये लेफ्टनंट, नेव्हीमध्ये सब-लेफ्टनंट-जंटलमन कॅडेट्सना ट्रेिनग दरम्यान रु. २१,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

ऑनलाइन अर्ज upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ३० जून २०१७ पर्यंत करावेत.

संपर्कासाठी फोन नं. ०११-२३३८५७७१ / २३३८११२५

कोस्ट गार्ड पश्चिम क्षेत्र, मुख्यालय, वरळी सी फेस, वरळी कॉलनी, मुंबई – ४०० ०३०. पुढील  १५ पदांची भरती.

(१) स्टोअर किपर (२ पदे) (मुंबईसाठी), (२) असिस्टंट स्टोअर किपर

(२ पदे) (१ पद मुंबईसाठी), (३) एमटीएस (दफ्तरी १ पद मुंबईसाठी),

(४) एमटीएस् (प्यून) (१ पद मुंबईसाठी, २ पदे रत्नागिरीसाठी) इ. विहित नमुन्यातील अर्ज www.indiancoastguard.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतात. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह स्वीकारण्याचा अंतिम दि. १ जुल २०१७