वुमन्स आयटीआय (महिलांकरिता प्रादेशिक व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण संस्था) काशिनाथ धुरू मार्ग, दादर (प.), मुंबई – ४०० ०२८ येथे ऑगस्ट, २०१७ (तिसरा आठवडा)पासून सुरू होणाऱ्या पूर्ण वेळ कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी १०वी उत्तीर्ण महिलांकरिता प्रवेश.

(अ) १ वर्ष मुदतीचे कोस्रेस.

(१) कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोसेसिंग असिस्टंट

(४० जागा),

(२) ड्रेस मेकिंग (१६ जागा),

(३) सेक्रेटरियल प्रॅक्टिस (इंग्रजी) (२० जागा),

(४) बेसिक कॉस्मेटॉलॉजी (२० जागा),

(५) डेस्क टॉप पब्लििशग ऑपरेटर (२० जागा).

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

(ब) दोन वर्ष मुदतीचे कोस्रेस.

(१) आíकटेक्चरल ड्राफ्ट्समनशिप (२० जागा),

(२) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (२० जागा).

पात्रता – बारावी (गणित व विज्ञान विषयासह) उत्तीर्ण. उमेदवारांचे किमान वय १५ वष्रे असावे. प्रवेश १०वीच्या गुणवत्तेनुसार होईल.

प्रशिक्षण शुल्क – रु. १५०/- प्रति महिना (अजा/अजसाठी रु. ५०/- प्रति महिना).

अर्ज www.dget.nic.in किंवा rvtimumbai.ac.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २१ जुल २०१७ सायं. ४ वाजेपर्यंत. दि. २८ जुल रोजी सायं. ४ वाजता संस्थेच्या सूचना फलकावर प्रवेश सूची प्रदíशत होईल.

आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – ४११ ०२१ येथे ज्युनियर रिसर्च फेलोशिपच्या ७ जागा.

पात्रता – (१) मेकॅनिकल/मेटॅलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/ एअरोनॉटिकल/एअरोस्पेस इंजिनीअरिंग पदवी किंवा एमएस्सी (फिजिक्स/अ‍ॅप्लाइड फिजिक्स/मॅथ्स/केमिस्ट्री/कॉम्प्युटर सायन्स/आयटी) प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण.

(२) एनईटी/जीएटीई स्कोअर. स्टायपेंड – रु. २५,०००/- दरमहा एचआरए कॉन्टीन्जन्सी ग्रँट नियमांप्रमाणे दिली जाईल. यूजीसी/सीएसआयआर/एनईटी/जीएटीई परीक्षा उत्तीर्ण आहेत असेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – २८ वष्रे (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज – ३३ वष्रे).

वॉक इन इंटरव्ह्य़ूसाठी पात्र उमेदवारांनी दि. १५ जुल २०१७ रोजी सकाळी ९.३०वाजता वरील पत्त्यावर बायोडेटा आणि आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे. एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ८ जुल २०१७ च्या अंकात जाहिरात पहावी.

पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे – ४११०६७ येथे गट च्या १३८ पदांची भरती.

पद क्र. (१) पशुधन पर्यवेक्षक (११४पदे)

(महिला – ३६, मा.स. – १५, प्रकल्पग्रस्त – ५, भूकंपग्रस्त -२ खेळाडू – ५, अंशकालीन – १०) अपंग प्रवर्गासाठी ८ पदे. अस्थिव्यंग (ओएल) व ८ पदे कर्णबधिर (एचएच) साठी राखीव.

पात्रता – १०वी पशुधन पर्यवेक्षक/पशुधन व्यवस्थापन/बीव्हीएस्सी उत्तीर्ण.

(२) वरिष्ठ लिपिक (१० पदे).

पात्रता – पदवी उत्तीर्ण.

(३) लिपिक टंकलेखक (७ पदे). पात्रता – पदवी उत्तीर्ण  मराठी टंकलेखक ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.

(४) लघुलेखक (उच्चश्रेणी) (१ पद).

(५) लघुलेखक (निम्न श्रेणी) (१ पद).

पात्रता – पद क्र. ४ व ५ साठी १०वी इंग्रजी व मराठी १२०/१०० श.प्र.मि. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण  इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.

(६) वाहन चालक (५ पदे).

पात्रता – १०वी उत्तीर्ण  हेवी व लाईट मोटार वाहन चालविण्याचा परवाना ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. ६ जुल २०१७ रोजी

१८ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय – ४३ वष्रे, अपंग/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त/अपंग माजी सनिक इ. ४५ वष्रे; अंशकालीन – ४६ वष्रे;

खेळाडू – ४३ वष्रे).

परीक्षा शुल्क – रु. ३००/-

(मागासवर्गीय रु. १५०/-).

निवड पद्धती – लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची पद क्र. १ ते ३ साठी २०० गुणांची – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी (पशुधन पर्यवेक्षक पदासाठी २०० पकी ८० गुण तांत्रिक विषयावर आधारित असतील.) लघुलेखक पदांसाठी १२० गुणांसाठी लेखी परीक्षा वाहनचालक पदासाठी ५० गुण सामान्यज्ञान आणि ५० गुण कौशल्य तपासणी.

ऑनलाइन अर्ज http://www.ahd.maharashtra.gov.in तसेच  http://cahexam.com/ या संकेतस्थळांवर दि. २६ जुल २०१७ पर्यंत करावेत.