महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी मर्यादित- महानिर्मितीमध्ये वाहनचालकांच्या १८ जागा :
उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावेत. त्यांच्याजवळ लहान आणि अवजड वाहन चालविण्याचा परवाना व वाहनचालकाचा किमान चार वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी महानिर्मितीच्या http://www.mahageuco.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०१६.

जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये सहसंचालक (राजभाषा) च्या ४ जागा:
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ मे ते ३ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०१६.

आर्मड फोर्सेस मेडिकल स्टोर्स डेपो- लखनऊ येथे स्टोअर कीपरच्या ५ जागा :
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ मे ते ३ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील अर्ज कमांडंट, आर्मड फोर्सेस मेडिकल स्टोर्स डेपो, जीजीएस मार्ग, दिलखुरा रोड, लखनऊ- छावणी, लखनऊ २२६००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ जून २०१६.

सैन्य दलांतर्गत कृत्रिम अंग केंद्र, पुणे येथे लिंब मेकर कार्पोरेटच्या ३ जागा:
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ मे ते ३ जून २०१६ च्या अंकातील कृत्रिम अंग केंद्र, पुणेची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील अर्ज कमांडंट, कृत्रिम अंग केंद्र, वानवडी, पुणे- ४११०४० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ जून २०१६

आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे ट्रेडसमनच्या ९ जागा:
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ मे ते ३ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली एएफएमसी- पुणेची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडंट, आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे- सोलापूर मार्ग, वानवडी, पुणे- ४११०४० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ जून २०१६.

नॅशनल सेंटर फॉर सेल सायंस, पुणे येथे टेक्निशियन म्हणून संधी:
अधिक माहिती व तपशिलासाठी http://www.nccs.res.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१६.

दी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे मरिन इंजिनीअर्सच्या ११ जागा:
वयोमर्यादा ४५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज व्हाइस प्रेसिडेंट (पी), दि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. शिपिंग हाऊस, २४५ मदाम कामा रोड, नरिमन पॉइन्ट, मुंबई- ४०० ०२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जून २०१६

संरक्षण मंत्रालयांतर्गत व्हेइकल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, एस्टॅब्लिशमेंट, चेन्नई येथे प्रशिक्षार्थी कुशल कामगारांच्या १४० जागा:
अर्जदार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत.
अधिक माहिती व तपशीलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा http://www.apprenticeship.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज काँबॅट व्हेइकल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट एस्टॅब्लिशमेंट, आवडी, चेन्नई- ६०००५४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जून २०१६.

सीमा सुरक्षा दलात काँस्टेबल (ट्रेडस्मन) च्या ५६१ जागा-
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २३ वर्षे.
अधिक माहिती व तपशीलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूज च्या २१ ते २७ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा http://www.bsfinic.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २० जून २०१६.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये केमिकल इंजिनीअर्सच्या २० जागा:
अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन ऑइलच्या http://www.iocl.com या संकेत स्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१६.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, सोलापूर येथे सीनिअर रिसर्च फेलोच्या ४ जागांसाठी थेट मुलाखत:
अधिक माहिती व तपशिलासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेच्या http://www.nrcpome granate.org या संकेत स्थळाला भेट द्यावी.
तपशीलवार अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५, सोलापूर- पुणे
मार्ग, केगाव, सोलापूर- ४१३२५५ येथे संपर्क साधण्याची तारीख २१ जून २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई, विशाखापट्टणम् येथील रिफायनरिजमध्ये एकूण ६२ अधिकारी पदांची भरती
* आर अ‍ॅण्ड डी प्रोफेशनल्स – केमिकल/बायोटेक्नॉलॉजी अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी.
* सुरक्षा अधिकारी – ९ पदे. पात्रता – अभियांत्रिकी मधील पदवी आणि इंडस्ट्रियल सेफ्टीमधील पदविका.
* माहिती यंत्रणा अधिकारी- ८ पदे. पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान यातील अभियांत्रिकी पदवी किंवा एमसीए किंवा माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान यातील एम्.बी.ए.
* कायदा अधिकारी – ५ पदे. पात्रता – कायदा पदवीधर आणि १ वर्षांचा वकिलीचा अनुभव.
* प्रशिक्षण मानव संसाधन अधिकारी – ६ पदे. पात्रता – मानव संसाधन, पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्स, मानसशास्त्र या विषयातील २ वर्ष कालावधीची पदव्युत्तर पदवी. पदवी/पदव्युत्तर पदवीमध्ये सरासरी किमान ६० गुण (अजा/अज/ पीडब्ल्यूडीसाठी ५० गुण कायदा अधिकारी पदासाठी ५५ गुण.) असेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र. वयोमर्यादा – पद क्र. ३ माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदासाठी ३० वष्रे. इतर पदांसाठी २७ वष्रे. (अजा/अजसाठी ५ वर्षांनी आणि इमावसाठी ३ वर्षांनी शिथिल) अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.hindustanpetroleum.com किंवा http://www.hpclcareers.com या संकेतस्थळांना भेट द्या. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
३० जून २०१६.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (आय्एस्आर्ओ), इस्रो उपग्रह केंद्र, बंगळूरु येथे खालील पदांची भरती
* टेक्निशियन – ‘बी’ -१२० पदे. पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक -५७, फिटर- २७, इलेक्ट्रिकल-१४, प्लंबर-४, ए.सी., रेफ्रिजरेशन ४ इ. मधील आयटीआय्/एनसीव्हीटी परीक्षा उत्तीर्ण.
* ड्राफ्टस्मन आयटीआय्/एनसीव्हीटी उत्तीर्ण.
* टेक्निकल असिस्टंट -३३. पात्रता – मेकॅनिकल -१३, इलेक्ट्रॉनिक्स -१८, संगणक विज्ञान – २ मधील अभियांत्रिकी पदविका किमान प्रथम वर्गात उत्तीर्ण.
* सायंटिफिक असिस्टंट – ३, रसायनशास्त्र विषयातील प्रथम वर्गातील पदवी.
* लायब्ररी असिस्टंट – ३ – पदवी अधिक लायब्ररी सायन्समधील प्रथम वर्गातील पदव्युत्तर पदवी.
वरील सर्व पदांसाठी वयोमर्यादा – १७ जून २०१६ रोजी १८ ते ३५ वष्रे. निवड पद्धती – पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा आणि स्कीलटेस्टसाठी बोलाविले जाईल. अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणांवर आधारीत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने http://www.isro.gov.in या संकेत स्थळावर १७ जून २०१६ पर्यंत करावेत. अर्जासोबत भरावयाचे शुल्क रु. २५०/- (महिला/अजा/अज यांना शुल्क माफ) अराखीव आणि इमावचे पुरुष उमेदवारांनी स्टेट बँकेत भरलेल्या चलनाची कॉपी साध्या पोस्टाने वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, (आर्एम्टी), इस्त्रो सॅटेलाईट सेंटर, जुना विमानतळ रस्ता, विमानपुरा, बेंगलुरू, या पत्त्यावर पाठवावी.
द. वा. आंबुलकर, सुहास पाटील