सिक्युरिटी िपट्रिंग अ‍ॅण्ड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (लि.) मध्ये ऑफिसर्सची भरती

(जाहिरात क्र. ०३/२०१७ – ओपी) संस्थेच्या मुंबई, नाशिक, देवास, हैद्राबाद इ. आस्थापनांमध्ये ऑफिसर पदांची भरती.

(१) ऑफिसर (एफ अ‍ॅण्ड ए) – एकूण ९ पदे (खुला – ३, इमाव – २, अजा – ४)

पात्रता – सीए/आयसीडब्ल्यूए/एमबीए (फायनान्स) इ.

(२) ऑफिसर (एचआर) – एकूण ३ पदे (यूआर – २, अजा – १).

पात्रता – दि. २ ऑगस्ट २०१७ रोजी पर्सोनेल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी किंव एमबीए (एचआर).

इष्ट पात्रता – कायदा विषयातील पदवी इंडस्ट्रीमधील अनुभव.

वयोमर्यादा – ३० वष्रेपर्यंत.

फी – रु. ४००/- (अजा/अज यांना फी माफ).

विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २२ जुल २०१७ च्या अंकात पाहावी. ऑनलाइन अर्ज www.spmcil.com  या संकेतस्थळावर २८ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

इंडियन आर्मीमध्ये एप्रिल, २०१८पासून सुरू होणाऱ्या नॉन-टेक्निकल कोर्समधील प्रवेश.

(१) एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम – ४३ व्या कोर्ससाठी अविवाहित पुरुष-महिला यांना प्रवेश.

पात्रता –  कोणत्याही शाखेतील पदवी किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण.

(अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.) एनसीसी किंवा बी ग्रेड सर्टििफकेट परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९३ ते १ जानेवारी १९९९ दरम्यानचा असावा.

(२) जज्ज अ‍ॅडव्होकेट जनरल (जेएजी) एन्ट्री स्कीम – २०वा कोर्स –

पात्रता – पुरुष किंवा अविवाहित महिला – कायदा विषयातील पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जुल १९९० ते १ जुल १९९६ दरम्यानचा असावा.

दोन्ही कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.

ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर २३ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.