ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) मध्ये एक्झिक्युटिव्ह (ई-क  लेव्हल) पदांची भरती.

युनिव्हर्सटिी ग्रँट्स कमिशनतर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नेट-जुल, २०१८) मधील गुणवत्तेनुसार केली जाणार.

१) एचआर एक्झिक्युटिव्ह.

पात्रता – एमबीए (एचआर) किंवा समतुल्य (यूजीसी एनईटी सब्जेक्ट कोड – ५५ आणि १७)

२) फायनान्स अँड अकाऊंट्स ऑफिसर.

पात्रता – एमबीए (फायनान्स) (सब्जेक्ट कोड – १७)

३) ऑफिशियल लँग्वेज ऑफिसर.

पात्रता – एमए (हिंदी) (पदवीला इंग्रजी एक विषय असावा.) (सब्जेक्ट कोड – हिंदी – २०) (पात्रता परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक).

वयोमर्यादा – तीनही पदांसाठी दि. १ जानेवारी २०१८ रोजी ३० वष्रे (इमाव – ३३ वष्रे, अजा/अर्ज – ३५ वष्रे, विकलांग – ४० वष्रेपर्यंत).

निवड पद्धती – (i) यूजीसी एनईटी परीक्षा जुल, २०१८च्या स्कोअरसाठी ६०%  गुण, (ii) मुलाखत – १५ गुण, (iii) पात्रता परीक्षेसाठी २० गुण, (iv) पीएचडीसाठी ५ गुण.

मूळ वेतनपट्टा रु. ६०,०००/-. अधिक डीए, एचआरए व इतर भत्ते.

ऑनलाइन अर्ज www.ongcindia.com या संकेतस्थळावर दि. ६ एप्रिल ते २७ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत. (निश्चित पदसंख्या याच संकेतस्थळावर दि. ६ एप्रिलपर्यंत जाहीर केली जाईल.) मुलाखत- यूजीसी-एनईटी ऑनलाइन अर्ज http://cbsenet.nic.in या संकेतस्थळावर ५ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.

अ‍ॅटॉमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी (एईईएस) (डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, भारत सरकारची एक स्वायत्त संस्था), मुंबई (शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात क्र. एईईएस/०१/२०१८).

(ए) पोस्ट ग्रॅज्युएट टीचर – ८ पदे (इंग्लिश – २ (अजा – १/खुला – १), गणित – १ (खुला), फिजिक्स – २ (अर्ज – १, खुला – १) केमिस्ट्री – १ (खुला), बायोलॉजी – २ (इमाव – १, खुला – १)).

पात्रता – (i) पदव्युत्तर पदवी सरासरी किमान ५०% गुणांसह. (ii) संबंधित विषयातील बी.एड. वयोमर्यादा – दि. ७ एप्रिल २०१८ रोजी ४०  वष्रेपर्यंत.

वेतन – दरमहा रु. ६५,०००/-.

(बी) ट्रेण्ड ग्रॅज्युएट टीचर (टीजीटी) – १७ पदे (हिंदी/संस्कृत – (इमाव – ४, खुला – ३), मॅथेमॅटिक्स/फिजिक्स – (अजा – २, अर्ज – १, इमाव – २, खुला -१, विकलांग – १), केमिस्ट्री/बायोलॉजी – (अर्ज – १, खुला – २)).

पात्रता – (्र) पदवी सरासरी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.

वेतन – रु. ६१,०००/- दरमहा. (्र) बी.एड्. वयोमर्यादा – ३५ वष्रेपर्यंत.

(सी) प्रायमरी टीचर – २५ पदे (अजा – १, अर्ज – ३, इमाव – ८  खुला – १३).

पात्रता – (i) बारावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (ii) सीटीईटी पेपर – क  उत्तीर्ण. (iii) डी.एड. (iv) बारावीला एक विषय इंग्रजी असावा.

वेतन – रु. ४९,०००/- दरमहा.

वयोमर्यादा – ३० वष्रेपर्यंत.

सर्व पदांसाठी इंग्रजी/हिंदी भाषेतून शिकविण्याचे कौशल्य आवश्यक.

वयोमर्यादा शिथिलक्षम – इमाव – ३ वष्रे, अजा/अर्ज – ५ वष्रे, महिला – १० वष्रे, विकलांग – १०/१३/१५ वष्रेपर्यंत.

परीक्षा शुल्क – रु. ७५०/- (अजा/अर्ज/महिला/विकलांग यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज www.aees.gov.in या संकेतस्थळावर ७ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.

परीक्षा केंद्रे – मुंबई, हैदराबाद, इंदौर, जमशेदपूर

ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएम्स), जोधपूर (राजस्थान) येथे नर्सिंग स्टाफची भरती.

१) नर्सिंग ऑफिसर (स्टाफ नर्स ग्रेड – कक ) – ६०० पदे. वेतन – दरमहा रु. ६०,०००/-.

२) सिनीयर नर्सिंग ऑफिसर (स्टाफ नर्स ग्रेड – क) – १२७ पदे. वेतन – दरमहा अंदाजे रु. ६५,०००/-

३) असिस्टंट नर्सिंग सुपिरटेंडंट – २८ पदे. वेतन – दरमहा रु. ७५,०००/-

पात्रता – सर्व पदांसाठी (i) बी.एस्सी. (नर्सिंग) (४ वर्षांचा कोर्स किंवा बी.एस्सी. पोस्ट सर्टििफकेट नर्सिंग. (ii) स्टेट/इंडियन नर्सिंग काऊन्सिलकडे नस्रेस आणि मिडवाइफ म्हणून नोंदणी आवश्यक. (पद क्र. १ साठी (i) डिप्लोमा जनरल नर्सिंग मिडवायफरी किंवा स्टेट/इंडियन नर्सिंग काऊन्सिलकडे नस्रेस आणि मिडवाईफ म्हणून नोंदणी आणि (ii) २ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत.) पद क्र. २ साठी ३ वर्षांचा अनुभव आणि पद क्र. ३ साठी ६ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – पद क्र. १ साठी १८-३० वष्रे.

पद क्र. २ साठी २१ ते ३५ वष्रे.

पद क्र. ३ साठी २५ ते ४० वष्रेपर्यंत.

निवड पद्धती – पद क्र. १ व २ साठी फक्त लेखी परीक्षा. पद क्र. ३ साठी आवश्यकता असल्यास लेखी परीक्षा आणि मुलाखत यातून निवड.

विस्तृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज http://www.aiimsjodhpur.edu.in या संकेतस्थळावर दि. ९ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com