पश्चिम रेल्वे, मुंबई – एकूण ५५ अ‍ॅप्रेंटिस पदांची भरती.

(१) इलेक्ट्रिशियन – एकूण ५२ जागा

(अजा – ८, अज – ४, इमाव – १४, खुला – २६).

(२) टर्नर – २ जागा.

(३) वेल्डर (जी अँड एस) – १ जागा.

पात्रता – १० वी ५५% गुण आणि आय.टी.आय.

प्रशिक्षणाचा कालावधी – १ वर्ष. वयोमर्यादा – दि. २६ सप्टेंबर २०१७ रोजी १५ ते २४ वष्रे. (इमाव – २७ वष्रे, अजा/अज – ३० वष्रेपर्यंत)

शुल्क – रु. १००/- चीफ कमिशनर, चर्चगेट, पश्चिम रेल्वे यांना देय असलेल्या पोस्टल ऑर्डर/ डी.डी. स्वरूपात.

निवड – १० वी आणि आय.टी.आय.मधील गुणवत्तेनुसार. विस्तृत जाहिरात दि. ३० सप्टेंबर २०१७ च्या लोकसत्ता/ टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रांत पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज (जाहिरातीत दिल्याप्रमाणे) आवश्यक प्रमाणपत्रांसह स्वीकारण्याचा अंतिम दि. २३ ऑक्टोबर २०१७.

डायरेक्टोरेट जनरल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स – कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) – एकूण १,०७४ पदांची भरती.

(१) कूक – ३३२ पदे,

(२) स्वीपर – २१२ पदे,

(३) वॉटर करिअर – १७७ पदे,

(४) वॉशरमन – १३१ पदे,

(५) बार्बर – ८५ पदे,

(६) कॉब्लर – ६५ पदे,

(७) टेलर – २८ पदे,

(८) वेटर – २७ पदे,

(९) खोजी – ६ पदे,

(१०) पेंटर – ५ पदे,

(११) कारपेंटर – २ पदे इ.

पात्रता – १० वी उत्तीर्ण, २ वर्षांचा कामाचा अनुभव किंवा आय.टी.आय. उत्तीर्ण (१ वर्षांचा कोर्स) १ वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते २३ वष्रे.

उंची – १६७.५ सें.मी. (अजसाठी १६२.५ सें.मी.). छाती – ७८ ते ८३ सें.मी.

(अजसाठी छाती ७६-८१ सें.मी.). बी.एस.एफ.च्या http://www.bsf.nic.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील अर्ज आणि अ‍ॅडमिट कार्डची िपट्रआऊट घेऊन पूर्ण भरलेले अर्ज व अ‍ॅडमिट कार्ड संबंधित आरए किंवा मुख्यालयात दि. ३० ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

वॅलिड गेट स्कोअरवर आधारित इंजिनीअर्सची एक्झिक्युटिव्ह/मॅनेजमेंट ट्रेनी पदांवर भरती.

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया – डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) (सिव्हिल इंजिनीअिरग) एकूण ४० पदे (यूर्आ – १९, अजा – ७,

अज – ३, इमाव – ११).

वय – ३० वष्रेपर्यंत. ऑनलाइन अर्ज  http://www.nhai.org/ या संकेतस्थळावर दि. २८ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड – गेट- २०१८ – मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल.

ऑनलाइन अर्ज  http://careers.bhel.in/ वर दि. ९ जानेवारी, २०१८ ते ३ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत करावेत. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, गेट – २०१८ – मेकॅनिकल इंजिनीअिरग, मेटॅलर्जकिल इंजिनीअिरग, इलेक्ट्रिकल, केमिकल, इन्स्ट्रमेंटेशन आणि मायिनग इंजिनीअिरग.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  http://www.sail.co.in/ वर नंतर जाहीर केली जाईल.