मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (महाराष्ट्र शासन अंगिकृत) (एमएमआरडीए) – भूमापक (२२ पदे), कोर्ट क्लर्क (१ पद) या पदांची भरती.

पात्रता –

(१) भूमापक – १० वी उत्तीर्ण ‘सर्वेक्षक’ (सव्‍‌र्हेअर) ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण, एमएससीआयटी ऑटोकॅड संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण. २ वर्षांचा अनुभव.

(२) कोर्ट क्लर्क – १२ वी उत्तीर्ण एमएससीआयटी उत्तीर्ण, ५ वष्रे कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३८ वष्रे (मागासवर्गीय ४३ वष्रे, विकलांग – ४५ वष्रे)

परीक्षा प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबाबत तपशील स्वतंत्रपणे प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाइन अर्ज  http://mmrda.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर २८ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

स्टाफ सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) दमण व दिव, केंद्र शासित प्रशासन दमण दिव व दादरा-नगरहवेलीमधील लोवर डिव्हिजनल क्लर्क/ स्टुडंट सेक्शन क्लर्क/ कॅशियर इ. एकूण २७ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवीत आहे.

दमण दिव प्रशासनासाठी (यूआर- १०, अज- २, इमाव- १, अपंगांसाठी- ३)

एकूण १६ पदे. दादरा-नगरहवेलीसाठी ११ पदे. (यूआर- ५, अज- ६)

पात्रता – १२ वी उत्तीर्ण. स्किलटेस्ट इंग्रजी टायिपग ३५ श.प्र.मि. किंवा िहदी टायिपग ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा – १८ ते २७ वष्रे.

परीक्षा शुल्क – रु. १००/-. ऑनलाइन अर्ज  http://www.daman.nic.in/ या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

गुजरात हायकोर्ट, अहमदाबाद – डेप्युटी सेक्शन ऑफिसरच्या ४६ पदांची भरती.

वेतन (रु. ३९,९००/- – १,२६,६००/- पे मॅट्रिक्स).

पात्रता – पदवी उत्तीर्ण कॉम्प्युटरमधील सीसीसी/ सीसीसी लेव्हल सर्टििफकेट किंवा कॉम्प्युटर विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. ३० सप्टेंबर २०१७ रोजी १८-३५ वष्रे.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/- (अजा/ अज/ विकलांग- रु. २५०/-).

निवड पद्धती –

(ए) एलिमिनेशन टेस्ट (ऑब्जेक्टिव्ह टाइप एमसीक्यू) १०० गुण (कालावधी २ तास).

(बी) मुख्य लेखी परीक्षा- १०० गुण (कालावधी ३ तास). ऑनलाइन अर्ज  http://hc-ojas.guj.nic.in/ या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयपीपीएस) १९ सहयोगी बँकांमध्ये क्लर्क पदांच्या भरतीसाठी कॉमन रिटन एक्झामिनेशन (सीडब्ल्यूई)- ७ घेणार आहे.

पात्रता – (दि. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी) पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१७ रोजी २० ते २८ वष्रे.

(कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव- ३ वष्रे, अजा/अज- ५ वष्रे, विकलांग- १०/१३/१५ वष्रे, परित्यक्ता/ विधवा महिला- ९ वष्रे)

परीक्षा पद्धती –

(१) पूर्वपरीक्षा – दि. १३ ते १८ नोव्हेंबर २०१७ रोजी १०० गुणांची. वेळ १ तास,

इंग्लिश लँग्वेज (३० गुण), न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – ३५ गुण, रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ गुण.

(२) मुख्य परीक्षा – २०० गुणांसाठी, दि. २१ जानेवारी २०१८ रोजी.

वेळ – १६० मिनिटे. ऑनलाइन अर्ज  http://www.ibps.in/ संकेतस्थळावर दि. ३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.