News Flash

नोकरीची संधी

संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान  ६०%  गुणांसह उत्तीर्ण.

एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडमध्ये इंजिनीअर्सची भरती.

(१) ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल) – ४० पदे (यूआर – २०, अजा – ५, अज – ५, इमाव – १०).

(२) ज्युनियर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) – ४ पदे (यूआर- ३, अज – १). पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) किमान ६०%  सरासरी गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. २४ सप्टेंबर २०१७ रोजी २८ वर्षांपर्यंत.

(३) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल) – एकूण १० पदे (यूआर – ५, अजा – ४, इमाव – १).

(४) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – एकूण ५ पदे (यूआर – ४, इमाव -१).

पद क्र. (३) व (४) साठी पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. ३ वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३३ वष्रे.

(५) सीनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल) – एकूण १० पदे.

(६) सीनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) – एकूण ३ पदे.

पद क्र. (५) व (६) साठी पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान  ६०%  गुणांसह उत्तीर्ण. २ वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३० वष्रे.

(७) डेप्युटी मॅनेजर लॉ – २ पदे (कायदा विषयातील पदवी तसेच ३ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा – ३३ वष्रे.

(८) असिस्टंट मॅनेजर (२ पदे) – कायदा विषयातील पदवी, २ वष्रे अनुभव.

(९) असिस्टंट मॅनेजर (एचआरएम) – २ पदे – एमबीए/ एमएसडब्ल्यू इ. तसेच २ वर्षांचा अनुभव.

(१०) असिस्टंट मॅनेजर (२ पदे) (राजभाषा) – िहदी/इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवीला इंग्रजी/िहदी विषय आवश्यक) २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – पद क्र. (८), (९) आणि (१०) साठी – ३० वष्रे.  शुल्क – रु. ५००/- (सर्व पदांसाठी) (अजा/अज/विकलांग यांना फी माफ)

ऑनलाइन अर्ज  http://www.nbccindia.com/  या संकेतस्थळावर दि. २४  सप्टेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

कृषी वैज्ञानिक भरती निवड मंडळ (अ‍ॅग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड) भारतीय कृषी अनुसंधान परिषद, पुसा, नवी दिल्ली – ११० ०१२. स्टेनोग्राफर ग्रेड-३ आणि लोवर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) या पदांच्या भरतीसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दि. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी घेणार.

(१) स्टेनोग्राफर ग्रेड- ३ – ९५ पदे (नवी दिल्लीतील मुख्यालय आणि देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांसाठी). पात्रता – १२ वी उत्तीर्ण, व्यावसायिक कौशल्य इंग्रजी किंवा िहदी डिक्टेशन टेस्ट ८० श.प्र.मि. वेगाने १० मिनिटांसाठी कॉम्प्युटरवर इंग्रजी ट्रान्सक्रिप्टमेंटसाठी ५० मिनिटांचा अवधी आणि िहदी ट्रान्सक्रिप्टमेंटसाठी ६५ मिनिटांचा अवधी.

वेतन – रु. ३६,३८४/-.

(२) लोवर डिव्हिजन क्लर्क (नवी दिल्लीतील आयसीएआर मुख्यालयासाठी) एकूण ७८ पदे.

पात्रता – १२ वी उत्तीर्ण, व्यावसायिक कौशल्य – इंग्रजी टायिपग ३५ श.प्र.मि./िहदी टायिपग ३० श.प्र.मि.

वेतन – रु. २७,५००/-.

दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा – दि. २५ सप्टेंबर २०१७ रोजी १८ ते २७ वष्रे (इमाव -३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रेपर्यंत).

अर्ज शुल्क – रु. २००/- (अजा/अज/महिला/विकलांग/ माजी सनिक यांना फी माफ).

ऑनलाइन अर्ज  http://www.asrb.org.in/  किंवा http://www.icar.org.in/ या संकेतस्थळावर

२५ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

एलडीसी परीक्षा – दि. २९ ऑक्टोबर २०१७ (१०.०० ते १२.००) स्टेनोग्राफर-३ परीक्षा दि. २९ ऑक्टोबर २०१७ (१४.३० ते १६.३०).

अ‍ॅडमिशन सर्टििफकेट डाऊनलोड करण्याचा दि. १४ ऑक्टोबर २०१७.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:38 am

Web Title: job opportunities in india job alert
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : परीक्षा हॉलमधील वेळेचे नियोजन
2 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण
3 ‘सीएसआयआर’ची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट 
Just Now!
X