जगभरात एकूण ५० देशांत ज्यांचे प्रोजेक्टस सुरू आहेत अशा आरआयटीईएस लिमिटेड, गुरगाव (भारत सरकारचा एक अंगीकृत उपक्रम) मध्ये मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सची भरती (एकूण ५० पदे)

(१) असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल – १० पदे) (यूआर – ६, इमाव – २, अजा – १, अज – १).

(२) इंजिनीअर (मेकॅनिकल) – २५ पदे (यूआर – १८, इमाव – ३, अजा – १, अज – ३).

(३) असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – ५ पदे (यूआर – ३, इमाव – १, अजा – १).

(४) इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) – १० पदे (यूआर – ७, अजा/अज/इमाव प्रत्येकी १).

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी प्रथम वर्गात उत्तीर्ण. उमेदवारांना असिस्टंट मॅनेजर पदासाठी किमान ५ वर्षांचा आणि इंजिनीअर पदासाठी २ वर्षांचा (क्वालिटी अ‍ॅशुरन्स/प्रोडक्शन/मॅन्युफॅक्चिरग मेंटेनन्स) कामाचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१७ रोजी असिस्टंट मॅनेजर पदासाठी ३५ वष्रे, इंजिनीअर पदासाठी ३२ वष्रेपर्यंत. (इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे, विकलांग – १०/१३/१५ वष्रेपर्यंत वयोमर्यादेत सूट).

वेतन – प्रतिवर्ष रु. १० लाख (असिस्टंट मॅनेजरसाठी) आणि रु. ८ लाख (इंजिनीअर पदासाठी). http://www.rites.com/  या संकेतस्थळावर अर्ज करण्याचा शेवटचा दि. १३ ऑक्टोबर २०१७. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावयाचे नाही.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, दिल्ली, गुरगाव, कोलकाता, चेन्नई आणि हैद्राबाद. करारतत्त्वावर इंजिनीअर्सची भरती.

(१) इंजिनीअर (मेकॅनिकल) -८ पदे (यूआर – ८).

(२) इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) – १३ पदे (यूआर – ४, इमाव – ६, अजा – १, अज – २).

पात्रता – संबंधित विषयातील बी.ई. प्रथम वर्गासह उत्तीर्ण. १ वर्षांचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – ३१ वष्रे. ऑनलाइन अर्ज http://www.rites.com/ या संकेतस्थळावर दि. ५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत. (करारतत्त्वावरील भरतीसाठी)

एनसीएल इंडिया लिमिटेड, नेवेल्ली, तामिळनाडू येथे ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांची भरती गेट – २०१८ स्कोअरवर आधारित.

पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हील/इन्स्ट्रमेंटेशन/कॉम्प्युटर/मायिनगमधील इंजिनीअरिंग पदवी गेट-२०१८ स्कोअर.

वेतन – प्रतिवर्ष रु. ९ लाख अंदाजे. गेट (जीएटीई) २०१८ साठी ऑनलाइन अर्ज www.gate.iitg.ac.in या संकेतस्थळावर दि. ५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत. एनएलसी इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ www.nlcindia.com वर दि. ६ जानेवारी २०१८ ते २७ जानेवारी २०१८ पर्यंत गेट रजिस्ट्रेशन नंबरसहित अर्ज करावेत.

  • शिक्षणापासून दुरावलेल्या तसेच या ना त्या कारणाने शिक्षण अर्धवट राहिलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणे हा उत्तम मार्ग असतो. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अशा संधी मिळू शकतात. या विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षांत १०० हून अधिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. एकूण आठ विद्याशाखांच्या माध्यमातून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील निरनिराळ्या कौशल्याधारित शिक्षणक्रमांचा त्यात समावेश आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विलंब शुल्कासह ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत विद्यापीठाने दिली आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. मुक्त विद्यापीठाच्या अमरावती, नांदेड, नागपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक या आठ विभागीय केंद्रांवर प्रवेश घेता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क – ycmou.digitaluniversity.ac अथवा ycmou.ac.in