ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ, जि. ठाणे. इंजिनीअिरग – डिप्लोमा/डिग्री पात्रताधारक उमेदवारांची अ‍ॅप्रेंटिस पदावर भरती.

उपलब्ध जागांचा तपशील –

(१) मेटॅलर्जकिल इंजिनीअिरग – डिप्लोमा – ५ जागा (ग्रॅज्युएट्स – ३ जागा).

(२) मेकॅनिकल इंजिनीअिरग – डिप्लोमा – ३ जागा (ग्रॅज्युएट्स – ४ जागा).

(३) इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – डिप्लोमा – १ जागा (ग्रॅज्युएट्स – २ जागा).

(४) इलेक्ट्रिकल – डिप्लोमा – १ जागा, (ग्रॅज्युएट्स – २ जागा).

(५) सिव्हिल – डिप्लोमा – १ जागा.

(६) केमिकल – डिप्लोमा – १ जागा.

पात्रता –

इंजिनीअिरग अ‍ॅप्रेंटिस – अभियांत्रिकी पदवी.

डिप्लोमा टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस – अभियांत्रिकी डिप्लोमा. फक्त फ्रेशर्स (गेल्या तीन वर्षांतील उत्तीर्ण उमेदवार) अर्ज करण्यास पात्र आहेत.

अ‍ॅप्रेंटिसशीपचा कालावधी – १ वर्ष.

स्टायपेंड – ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस – रु. ४,९८४/- प्रतिमाह. डिप्लोमा अ‍ॅप्रेंटिस – रु. ३,५४२/- प्रतिमाह.

विस्तृत जाहिरात टाइम्स ऑफ इंडिया दि. ३० सप्टेंबर, २०१७ च्या अंकात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याचा अंतिम

दि. २० ऑक्टोबर, २०१७. निवड अंतिम सेमिस्टरच्या गुणवत्तेनुसार.

टीआयएफआर येथे  विद्यार्थ्यांना संशोधनातील संधी.

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था मुंबई आणि विविध नॅशनल सेंटर्स येथे १ ऑगस्ट २०१८ पासून सुरू होणाऱ्या पीएच.डी., इंटिग्रेटेड एमएस्सी – पीएच.डी. , एमएस्सी अभ्यासक्रमांतील प्रवेशाकरिता दि. १० डिसेंबर २०१७ रोजी राष्ट्रव्यापी प्रवेश परीक्षा घेणार आहे.

पुढील विषयांतील संशोधनाकरिता प्रवेश –

(१) मॅथेमॅटिक्स, (२) फिजिक्स, (३) केमिस्ट्री, (४) बायोलॉजी, (५) कॉम्प्युटर अँड सिस्टीम सायन्सेस, (६) सायन्स एज्युकेशन.

पात्रता –

(१) पीएच.डी. – मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स विषयांसाठी संबंधित विषयांतील पदव्युत्तर पदवी. इतर विषयांसाठी बीई/बीटेक उमेदवारसुद्धा पात्र आहेत. बायोलॉजी विषयासाठी बीई, बीफार्म, बीडीएस, बीव्हीएस्सी देखील पात्र आहेत.

(२) इंटिग्रेटेड पीएच.डी. – बीए/ बीएस्सी/बीई/बीटेक/बीफार्म/बॅचलर्स इन बेसिक सायन्सेस इ. सिस्टीम सायन्सेसमधील प्रवेश जीएटीई स्कोअरवरसुद्धा होऊ शकतात.

कोर्स कालावधी – पीएच.डी. प्रोग्रॅम – ५ वर्षे,

इंटिग्रेटेड एमएस्सी – पीएच.डी. प्रोग्रॅम – ६ वर्षे.

डीबीएस्, मुंबई आणि एनसीबीएस, बंगलोर येथे बायोलॉजीमधील रिसर्चसाठी फिजिक्स/केमिस्ट्री/मेडिकल/डेंटिस्ट्री/वेटेरीनरी इ. उमेदवारसुद्धा पात्र आहेत. (इंटरडिसिप्लीमरी) यासाठी लेखी परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीमधील मूलभूत प्रश्नांवर आधारित असेल. उमेदवार वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क – रु.६००/- पुरुष उमेदवारांसाठी आणि रु. १००/- महिला उमेदवारांसाठी.

फेलोशिप –

(१) पीएच.डी.साठी रु. २५,०००/- दरमहा. पीएच.डी. रजिस्ट्रेशननंतर रु. २८,०००/-

(३) इंटिग्रेटेड – एमएस्सी – पीएच.डी.साठी

रु. १६,०००/- पहिल्या वर्षांसाठी. त्यानंतर

रु. २५,०००/- (पीएच.डी. रजिस्ट्रेशननंतर

रु. २८,०००/-) एमएस्सी बायोलॉजी विद्यार्थ्यांना रु. १६,०००/- दरमहा मिळतील.

परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, नागपूर इ.

ऑनलाइन अर्ज http://univ.tifr.res.in/

या संकेतस्थळावर दि. १२ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.