23 November 2017

News Flash

नोकरीची संधी

यरेक्टर एनएफएस्सी, नागपूर’ यांच्या नावे नागपूर येथे देय असावा.

सुहास पाटील | Updated: September 13, 2017 4:38 AM

*  नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (गृह मंत्रालय, भारत सरकार, नागपूर) येथे ‘सब ऑफिसर कोर्स’साठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता – (दि. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी) पदवी किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा (कोणतीही शाखा).

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०१८ रोजी) १८-२५ वर्षे (इमाव – २८ वर्षे, अजा/अज -३० वर्षेपर्यंत). पुरुष – उंची – १६५ सें.मी., छाती – ८१ ते ८६ सें.मी., वजन – ५० कि. महिला – उंची – १५७ सें.मी., वजन – ४६ कि.

परीक्षा शुल्क – रु. १००/-

(अजा/अज – रु. २५/-) डी.डी. – ‘डायरेक्टर एनएफएस्सी, नागपूर’ यांच्या नावे नागपूर येथे देय असावा.

कोर्समधील जागांचा तपशील –

४१ वी बॅच, ३० जागा.

४२ वी बॅच एक्स्टर्नल सब-ऑफिसर कोर्स – ३० जागा.

कोर्स जानेवारी, २०१८ आणि जुलै, २०१८ मध्ये सुरू होणार. ऑनलाइन अर्ज www.nfscnagpur.nic.in या संकेतस्थळावर दि. १९ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची पिंट्रआऊट दि. २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पुढील पत्त्यावर पाठवावेत.

प्रति, दि डायरेक्टर, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, टाकली, फिडर रोड, राजनगर, नागपूर-४४००१३. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘अ‍ॅप्लिकेशन फॉर ४१व्या ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर सब ऑफिसर कोर्स, २०१८’ असे ठळक अक्षरांत लिहावे.

*  नेव्हल डॉकयार्ड, मुंबई ‘अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग’साठी एकूण १११ पदांवर प्रवेश. (जाहिरात क्र. ओटी ०१/२०१७)

(ए) इलेक्ट्रॉनिक्स फिटर (४९ पदे). पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स.

(बी) जीटी फिटर (२५ पदे). पात्रता – डिझेल मेकॅनिक.

(सी) कॉम्प्युटर फिटर (१० पदे). पात्रता – आयटी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही किंवा मेकॅनिक्स कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम.

(डी) बॉयलर मेकर (१२ पदे). पात्रता – शिपराइट स्टील किंवा वेल्डर किंवा फिटर किंवा फोर्जर अँड हीट ट्रीटर.

(ई) व्हेपन फिटर (१५ पदे). पात्रता – मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स किंवा मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक.

सर्व पदांसाठी उमेदवार संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा – १४ ते २१ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट. इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, विकलांग – १० वर्षे, आयटीआय उमेदवारांसाठी – एनसीव्हीटी ट्रेनिंग कालावधी.) उंची – १३७ सें.मी., वजन – २५.४ कि. छाती – किमान ३.८ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

स्टायपेंड – नियमानुसार दिले जाईल. भरतीविषयक सूचना/मेरिट लिस्ट www.indiannavy.nic.in वर पाहावी.

निवड पद्धती – दोन तास कालावधीची १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा सप्टेंबर, २०१७ मध्ये मुंबई केंद्रावर घेतली जाईल.

पार्ट-ए – इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि अ‍ॅप्टिटय़ूड/रिझिनग

पार्ट-बी – संबंधित ट्रेडवर आधारित प्रश्न विचारले जातील.

ऑनलाइन अर्ज www.bhartiseva.com या संकेतस्थळावर २३ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २ सप्टेंबर २०१७ च्या अंकात पाहावी.

*  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती)तील निम्नस्तर लिपिक (मासं) (एलडीसी (एचआर) १८+९ पदे) व निम्नस्तर लिपिक (लेखा) (एलडीसी अकाऊंट – ८० पदे) या एकूण १०७ पदांची भरती. (अपंगांसाठी ३% जागा राखीव) (निम्नस्तर लिपिक (मासं)ची ९ पदे. महानिर्मिती कंपनीतील वेतनगट ३ व ४ मधील पदांवर किमान १ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी राखीव).

पात्रता

(१) एलडीसी (एचआर) – आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंटमधील पदवी एमएससीआयटी उत्तीर्ण.

(२) एलडीसी (अकाऊंट्स) – बी.कॉम.  एमएससीआयटी.

वयोमर्यादा – दि. २२ सप्टेंबर २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे. (मागासवर्गीय १८-४३ वर्षे) (अपंग/माजी सैनिक – ४५ वर्षे) (महानिर्मिती कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी ५७ वर्षे) (उमेदवार महाराष्ट्र सिव्हिल अधिनियम २००५ अंतर्गत विहित केलेल्या छोटे कुटुंब व्याख्यांमध्ये मोडणे ही एक आवश्यक पात्रता आहे.)

परीक्षा शुल्क – खुला गट – रु. ५००/- (मागासवर्गीय रु. ३००/-).

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा एकूण १०० गुणांची. मराठी भाषा, इंग्रजी भाषा, गणित (इयत्ता १०वीच्या पातळीचे), संगणकीय ज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित असेल.

चुकीच्या उत्तरासाठी गुण कमी करण्याची पद्धत अवलंबिली जाणार नाही.

ऑनलाइन अर्ज www.mahagenco.in <http://www.mahagenco.in/> या संकेतस्थळावर दि. २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावा.

ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता अडचण येत असल्यास संपर्क साधा.

०२२-४२०४०१८८/४२०४०२४० किंवा ई-मेल आयडी  hrhelpdesk@mahagenco.in.

First Published on September 13, 2017 4:38 am

Web Title: job opportunities in india job vacancies in india indian government jobs