इंडिया गव्हर्नमेंट िमट, हैद्राबादमध्ये ज्युनियर टेक्निशियन (डब्ल्यू-१ लेव्हल)च्या एकूण १४१ पदांची भरती.

फिटर (९९ पदे), लॅब असिस्टंट/इन्स्ट्रमेंट मेकॅनिक केमिकल (६ पदे), ड्रायव्हर कम मेकॅनिक (४ पदे), इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (५ पदे), मिल राइट मेकॅनिक (९ पदे), टर्नर (४ पदे), प्लंबर (४ पदे) इ.

पात्रता – १०वीसंबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण. पदविका धारण करणाऱ्यांना प्राधान्य.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९२ ते १ एप्रिल १९९९ दरम्यानचा असावा. ऑनलाइन अर्ज http://igmhyderabad.spmcil.com/ वर दि. २८ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागात साहाय्यक वनसंरक्षक (गट – अ) (६ पदे) आणि वनक्षेत्रपाल (गट – ब) (३७ पदे) भरतीकरिता महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा – २०१७दि. ४ जून २०१७ रोजी मुंबई</strong>, नागपूर, औरंगाबाद व पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर २०१७ रोजी आयोजित केली जाईल.

पात्रता –

(१) साहाय्यक वनसंरक्षक – वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/ वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/ प्राणिशास्त्र/कृषी इत्यादी विषयांतील पदवी उत्तीर्ण.

(२) वनक्षेत्रपाल – विज्ञान शाखेतील पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी साहाय्यक वनसंरक्षक – १८ ते ३८ वष्रे, वनसंरक्षक – २१ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय – ४३ वष्रेपर्यंत). शारीरिक मानके – उंची – पुरुष – १६३ सें.मी., महिला – १५० सें.मी. छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी. (अनुसूचित जमातीसाठी उंची पुरुष – १५२.५ सें.मी., महिला – १४५ सें.मी.) पुरुष – २५ कि.मी. आणि महिला – १४  कि.मी. अंतर ४ तासांत चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक. परीविक्षाधीन कालावधी दोन्ही पदांसाठी ३ वष्रे. प्रशिक्षण कालावधी दोन वष्रे.

निवड पद्धती – (१) पूर्वपरीक्षा – १०० गुण. (२) मुख्य परीक्षा – ४०० गुण.

(३) मुलाखत – ५० गुण. ऑनलाइन अर्ज  https://mahampsc.mahaonline.gov.in/ वर दि. २६ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.