News Flash

नोकरीची संधी

तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी केंद्रात उपस्थित राहण्याची तारीख ५ मे २०१७ रोजी सकाळी १० वा.

भारतीय कृषी संशोधन केंद्र, पुणे येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी थेट मुलाखत-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली भारतीय कृषी संशोधन केंद्र, पुणेची जाहिरात पाहावी. केंद्राच्या दूरध्वनी क्र. ०२०- २५८८९९६८ वर संपर्क साधावा अथवा www.iari.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी केंद्रात उपस्थित राहण्याची तारीख ५ मे २०१७ रोजी सकाळी १० वा.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या बायो- टेक्नॉलॉजी विभागात संशोधनपर संधी –

अर्जदारांनी बायो टेक्नॉलॉजी वा संबंधित विषयातील एमएस्सी वा एमटेक यांसारखी पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. याशिवाय त्यांनी ‘नेट’ वा ‘गेट’ यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली बनारस हिंदू विद्यापीठाच्या बायो- टेक्नॉलॉजी विभागाची जाहिरात पाहावी अथवा विभागाच्या www.iitbhu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी (उत्तर प्रदेश) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ मे २०१७.

इरकॉन इंटरनॅशनलमध्ये ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रिकलच्या) १० जागा-

अर्जदार इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इरकॉन इंटरनॅशनलची जाहिरात पाहावी अथवा इरकॉनच्या www.ircon.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मे २०१७.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग, नोएडा येथे ईडीपी सुपरवायझरच्या ३५ जागा –

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंगची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या http://www.nos.org/  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०१७.

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या २० जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इव्हेस्टिगेशन एजन्सीची जाहिरात पाहावी अथवा एजन्सीच्या www.nia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज डीआयजी (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ७ वा मजला, एनडीसीसी- २ बिल्डिंग, जयसिंह रोड, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० मे २०१७.

केंद्र सरकारच्या विमान वाहतूक मंत्रालयात विमान सुरक्षा साहाय्यकांच्या २३ जागा –

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीची जाहिरात पाहावी अथवा ब्युरोच्या www.bcasindia.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी डायरेक्टर (पर्सोनेल), ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, ए विंग, १-३ फ्लोअर, जनपथ भवन, जनपथ, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० मे २०१७.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2017 12:33 am

Web Title: job opportunities in maharashtra indian agricultural research
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास
2 ज्येष्ठ नागरिक धोरण
3 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजना
Just Now!
X