महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालयातील प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयांत लिपिक टंकलेखक पदांची भरती करण्यासाठी लिपिक – टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पूर्व परीक्षा – २०१७दि. १२ जून २०१७ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

एकूण रिक्त पदे – लिपिक, टंकलेखक (मराठी) – ३७०, लिपिक, टंकलेखक (इंग्रजी) – ३८.

पात्रता – एसएस्सी उत्तीर्ण मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. अर्हतेचे शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र.

वयोमर्यादा – दि.१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय – ४३ वष्रे, विकलांग – ४५ वष्रे.) परीक्षा पद्धती- पूर्व परीक्षा १०० गुण,  मुख्य परीक्षा ४०० गुण. परीक्षा शुल्क – रु. ३७३/- अमागास (रु. २७३/- मागासवर्गीय.)

ऑनलाइन अर्ज  https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. २६ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत बँक लिपिक वर्गीय पदांच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीकरिता मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिह्य़ांतील केंद्रांवर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षणासाठी प्रवेश.

पात्रता – महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जातीमधील उमेदवार असावा.  त्याचे वय १८ ते ३५ वष्रे.  पदवी उत्तीर्ण. प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु. ३,०००/- विद्यावेतन दिले जाईल.

पुढील ठिकाणच्या प्रशिक्षण संस्थांचे भ्रमणध्वनी क्र.

(१) नवी मुंबई (कामोठे) – ७२०८९८६१७१, ९१६७०५१३२१.

(२) ठाणे (पूर्व) –  ९८३३९१३६५२, ९९२०७४५७९४, ८१०८०१६४५५.

(३) कल्याण – ९८३३०७१४२६, ९००४३४८३३???????

(४) मुंबई (परेल) – ९८३३२८०५३१, ९७६९५२२७५९.

विहित नमुन्यातील अर्ज वरील संस्थांच्या कार्यालयामधून प्राप्त करून भरता येतील. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २१ एप्रिल २०१७ अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – पासपोर्ट आकाराचा फोटो, जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, पदवी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत. चाचणी परीक्षा दि. २३ एप्रिल २०१७ रोजी घेतली जाणार. यातील गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील.

स्पेशालिस्ट ऑफिसर्स रिक्रूटमेंट प्रोजेक्ट २०१७-१८ अंतर्गत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये असिस्टंट मॅनेजर (फिनान्शियल अ‍ॅनालिस्ट)च्या  १०० पदांची भरती.

(यूआर – ५०, इमाव – २७, अजा – १५, अज – ८)

(३ पदे विकलांगांसाठी राखीव ओसी – २,एचआय -१)

पात्रता – एमबीए (फायनान्स)/पीजीडीबीएम (फायनान्स)/सीए इ.

वयोमर्यादा – २१ ते ३० वष्रे. (अजा/अज – ३५वष्रे, इमाव – ३० वष्रे)

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा  मुलाखत. परीक्षा शुल्क – रु. ६००/- (अजा/अज/विकलांग रु. १००/-.) एक वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल.

ऑनलाइन अर्ज  http://www.obcindia.co.in/ वर दि. २६ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.