इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन – (सीआरपी-एसपीएल-७) कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस – स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांची सहयोगी बँकांत (ऑफिसर्स स्केल-१ पदांची) भरती.

१) आयटी ऑफिसर – पात्रता – बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स इ.)

२) अ‍ॅग्रिकल्चरल फिल्ड ऑफिसर – अ‍ॅग्रिकल्चर/ हॉर्टकिल्चर/ व्हेटेनिअरी सायन्स/डेअरी सायन्स इ. मधील पदवी.

३) राजभाषा अधिकारी – िहदी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवी इंग्रजी विषयासह) किंवा संस्कृत विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवी िहदी आणि इंग्रजी विषयांसह.)

४) लॉ ऑफिसर – एलएल.बी. अ‍ॅडव्होकेट म्हणून बार काऊंसिलकडे नोंद.

५) एचआर/पर्सोनेल ऑफिसर – पर्सोनेल मॅनेजमेंट/एचआर/ सोशल वर्क इ. मधील पदव्युत्तर पदवी.

६) मार्केटिंग ऑफिसर – एमबीए (मार्केटिंग).

वयोमर्यादा – २० ते ३० वष्रे.  – २० ते ३३ वष्रे, अजा/अज -२० ते ३५ वष्रे)

पूर्व परीक्षा – दि. ३० डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०१७ रोजी मुख्य परीक्षा दि. २८ जानेवारी, २०१८ रोजी.

ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर २७ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत दाखल करावेत.

शिक्षण सेवक होण्यासाठी सीईटी  महाराष्ट्र राज्य शिक्षक

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा दि. १२ ते २१ डिसेंबर, २०१७ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील ‘शिक्षण सेवक’ पदांच्या भरतीकरिता.

एका उमेदवारास जास्तीत जास्त ५ वेळा सदर चाचणी देता येईल. २०० गुणांसाठी परीक्षा ऑनलाइन  पद्धतीने होईल.

१) अभियोग्यता १२० प्रश्न, १२० गुण. गणितीय क्षमता, ताíकक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी/मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन, व्यक्तिमत्त्व इ.

२) बुद्धिमत्ता -८० प्रश्न, ८० गुण.

पात्रता – पहिली ते आठवीमधील

शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण.

नववी ते बारावीमधील शिक्षक पदाकरिता विहित पात्रताधारक.

फी रु. ५००/- (अजा/अज/विकलांग – रु. २५०/-).

ऑनलाइन अर्ज  https://www.mahapariksha.gov.in/ या संकेतस्थळावर २२ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.