19 January 2019

News Flash

नोकरीची संधी

वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवीधर पात्र नाहीत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला बाल विकास अधिकारी / अधीक्षक / सांख्यिकी अधिकारी गट च्या एकूण ४५ पदांची भरती.

(सरळसेवा भरती जाहिरात क्र. २२/२०१८)

(अजा-६, अज-३, विजा (अ)-२ भज (ब)-१ (क)-१,  विमाप्र.-१, इमाव – ८,अमागास -२३)

पात्रता – आर्ट्स / सायन्स / कॉमर्स / अ‍ॅग्रिकल्चर / लॉ / सोशल वर्क / सायकॉलॉजी / होम सायन्स / न्यूट्रीशन विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.

(वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवीधर पात्र नाहीत.)

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी अमागास ३८ वर्षांपर्यंत, मागासवर्गीय ४३ वर्षांपर्यंत

निवड पद्धती – अर्जाची संख्या जास्त असल्यास उच्च अर्हतेनुसार उमेदवार शॉर्ट लिस्ट केले जातील किंवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.

परीक्षा शुल्क – रु. ३७४ (मागासवर्गीय रु. २७४)

ऑनलाइन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. ९ एप्रिल २०१८पर्यंत करावेत. विस्तृत जाहिरात https://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्सपदांची भरती.

(१) स्पेशल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह – ३५ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ९, जन – १९) (१ पद ओएचसाठी राखीव).

पात्रता – एमबीए (फायनान्स)/सीए/ आयसीडब्ल्यूए/एसीएस आणि ५ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी ३० ते ४० वष्रे.

वेतन – रु. १८ लाख प्रतिवर्ष.

(२) डेप्युटी मॅनेजर (लॉ) (रेग्युलर) – ८२ पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – २२, जन – ४२) (३ पदे ओएचसाठी राखीव)

पात्रता – कायदा विषयातील पदवी आणि ४ वर्षांची प्रॅक्टिस.

वयोमर्यादा – २५ ते ३५ वष्रेपर्यंत.

वेतन – रु. १५.१० लाख प्रतिवर्ष.

निवड पद्धती – पद क्र.१ साठी मुलाखत. पद क्र. २ साठी लेखी परीक्षा आणि मुलाखतत.

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- (अजा/अज/विकलांग – रु. १००/-)

ऑनलाइन अर्ज  https://www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर दि. ७  एप्रिल, २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

First Published on April 5, 2018 1:19 am

Web Title: job opportunities job alert 7