भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित (भारत सरकारचा उपक्रम) एससीआयच्या मेरिटाइम ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, पवई, मुंबई येथे १ ऑक्टोबर २०१७ पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअर्स (जीएमई)कोर्ससाठी प्रवेश.

एकूण जागा ६० (यूआर – ४०, इमाव – ११, एस्सी – ६, एसटी – ३)

पात्रता – बी. ई. (मेकॅनिकल) (अविवाहित पुरुष.)

वय – दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी कमाल २८ वष्रे, (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज – ३३ वष्रे.) दहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड रु. १५,०००/- दरमहा.

ऑनलाइन अर्ज  www.shipindia.com/careers/fleet-personnel.aspx या संकेतस्थळावर दि. २३ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरतर्फे होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटमार्फत डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स (डिप. आर.पी.) कोर्ससाठी प्रवेश.

हा कोर्स रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर होण्यासाठी महत्त्वाचाआहे.

एकूण प्रवेश ३० जागा (२५ नॉन-स्पाँसर्ड ५ स्पाँसर्ड्). कोर्स ऑक्टोबर, २०१७ पासून सुरू होणार. कालावधी एक वर्ष.

या कोर्समध्ये रेडिएशन फिजिक्समधील अभ्यास, प्रॅक्टिकल्स आणि फिल्ड ट्रेिनग (जे मेडिकल फिजिसिस्ट आणि रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर या पदांवर काम करणाऱ्यासाठी आवश्यक आहे.) मिळेल.

पात्रता – फिजिक्स विषयातील एमएससी (बीएससी/एमएससी किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण). एमएससीच्या अंतिम वर्षांच्या निकालाची वाट पाहणारे उमेदवार कोर्ससाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

कमाल वयोमर्यादा – दि. १ऑक्टोबर २०१७ रोजी २६ वष्रे (इमाव – २९, अजा/अज – ३१, विकलांग – ३६ वष्रे.)

निवड पद्धती – लेखी परीक्षा. मुलाखत. अंतिम निवड मुलाखतीतील कामगिरीवर आधारित.

एमएससी (फिजिक्स) उमेदवार जे ओसीईएस-२०१७ या कोर्ससाठी बीएआरसी ट्रेिनग स्कूलच्या प्रतिज्ञा यादीवर (वेटलिस्टेड) आहेत त्यांना डिप. आर. पी. कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो.

स्टायपेंड – रु. ९,३००/- दरमहा.

कोर्ससाठी प्रवेश घेताना अ‍ॅडमिशन फी रु. ३,000/- भरावी लागेल. (‘अकाऊंट्स ऑफिसर एचबीएनआय’ यांच्या नावे काढलेला डीडी मुंबई येथे देय असावा.)

अणुशक्ती नगर, मुंबई येथे हॉस्टेल अकोमोडेशन दिले जाईल. यशस्वीरीत्या कोर्स पूर्ण केल्यावर उमेदवारांना ‘पोस्ट एमएससी डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स’ दिला जाईल. मेडिकल फिजिसिस्ट म्हणून रेडिओथेरपी सेंटरमध्ये काम करण्यासाठी अ‍ॅटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डच्या नियमांनुसार उमेदवारांना एआरईबी मान्यताप्राप्त रेडिओलॉजिकल सेंटरमध्ये १ वर्षांसाठी मेडिकल फिजिक्स इंटर्नशिप करावी लागेल. रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर (मेडिकल) आणि आरएसओ (इंडस्ट्रियल) सर्टििफकेशनसाठी वेगवेगळी परीक्षा द्यावी लागेल. आरएसओ (इंडस्ट्रियल) साठी इंटर्नशिप आवश्यक नाही. या कोर्सच्या निवडीसाठी मुलाखती दि. ४ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०१७ दरम्यान न्यू ट्रेिनग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्ती नगर, मुंबई – ४०००९४ येथे होतील.

परीक्षा शुल्क – रु. २००/- (अजा/ अज/विकलांग/महिला यांना फी माफ.)

बीएआरसीच्या संकेतस्थळावरून चलान डाऊनलोड करून उमेदवार एसबीआयमध्ये फी भरू शकतात. ऑनलाइन अर्ज  recruit.barc.gov.in या संकेतस्थळावर दि.२१ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

३ ऑगस्ट रोजी लोकसत्तामध्ये नोकरीच्या संधीह्ण या सदरातून प्रसिद्ध झालेल्या  स्टाफ सिलेक्शन कमिशन इंडिया मेटीओरॉलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये सायंटिफिक असिस्टंटची भरती

यासाठीची अर्ज भरण्याची तारीख ४ ऑगस्टवरून १४ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुकांनी त्याचा फायदा घ्यावा. अर्ज काळजीपूर्वक भरावा. कारण फक्त एकच अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज या  http://ssconline.nic.in संकेतस्थळावर दि. १४ ऑगस्ट २०१७ (१७.००)वाजेपर्यंत करावेत. एसबीआय चलनामार्फत फी भरणाऱ्यांनी जर चलान १४ ऑगस्ट २०१७ रोजी (१७.००)वाजेपर्यंत जनरेट केले असेल तर फी १८ ऑगस्ट २०१७ पर्यंत भरता येईल.