21 October 2018

News Flash

नोकरीची संधी

डोपिंग  कंट्रोल ऑफिसरला सँपल कलेक्शनमध्ये मदत करणे.

नॅशनल अ‍ॅण्टी डोपिंग एजन्सी, (एनएडीए) नवी दिल्ली येथे पुढील पदांची भरती.

१) डोपिंग  कंट्रोल ऑफिसर (डीसीओ) आणि ब्लड कलेक्शन ऑफिसर (बीसीओ.)

पात्रता – डीसीओसाठी विज्ञान विषयातील पदवी.

बीसीओसाठी – नìसग/मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी पदवी किंवा बीडीएस/एमबीबीएस (राज्य/केंद्र सरकारच्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.)

वयोमर्यादा – २५ ते ४५ वष्रेपर्यंत. कामाचे स्वरूप – डब्ल्यूएडीए  (WADA) च्या निर्देशानुसार सँपल कलेक्शन करणे. मोबदला – रु. १,०००/- दिवसाला ५ सँपल्ससाठी अधिकच्या सँपल्ससाठी प्रत्येकी रु. १००/- (दिवसाला एकूण जास्तीत जास्त मोबदला रु. १,५००/-.)

२) शेपेरॉन (Chaperone) (संरक्षक) –

पात्रता – बारावी उत्तीर्ण. इष्ट पात्रता – संगणकाचे ज्ञान. (केंद्र/राज्य सरकारच्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.)

कामाचे स्वरूप – डोपिंग  कंट्रोल ऑफिसरला सँपल कलेक्शनमध्ये मदत करणे.

वयोमर्यादा – १८ ते ४५ वष्रे. मोबदला – दिवसाला रु. ५००/- (५ सँपल्स कलेक्शनसाठी  प्रत्येक अधिकच्या सँपलसाठी प्रत्येकी रु. ५०/-) एकूण रु. १,०००/- मात्र. विस्तृत जाहिरात www.nadaindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध.

पुढील माहिती असलेला अर्ज (ए-४ आकाराच्या कागदावर) ज्यावर उमेदवाराने आपला पासपोर्ट साइज फोटो चिकटवून साक्षांकित करावा. जसे की नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, शैक्षणिक अर्हता, नोकरी करत असल्यास त्याची माहिती, ई-मेल अ‍ॅड्रेस, संपर्कासाठी फोन नंबर, कायमचा पत्ता, एकूण अनुभव, कोणत्या शहरात काम करण्यास इच्छुक आहात इ.

अर्जाच्या लिफाफ्यावर ‘Application for the Empanelment of DCO/BCO/Chaperone’ असे नमूद करून ‘डायरेक्टर जनरल, नॅशनल अँटी डोपिंग  एजन्सी, ए-ब्लॉक, प्रगती विहार हॉस्टेल, लोधी रोड, नवी दिल्ली – ११० ००३’ या पत्त्यावर दि. ५ जानेवारी, २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

First Published on January 4, 2018 1:30 am

Web Title: job opportunities job issue 4