केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात असिस्टंट अकाउंट्स ऑफिसरच्या ७ जागा

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४ ते २० ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट डायरेक्टर (पर्सोनेल बी), पोस्ट बॉक्स नं. ३००३, लोधी रोड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१७.

केंद्रीय सूचना आयोगात सेक्शन ऑफिसरच्या ७ जागा

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१ ते २७ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय सूचना आयोगाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील व तपशीलवार भरलेले अर्ज डेप्युटी सेक्रेटरी (अ‍ॅडमिन), सेंट्रल इन्फर्मेशन कमिशन, रूम नं. ३०२, दुसरा मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा लेन, नवी दिल्ली ११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१७.

ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे येथे वरिष्ठ संशोधक म्हणून संधी

अर्जदार कृषी विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना १० वर्षांचा अनुभव असावा अथवा ते याच विषयांतील पीएच.डी. असावेत व त्यांना संशोधनपर कामाचा ६ वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली कृषी विज्ञान केंद्र, नारायणगावची जाहिरात पाहावी अथवा केंद्राच्या  http://www.kvknarayangaon.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अध्यक्ष, ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे ४१०५०४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१७.

तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट म्हणून संधी

अर्जदारांनी इंजिनीअरिंगमधील पदवी कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांचा जन्म १ जुलै १९९३ ते ३० जून १९९७ च्या दरम्यान झालेला असावा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली तटरक्षक दलाची जाहिरात पाहावी अथवा तटरक्षक दलाच्या http://joinindiancoastguard.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१७.

बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशल ऑफिसर्सची भरती.

अर्जदार पदवीधर व मार्केटिंगमधील पदविकाधारक अथवा एमबीए असावेत आणि त्यांना संबंधित कामाचा बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील कमीत कमी १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली बँक ऑफ बडोदाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या  https://www.bankofbaroda.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१७.