News Flash

नोकरीची संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व संबंधितविषयातील कौशल्य निपुण असायला हवेत.

*   हिंदुस्थान इन्सेक्टिसाइड्स लि. रसायनी-रायगड येथे सुरक्षा अधिकारी म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली हिंदुस्थान इन्सेक्टिसाइड्सची जाहिरात पाहावी अथवा एचआयएलच्या www.hil.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर अ‍ॅण्ड ए), हिंदुस्थान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड, पोस्ट रसायनी-४१०२०६ (जि. रायगड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०१७.

*  प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाऊंट्स, बंगलोरअंतर्गत कॅन्टीन अटेंडंट्सच्या १३ जागा-

वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी व ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाऊंट्स, बंगलोरची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाऊंट्स १०७, लोअर अग्रम रोड, अग्रम पोस्ट, बंगलोर- ५६०००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१७.

*  संरक्षण मंत्रालयांतर्गत नागरी सुरक्षा सेवा केंद्र, पुणे येथे टीनस्मिथ व सुतार म्हणून संधी-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व संबंधितविषयातील कौशल्य निपुण असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय, नागरी सुविधा केंद्र, पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज प्रशासकीय अधिकारी, 65 COY ASC (Sup) टाइप सी क्र. १, डॉ. कोयाजी रोड, मराठा वॉर मेमोरियल, पुणे-४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०१७.

*   जीआयसी आरई- मुंबईअंतर्गत अधिकारपदाच्या संधी-

अर्जदार अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, कायदा वा कंपनी सेक्रेटरी यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली जीआयसी आरई, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा जीआरईच्या www.gicofindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०१७.

*   डीआरडीओअंतर्गत हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लेबॉरेटरी, पुणे येथे करारतत्त्वावर निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून संधी-

अर्जदार एमबीबीएस पात्रताधारक असावेत व त्यांना प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली डीआरडीओ पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज संचालक, हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लेबॉरेटरी, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सुतारवाडी, पुणे-४११०२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०१७.

*   चीफ कमिशनर ऑफ कस्टम्सअंतर्गत खेळाडूंसाठी टॅक्स असिस्टंटच्या ७ जागा-

अर्जदार पदवीधर असावेत व त्यांनी क्रीडाविषयक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली कस्टम्स विभागाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम्स, चीफ कमिशनर ऑफिस, कस्टम्स हाऊस, १५/१ स्ट्रॅण्ड रोड, कोलकोता- ७००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१७.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:43 am

Web Title: job opportunities jobs in india job vacancies in india recruitment employment
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : मुद्देसूद अभ्यास
2 करिअरमंत्र
3 नोकरीची संधी
Just Now!
X