महापोलीस भरती २०१७ – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅन्ड्समन), कारागृह शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई यांची महाराष्ट्रातील ३५ जिह्यंमध्ये भरती.

३५ शहर विभाग – ४४२२ पदे.

सहा ग्रामीण विभाग – ५७७ पदे,

राज्य राखीव पोलीस दल (१६ कॅम्प्स) – ६८३ पदे,

मुंबई, पुणे, नागपूर लोहमार्ग पोलीस – २८९ पदे.

एकूण ५,९७१ पदे.

१०० पेक्षा जास्त रिक्त पदे असलेले जिल्हे घटक आस्थापना

(१)    औरंगाबाद ग्रामीण – ११४,  शहर – ३३, एसआरपी – ३०

(२)    दौंड एसआरपी – ६६+५४

(३)    धुळे – शहर – ४६, एसआरपी- ५६

(४)    गडचिरोली – शहर – १६९,

(५)    मुंबई – शहर – १७१७, लोहमार्ग – २१८, एसआरपी – ४३

(६)    नागपूर – शहर – २४०, ग्रामीण – १६१, एसआरपी – ९३, लोहमार्ग – ३८

(७)    नाशिक – शहर – ७२, ग्रामीण – ७२

(८)    नवी मुंबई – शहर – १७७

(९)    ठाणे – शहर – २७३, एसआरपी – ४६

(१०) पालघर – १५९

(११) पुणे – शहर – २३१, ग्रामीण – १४३,        एसआरपी- ५३+५०, लोहमार्ग -३३

(१२) रायगड – १०६

संबंधित पोलीस घटकाच्या आस्थापनेवर आपल्या प्रवर्गासाठी रिक्त पदे आहेत. याची खात्री करूनच त्या प्रवर्गासाठी अर्ज करावा. उदा. ठाणे शहर विभागासाठी एकूण रिक्त पदे २७३ (अजा -६७, इमाव – २०२, विमाप्र – ४) येथे खुल्या प्रवर्गासाठी एकही पद रिक्त नाही.

वेतन श्रेणी – रु. ५,२००/-२०,२००/-  ग्रेड पे रु. २,०००/-

पात्रता – १२वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. ३१ मार्च २०१७ रोजी १८ ते २८ वष्रे (मागास प्रवर्ग १८ ते ३३ वष्रे).

शारीरिक पात्रता – उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १५५ सें.मी. छाती – पुरुष – ७९ सें.मी.-८४ सें.मी. (अनुकंपा तत्त्वावरील भरतीत उंचीमध्ये २.५ सें.मी.ची सूट तसेच छातीचे मोजमाप ७७ सें.मी. ते ८०.५ सें.मी.).

मुंबई शहरातील एकूण १७१७ रिक्त पदांमधून ३९ पदे. बँड्समन पोलीस शिपाईसाठी राखीव आहेत.

पात्रता – १०वी उत्तीर्ण. शारीरिक पात्रता – उंची – पुरुष – १६२.५ सें.मी. महिला – १५२.५ सें.मी. छाती – पुरुष – ७७ सें.मी.-८०.५ सें.मी.

परीक्षा शुल्क – रु. ३५० /- (मागासवर्गीयांसाठी रु. २००/-)

निवड पद्धती – या वर्षी प्रथम शारीरिक मोजमाप त्यानंतर मदानी चाचणी, लेखी चाचणी व तदनंतर तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात येणार. तात्पुरत्या निवड यादीतील पात्र उमेदवारांचीच कागदपत्र पडताळणी करण्यात येईल व नंतर पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

मदानी चाचणी – एकूण १०० गुणांसाठी असेल. यामध्ये धावणे, गोळाफेक, लांब उडी आणि पुलअप्स या घटकांचा समावेश होईल.

१६०० मीटर धावणे पुरुषांसाठी, तर त्याच वेळी ८०० मीटर धावणे महिलांसाठी असेल. यासोबतच १०० मीटर धावण्याची शर्यत असेल. गोळाफेकीच्या बाबतीत पुरुषांसाठी ७.५ किलोचा गोळा तर महिलांसाठी ४ किलोचा गोळाफेक स्पर्धा असेल. लांब उडी महिला आणि पुरुष दोघांसाठी असेल, परंतु पुलअप्स मात्र फक्त पुरुषांसाठी असतील.

पोलीस दलात भरती होण्यासाठी धावण्याची चाचणी घेतली जाते. यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उमेदवाराच्या अंगावर एक चिप चिकटविली जाईल. या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल.

लेखी चाचणी – मदानी चाचणीमध्ये ज्या उमेदवारांना किमान ५० गुण मिळतील अशांनाच लेखी चाचणीसाठी बोलाविले जाईल. लेखी चाचणीमध्ये १०० गुणांसाठी – बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. कालावधी ९० मिनिटे. मदानी चाचणीचे ठिकाण जाहिरातीत नमूद केलेले असेल. लेखी चाचणीचे ठिकाण नंतर कळविण्यात येईल. निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पॅनकार्ड/आधार कार्ड/महाविद्यालयाचे ओळखपत्र/ड्रायिव्हग लायसन्स यांपकी एक फोटो असलेले ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. वैद्यकीय चाचणीत दृष्टिदोष, तिरळेपणा, रातांधळेपणा, वर्णाधळेपणा, गुडघ्यास गुडघा लागणे, सपाट तळवे, त्वचारोग, छातीचे रोग, तोतरेपणा, इ. चाचण्यांचा समावेश असेल. ऑनलाइन अर्ज https://mahapolice.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १७ मार्च २०१७ (२४.००वाजेपर्यंत) करावेत.