पर्यावरण व वन मंत्रालयांतर्गत वन्यप्राणी अपराध नियंत्रण ब्यूरोमध्ये इन्स्पेक्टरच्या ५ जागा :

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ सप्टेंबर २०१७ च्या अंकातील जाहिरात पहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडिशनल डायरेक्टर, वाइल्ड लाइफ कंट्रोल ब्यूरो, त्रिकूट-१, भिकाजी कामा लेन, नवी दिल्ली- ११००६६. या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१७.

केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळात संशोधकांच्या १३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकातील जाहिरात पहावी अथवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या www.cpcb.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन रिक्रुटमेंट सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, परिवेश भवन, ईस्ट अर्जुन नगर, शहादरा, नवी दिल्ली- ११००३२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१७.

कृषी विज्ञान केंद्र- हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे चालक म्हणून संधी :

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व वैध वाहन चालनाचा परवानाधारक असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकातील प्रकाशित झालेली कृषी विज्ञान केंद्र – हातकणंगलेची जाहिरात पहावी अथवा केंद्राच्या  www.cpcb.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन फाउंडेशनचे कृषी विज्ञान केंद्र, पोस्ट तलसांडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ४१६११२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१७.

कंबॅट व्हेईकल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट एस्टॅब्लिशमेंट, चेन्नई येथे कुशल कामगारांच्या १४६ जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० नोव्हेंबर २०१७ च्या अंकातील प्रकाशित झालेली कंबॅट व्हेईकल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट एस्टॅब्लिशमेंटची जाहिरात पहावी अथवा  https://rac.gov.in किंवा https://rac.gov.in/cgibin/2017/advt-cvrde-pprcuties या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१७.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मुख्य कायदा अधिकारी म्हणून संधी :

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली मुंबई पोर्ट ट्रस्टची जाहिरात पहावी अथवा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ६६६. http://www.mumbaiport.gov.in>media/vacancy  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०१७.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा विकास यंत्रणा, पुणे अंतर्गत गट समन्वयक पदाच्या १२ जागा  –

अर्जदार समाजशास्त्र वा समाजकार्य विषयातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, एमबीए अथवा ग्राम विकास विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा ३८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली जिल्हा विकास यंत्रणा, पुणेची जाहिरात पहावी अथवा यंत्रणेच्या http://www.punezp.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नवीन जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, १ वेलेस्ली रोड, पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१७.

चेनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्टमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या ४० जागा-

उमेदवारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, संगणक इंजिनीअरिंगची पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकातील चेनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्टची जाहिरात पहावी अथवा कंपनीच्या https://cvppindia.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१७.