इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. देशभरातील आपल्या ऑइल रिफायनरीजमध्ये ट्रेड अ‍ॅप्रेंटिस’ (एकूण १०१ पदे) भरती.

गुजरात रिफायनरी (वडोदरा) येथील

रिक्त पदांचा तपशील.

१) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – सेक्रेटरियल असिस्टंट/१२ महिने. रिक्त पदे ११

(यूआर – ७, अज – २, इमाव – २)

पात्रता – बी.ए./बी.कॉम्./बी.एस्सी. पदवी किमान सरासरी ५५% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग – ५०% गुण)

२) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – अकाऊंटंट/१२ महिने.

रिक्त पदे – ३ (यूआर – २, इमाव – १)

पात्रता – बी.कॉम. किमान सरासरी ५५%  गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग – ५०%  गुण आवश्यक)

वयोमर्यादा – दि. ३१ जानेवारी, २०१८ रोजी १८ ते २४ वष्रेपर्यंत (अजा/अज – २९ वष्रे, इमाव – २७ वष्रेपर्यंत)

निवड पद्धती – दोन तास कालावधीची लेखी परीक्षा आणि मुलाखत यातील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. स्टायपेंडव्यतिरिक्त उमेदवारांना दर महिन्याला रु. २,५००/- इतर खर्चासाठी दिले जातील.

कोणत्याही एका रिफायनरीमध्ये ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी www.iocl.com या संकेतस्थळावर what’s new ? click on Engagement of non-techniqual apprentices 2018 in IOCL Refineries Division या लिंकला भेट द्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ फेब्रुवारी २०१८ आहे. ऑनलाइन अर्जाची िपट्र आऊट स्वाक्षरी करून संबंधित रिफायनरीकडे

दि. १७ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. गुजरात रिफायनरीसाठी अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावेत.

‘डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., पोस्ट-जवाहर नगर, डिस्ट्रिक्ट वडोदरा-३९१ ३२०, गुजरात’.

लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी २०१८ ला होईल, तर मुलाखत दि. ५/६ मार्च २०१८ रोजी होईल.

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (गृह मंत्रालय) पुरुष उमेदवारांची हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिकल) पदांवर भरती.

१) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – ६० पदे. (यूआर – २३, अजा – १२, अज – ३,

इमाव – २२)

पात्रता – १२वी उत्तीर्ण. मोटर मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय ३ वर्षांचा अनुभव किंवा ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग डिप्लोमा.

२) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – १८१ पदे. (यूआर – ८५, अजा – ३१, अज – १७, इमाव – ४८)

पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि मोटर मेकॅनिकल ट्रेडमधील आयटीआय सर्टििफकेट किंवा ३ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. ८ फेब्रुवारी, १९३३ ते ७ फेब्रुवारी २००० दरम्यानचा असावा. (कमाल वयोमर्यादेत सूट. इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रेपर्यंत, सरकारी कर्मचारी – १५ वष्रेपर्यंत.)

शारीरिक मापदंड – उंची – १७० सें.मी.

(अज – १६२.५ सें.मी.) छाती – ८०-८५ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.)

निवड पद्धती – मूळ कागदपत्र पडताळणी, हाइटबार टेस्ट,

शारीरिक क्षमता चाचणी (PET) – पात्रता स्वरूपाची १.६ कि.मी. ७.३० मिनिटांत धावणे, लांब उडी – ११ फूट (३ संधी), उंच उडी – साडेतीन फूट (३ संधी), शारीरिक मापदंड टेस्ट,

लेखी परीक्षा – ५० गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाची

सामान्य ज्ञान – १० गुण, हिंदी – १० गुण, गणित – ५ गुण, इंग्लिश – १० गुण, ट्रेडसंबंधित प्रश्न – १५ गुण. कालावधी १ तास. (हिंदी/इंग्रजी भाषेत प्रश्न) उमेदवारांना डटफ उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी सोबत नेता येईल.

प्रॅक्टिकल टेस्ट – व्हेइकल इन्स्पेक्शन – १५ गुण, फॉल्ट शोधणे – १५ गुण, गाडीतील दोष दूर करणे – १५ गुण, टूल्स हाताळणे – ५ गुण.

एकूण ५० गुण. मेरिट लिस्ट, टाय केसेस सोडविणे, वैद्यकीय तपासणी.

फक्त एका पदासाठीच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज बाद ठरविले जातील.

अर्जाचे शुल्क – रु. १००/- ऑनलाइन पेमेंट गेटवेमार्फत (अजा /अज/माजी सनिक यांना

फी माफ आहे.) ऑनलाइन अर्ज www.recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर दि. ७ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com