भारतीय नौदल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकूण ९५ फायरमनपदांची भरती.

(अजा – १४, अज – ७, इमाव – २७, खुला ४५) (९ पदे माजी सनिक आणि १ पद विकलांग  एचएसाठी राखीव)

पात्रता – १० वी उत्तीर्ण, ‘फायरमन’ पदाची कामे करण्यासाठी शारीरिक सक्षम असावा.

वयोमर्यादा – दि. २० मे २०१८ रोजी १८ ते २५ वष्रे (उच्चतम वयोमर्यादा इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रे, विकलांग – ३५/३८/४० वष्रेपर्यंत)

वेतन – पे-मॅटिक्स – लेव्हल-२ –  १९.९००/- ६३,२००/-, रु. २८,०००/- प्रतिमाह.

निवड पद्धती –

(अ) १० वीतील गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची (i) सामान्य बुद्धिमत्ता, (ii) न्यूमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड, (iii) जनरल इंग्लिश, (्र५) जनरल अवेअरनेस, (५) जनरल अवेअरनेस ऑन फायर फायटिंग. या विषयांची (प्रत्येकी २० गुण) ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची लेखी परीक्षा एकूण १०० गुणांसाठी घेतली जाईल.

(ब) शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी) – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना पीईटीसाठी बोलाविले जाईल. शारीरिक मापदंड – उंची – १६५ सें.मी. (अज उमेदवारांसाठी १६५.५ सें.मी.). छाती – ८१.५ – ८५ सें.मी.

वजन – किमान ५० कि.

(क) पीईटी – (ii) ६३.५ कि. वजनाचा माणूस उचलून १८३ मी. अंतर ९६ सेकंदांत पार करणे. (ii) २.७ मी. लांबीचा खंदक लांब उडी मारून (दोन्ही पायांवर) पार करणे. (iii) ३ मी. उंच दोरखंड हातापायाचा वापर करून चढणे. पीईटी उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.

लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणीची नेमकी तारीख, वेळ व ठिकाण उमेदवारांना त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर  तसेच www.bhartiseva.com आणि www.indiannavy.nic.in या संकेतस्थळांवर सूचित केले जाईल. लेखी परीक्षा आणि पीईटी, मुंबई येथे घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज www.bhartiseva.com या संकेतस्थळावर दि. २० मे २०१८ पर्यंत करावेत.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पुढील कागदपत्रे जेपीईजी/पीडीएफ फॉरमॅटमध्ये स्कॅन करून ठेवावीत. रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो (पुसट/पांढऱ्या पाश्र्वभूमीवरील), उमेदवाराची सही, जातीचा दाखला, जन्मतारखेचा दाखला (एसएससी प्रमाणपत्र), १० वी गुणपत्रक इ.

युनियन पब्लिक सíव्हस कमिशन (यूपीएससी) सेंट्रल आम्र्ड पोलीस फोस्रेस (असिस्टंट कमांडंट्स) एक्झामिनेशन – २०१८दि. १२ ऑगस्ट २०१८ रोजी घेणार.

सेंट्रल आम्र्ड पोलीस फोस्रेस (सीएपीएफ) मधील रिक्त पदांचा तपशील –

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) – ६० पदे.

सेंट्रल रिझव्‍‌र्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) – १७९ पदे.

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) – ८४ पदे.

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) – ४६ पदे.

सीमा सुरक्षा दल (एसएसबी) – २९ पदे.

एकूण ३९८ पदे.

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण. (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वष्रे (इमाव – २८ वष्रेपर्यंत, अजा/अज – ३० वष्रेपर्यंत). फी – रु. २००/- (अजा/अज/महिला उमेदवारांना फी माफ)

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १५७ सें.मी., वजन – पुरुष – ५० कि., महिला – ४६ कि., छाती – पुरुष – ८१-८६ सें.मी.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर इ.

निवड पद्धती – (१) लेखी परीक्षा – पेपर – १- जनरल अ‍ॅबिलिटी अ‍ॅण्ड इंटेलिजन्स – २५० गुण. कालावधी दोन तास. (एमसीक्यू) पेपर-२ – जनरल स्टडीज, निबंध आणि कॉम्प्रिहेन्शन – २०० गुण, कालावधी तीन तास (निबंध िहदी किंवा इंग्रजीमधून, इतर कॉम्प्रिहेन्शन पार्ट फक्त इंग्रजी भाषेतून.)

(२) शारीरिक मापदंड

(३) शारीरिक क्षमता चाचणी –

(पीईटी) (अ) १०० मीटर धावणे – पुरुष – १६ सेकंदांत, महिला – १८ सेकंदांत, (ब) ८०० मी. धावणे – पुरुष – ३ मि. ४५ सेकंद, महिला – ४ मि. ४५ सेकंद, (क) लांब उडी – पुरुष -३.५ मी. (३ संधी), महिला – ३ मी. (३ संधी), (ड) गोळा फेक (७.२६ कि.) – पुरुष – ४.५ मी.

(४) मुलाखत – १५० गुण.

अंतिम निवड – लेखी परीक्षा आणि मुलाखत यांतील गुणवत्तेनुसार.

ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २१ मे २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com