सैन्यदलात कायदा पदवीधरांसाठी विशेष संधी

सैन्यदलाच्या शॉर्ट सव्‍‌र्हिस योजनेअंतर्गत कायदा पदवीधरांसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत –

जागांची संख्या व तपशील : योजनेअंतर्गत उपलब्ध जागांची संख्या २० असून यापैकी १३ जागा पुरुष उमेदवारांसाठी तर ७ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत.

आवश्यक पात्रता : अर्जदारांनी बारावीनंतरची ५ वर्षे कालावधीची पदवी परीक्षा कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी झालेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २१ ते २६ वर्षांच्या दरम्यान असायला हवे व त्यांचा जन्म २ जानेवारी १९९० ते १ जानेवारी १९९६ च्या दरम्यान झालेला असावा.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्य निवड मंडळातर्फे मुलाखतीसाठी बोलविण्यात येऊन त्यानुसार करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक सैन्यदलाच्या कायदा विभागात शॉर्ट सव्‍‌र्हिस योजनेअंतर्गत करण्यात येईल.

अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या २३ ते २९ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पहावी अथवा सैन्यदलाच्या ६६६.्न्रल्ल्रल्ल्िरंल्लं१े८.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१६ आहे.

 

नॅशनल बँक फॉर ॅग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट (एनएबीएआरडी) मध्ये डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट (िहदी) या पदांची भरती.

एकूण ८५ पदे (मुंबई मुख्यालयात एकूण ९ जागा) (अजा- २, अज- १, इमाव- १, खुला- ५)

पात्रता – किमान ५० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग यांना गुणांची अट नाही.)

वयोमर्यादा – दि. ३१ जुल २०१६ रोजी १८ ते ३५ वष्रे. (अजा/अज – १८ ते ४० वष्रे, इमाव- १८ ते ३८ वष्रे, परित्यक्ता/विधवा महिला – १८ ते ४५ वष्रे)

निवडपद्धती – पूर्वपरीक्षा (१०० गुणांसाठी कालावधी १ तास) आणि मुख्य परीक्षा (२०० गुणांसाठी कालावधी बहुपर्यायी प्रश्नांसाठी १५० गुण, ९० मिनिटे आणि वर्णनात्मक प्रश्नांसाठी – ५० गुण, ३० मिनिटे )

परीक्षापूर्व प्रशिक्षण – अजा/अज/ इमाव/विकलांग यांच्यासाठी नाबार्ड विनामूल्य देणार. अर्ज कसा करावा- अर्जाचे रजिस्ट्रेशन, परीक्षा शुल्क रु. ४५०/- (अजा/अज/ रु. ५०/-), फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावे.

अर्ज www.nabard.org http://www.nabard.org/ या संकेतस्थळावर दि. २० सप्टेंबर २०१६ पर्यंत करावेत.

 

केंद्र शासित दादरा नगर हवेली प्रशासनात सहकार अधिकारी म्हणून संधी :

उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. सहकार विषयातील पदविकाधारक व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.

वयोमर्यादा २७ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली दादरा व नगर हवेली प्रशासनाची जाहिरात पहावी अथवा ६६६.ल्लिँ.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज ऑफिस ऑफ दि असिस्टंट रजिस्ट्रार को-ऑपरेटिव्ह, आयटीआय कॅम्पस, आमली, सिल्वासा, ३९६२३० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१६.

 

केंद्र शासित दादरा नगर हवेली प्रशासनात कृषी पर्यवेक्षकांच्या जागा

अर्जदार कृषी वा तत्सम विषयाचे पदवीधर असावेत.

वयोमर्यादा २७ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूज च्या ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली दादरा व नगर हवेली प्रशासनाची जाहिरात पहावी अथवा ६६६.ल्लिँ.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. पूर्ण भरलेले अर्ज ऑफिस ऑफ सब- डिव्हिजनल सॉइल कंझर्वेशन ऑफिसर, सॉइल कंझव्‍‌र्हेशन ऑफिसर, सॉइल कंझर्वेशन डिपार्टमेंट, पीडब्ल्यूडी कॅम्पस, सिल्वासा ३९६२३० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१६

 

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ॅस्ट्रॉफिजिक्स, बंगलोर येथे प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या पदांसाठी थेट मुलाखत:

अर्जदार पदवीधर इंजिनीअर्स असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, बंगलोरची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.iiap.res.in/job.htm या संकेतस्थळाला भेट द्यावी.

तपशीलवार अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स सेकंड ब्लॉक, कोरामंगला, बंगलोर ५६००३४ या पत्त्यावर उपस्थित राहण्याची तारीख १५ सप्टेंबर सकाळी ९ वा.

 

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत हस्तकला विभागात सहाय्यक संचालकांच्या जागा:

अधिक माहिती व तपशीलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख

१५ सप्टेंबर २०१६.

 

एनटीपीसी लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी मटेरियल/ स्टोअरकीपर्सच्या जागा :

उमेदवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक वा स्टोअर कीपिंगची कौशल्य पात्रताधारक असावेत. याशिवाय त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट वा संगणकाची १५० प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ ऑगस्टच्या अंकातील एनटीपीसीची जाहिरात पहावी.

विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज हेड ऑफ डिपार्टमेंट, ह्य़ुमन रिसोर्स डिपार्टमेंट, एनटीपीसी- कुडगी सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, पोस्ट- तेलगी, जि. विजापूर ५८६१२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०१६.

 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, देवनार, मुंबई

(जाहिरात क्र. टीआयएसएस/ऑगस्ट/२०१६) स्टेनोग्राफर ग्रेड २(अज – २, इमाव – २) स्टेनोग्राफर ग्रेड ३ (अजा – १, इमाव – ३) (असिस्टंट लायब्रेरियन, सिस्टीम अ‍ॅनालिस्ट, सोशलवर्कर, अप्पर डिव्हिजनल क्लर्क, टेलिफोन ऑपरेटर, सायकॅट्रिक सोशलवर्कर – प्रत्येकी १ पद) या पदांची भरती.

पात्रता – स्टेनोग्राफर ग्रेड २ – पदवी उत्तीर्ण, १०० श.प्र.मि. इंग्रजी लघुलेखन आणि ४० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखनाचा स्पीड, एम्एस्सीआयटी कोर्स, २ वर्षांचा कामाचा अनुभव. स्टेनोग्राफर ग्रेड ३ पदवी उत्तीर्ण, ८० श.प्र.मि. इंग्रजी लघुलेखन आणि ३० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन स्पीड, एम्एससीआयटी कोर्स.

अर्ज शुल्क – रु. १,०००/- (अजा/अज/विकलांग यांना फी माफ) ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.tiss.edu http://www.tiss.edu/ या संकेतस्थळावर दि. ३० सप्टेंबर २०१६पर्यंत करावेत.

 

इंटेलिजन्स ब्युरो (गृह मंत्रालय, भारत सरकार)मध्ये ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड () (टेक्निकल)च्या एकूण ३२० पदांची भरती

(खुलागट – १९०, इमाव – ४३, अजा – ५७, अज – ३०) पे स्केल – रु. ५,२००/- – २०,२००/- अधिक ग्रेड पे रु. २,४००/- (पे बँड -१ ) एकूण वेतन अंदाजे रु. ३०,०००/- दरमहा.

पात्रता – गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण. रेडिओ टेक्निशियन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयातील आयटीआय कोर्स उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. २४ सप्टेंबर २०१६ रोजी) १८ ते २७ वष्रे. अजा/अज – १८ ते ३२ वष्रे, इमाव – १८ ते ३० वष्रे, (परित्यक्ता/विधवा महिला – खुलागट – १८ ते ३५ वष्रे, अजा/अज – १८ ते ४० वष्रे).

निवड पद्धती –

लेखी परीक्षा – पेपर १- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप – सामान्यज्ञान, सांख्यिकीय क्षमता (न्युमरिकल अ‍ॅबिलिटी), विज्ञान, कारणे इ. विषयांवर आधारित ८० गुणांसाठी.

पेपर २-वर्णनात्मक स्वरूप – (अ) इंग्रजी आकलन, (ब) विरुद्ध अर्थी, समानार्थी इ. (क) गणित आणि विज्ञान.

पेपर-१ आणि पेपर-२ ला प्रत्येकी ८० गुण.

कालावधी – दोन तास.

ट्रेड टेस्ट – संबंधित ट्रेडमधील व्यावहारिक परीक्षा. गुण – ४० (एकुण २०० गुण). परीक्षा केंद्र – महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर. लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्टमधील गुणवत्तेनुसार निवड. ट्रेड टेस्टसाठी उमेदवारांना त्यांच्या ई-मेल अ‍ॅड्रेसवर सूचित केले जाईल.

परीक्षा शुल्क – रु. ५०/- (अजा/अज/महिला यांना फी माफ)

अर्ज कसा करावा – ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.mha.nic.in http://www.mha.nic.in/ या संकेतस्थळावर दि. २४ सप्टेंबर २०१६ पर्यंत करावेत.

 

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर (टेक्नीकल) च्या १९ जागा :

उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम इंजिनीअरिंग, संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान इंजिनीअरिंग यासारख्या विषयातील पदवी अथवा इलेक्ट्रॉनिक्स विषयातील एमएससी पात्रता घेतलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा ३१ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१६ च्या

अंकात प्रकाशित झालेली रेलटेल कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी. किंवा www.railtelindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पूर्ण भरलेले अर्ज रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड प्लॉट नं. १४३, सेक्टर- ४४, गुडगाव १२२००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१६.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०१७ च्या पूर्व प्रशिक्षणासाठी

११ महिने पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे प्रवेशासाठी रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रवेश परीक्षा घेणार आहे.

प्रवेश क्षमता – एकूण ७०

पात्रता –  पदवी (कोणत्याही शाखेची उत्तीर्ण)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी २१ ते ३२ वष्रे

(इमाव – २१ ते ३५ वष्रे, अजा/अज – २१ ते ३७ वष्रे). उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा.

प्रवेश परीक्षा पद्धत – नागरी सेवा पूर्व परीक्षा २०१६च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रवेश परीक्षा २ तास कालावधी

२०० गुणांसाठी ज्यात सामान्य अध्ययन आणि सीसॅट

प्रत्येकी १०० गुणांसाठी. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/३ गुण वजा केले जातील. उमेदवारांची निवड सामान्य अध्ययनमधील गुणवत्तेनुसार. (सीसॅटमध्ये किमान ३३ गुण मिळणे आवश्यक.)

परीक्षा शुल्क रु. ३००/- (मागासवर्ग रु. १५०/-) अर्ज ऑनलाईन पद्धतीने http://www.preiasamt.in/ या संकेतस्थळावर दि. २० सप्टेंबर २०१६ पर्यंत करावेत.