भारतीय लष्करात सामील होण्यासाठी जानेवारी २०१८ पासून सुरू होणाऱ्या पुढील कोस्रेससाठी प्रवेश.

१) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स ((TGC-१२६) (४० पदे).

पात्रता – सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन/मेटॅलर्जिकल/इन्स्ट्रुमेन्टेशन इ. विषयांतील इंजिनीअरिंग पदवी (अंतिम वर्षांचे विद्यार्थी पात्र आहेत.) निवडलेल्या उमेदवारांना ‘लेफ्टनंट’ पदावर तनात केले जाईल व एक वर्ष पूर्वलक्ष्यी सेवा ज्येष्ठता देण्यात येईल.

ट्रेिनग – १ वर्ष कालावधी, इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर वेतन दरमहा रु. ८०,०००/- मिळेल.

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी २० ते २७ वर्षे .

२) १०+२ टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स – २०१८ (एकूण जागा ९०).

पात्रता – १२ वी विज्ञान (पीसीएम) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. १ जुल १९९८ ते १ जुल २००१दरम्यानचा असावा. ४ वर्षांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना इंजिनीअरिंग डिग्री दिली जाईल आणि लेफ्टनंट पदावर तनात केले जाईल.

ट्रेनिंग – (अ) १ वर्षांचे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी, गया येथे

(ब) टेक्निकल ट्रेिनग – प्री-कमिशिनग ट्रेिनग ३ वर्षांचे १ वर्षांचे पोस्ट कमिशिनग ट्रेनिंग.

दरमहा वेतन रु.६५,०००/-

(३) आर्मी एज्युकेशन कॉर्पस् (एईसी – १२६) कोर्स (एकुण १२ पदे).

पात्रता – (१) इंग्रजी/इकोनॉमिक्स/ हिस्ट्री/पॉलिटिकल सायन्स/इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयातील पदव्युत्तर पदवी (४ पदे).

(२) फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथ्स/ झूऑलॉजी/बॉटनी/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/जीओलॉजीमधील पदव्युत्तर पदवी (६ पदे).

(३) विदेशी भाषा (एमए (चायनिज) (२ पदे). पात्रतेची परीक्षा किमान दुसऱ्या अथवा पहिल्या वर्गात उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म

२ जानेवारी १९९१ आणि १ जानेवारी १९९५ दरम्यानचा असावा. १ वर्षांचे ट्रेिनग इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे. ट्रेिनग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर लेफ्टनंट पदावर तनाती वेतन दरमहा रु. ८०,०००/- सीटीसी. तीनही कोस्रेससाठी ट्रेिनग दरम्यान दरमहा रु. २१,०००/- स्टायपेंड दिले जाईल. ऑनलाइन अर्ज http://www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर दि. १४ जून २०१७ पर्यंत करावेत.