देना बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर होण्यासाठी अ‍ॅमायटी विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग आणि फायनान्ससाठी प्रवेश.

एकूण – ३०० जागा (अजा – ६२, अज – १०, इमाव – २२, अराखीव – २०६).

पात्रता – (दि. १ एप्रिल २०१७ रोजी) किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग यांना ५५%) वयोमर्यादा – (दि. १ एप्रिल २०१७ रोजी) २० ते २९ वष्रे. (इमाव – ३२ वष्रे, अजा/अज – ३४ वष्रे)

शुल्क रु. ४००/- (अजा/अज/विकलांग रु. ५०/-) (कोर्स फी रु. ३ लाख सेवाकर). ऑनलाइन अर्ज http://www.denabank.co.in   http://www.denabank.co.in/ या संकेतस्थळावर दि. ९ मे २०१७ पर्यंत करावेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलीस (पुरुष – ६१६ पदे, महिला २५६ पदे)/सेंट्रल आम्र्ड पोलीस दलात (पुरुष – ६९७ पदे, महिला – ८९ पदे) पोलीस उपनिरीक्षक आणि सीआयएसएफमध्ये साहाय्यक उपनिरीक्षक (पुरुष – ५०७  पदे आणि महिला – ५६ पदे) पदांच्या भरतीसाठी जून/जुल २०१७ मध्ये परीक्षा घेणार.

पात्रता – दि. १ जानेवारी २०१७ रोजी पदवी उत्तीर्ण. दिल्ली पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारांकडे हलकी वाहने (मोटरसायकल आणि कार) चालविण्याचा परवाना शारीरिक क्षमता चाचणीवेळी सादर करणे आवश्यक.

शुल्क – रु. १००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ)

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे.

निवड पद्धती –

पेपर-१ – सामान्य बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, इंग्रजी आकलन प्रत्येकी ५० गुण. कालावधी – दोन तास. परीक्षेचा दिनांक – ३० जून २०१७ ते ७ जुल २०१७.

पेपर-२ – इंग्रजी भाषा आणि आकलन २०० गुण. कालावधी – दोन तास. दोनही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. शारीरिक पात्रता – उंची (पुरुष) – १७० सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.), (महिला) – १५७ सें.मी. (अज – १५४ सें.मी.), छाती – पुरुष – ८०-८५ सें.मी. (अज – ७७-८२ सें.मी.) शारीरिक क्षमता चाचणी फक्त पात्रता फेरी असेल. पेपर-१ आणि पेपर-२ मधील गुणवत्तेनुसार अंतिम निवड.

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०१७ रोजी) २० ते २५ वष्रे. (इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रे) (परित्यक्ता/विधवा महिला – ३५ वष्रे  इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे).

ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर दि. १५ मे २०१७ पर्यंत करावेत.

पशुधन विकास अधिकारी पदांच्या १०० जागांसाठी भरती. (महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत) जाहिरात क्र. २४/२०१७.

पात्रता – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन यामधील पदवी (राज्य पशुवैद्यक/भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ नुसार नोंदणी असणे आवश्यक.

दोन वर्षांचा परिवीक्षा कालावधी असेल.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी ३८ वष्रे/मागासवर्गीय ४३ वष्रे.

निवड पद्धती – लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची (२०० गुणांची) आणि मुलाखत (५० गुण).

शुल्क – रु. ३७३/- (मागासवर्गीय रु. २७३/-). ऑनलाइन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १६ मे २०१७ पर्यंत करावेत.