टपाल विभाग- मुंबईमध्ये मोटार वाहन मॅकॅनिकच्या ३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ जुलै २०१७ च्या अंकातील टपाल विभाग, मुंबईची जाहिरात पहावी. तपशीलवार भरलेले अर्ज सीनिअर मॅनेजर, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स, मेल मोटार सव्‍‌र्हिस, १३४/ए, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नागपूर येथे असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) च्या ६ जागा.

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन, नागपूर जाहिरात पाहावी अथवा महाराष्ट्र मेट्रो रेलच्या http://www.metrorail.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडिशनल जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो- हाऊस, २८/२, सी. के. नायडू मार्ग, आनंद नगर, सिव्हिल लाइन्स, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट.

केंद्र सरकारच्या टाकसाळ मुद्रणालयात मुंबईसह विविध ठिकाणी  फायनान्स अ‍ॅण्ड अकाऊंटंट ऑफिसरच्या ९ जागा-

अर्जदार सीए/ आयसीडब्ल्यूए पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी फायनान्ससह एमबीए पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या टाकसाळ मुद्रणालयाची जाहिरात पाहावी अथवा मुद्रणालयाच्या http://www.spmcil.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ओझर (नाशिक) येथे मेडिकल सुपरिंटेंडंट म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली हिंदुस्थान एरोनॉटिक्स- ओझर, नाशिकची जाहिरात पाहावी अथवा एचएएलच्या  http://www.hal-india.com/ संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी महाजेनकोमध्ये करारतत्त्वावर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीची जाहिरात पाहावी अथवा महाजेनकोच्या http://www.mahagenco.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबईअंतर्गत प्रशिक्षणार्थी मरिन इंजिनीअर्स म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा शिपिंग कॉर्पोरेशनच्या http://www.shipindia.com/ या संकेतस्थळावरील careers/ fleet.persound या विभागाना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट.

छात्रसैनिकांना सैन्यदलात थेट संधी-

अर्जदार पदवीधर असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची ‘सी’ प्रमाणपत्र पात्रता पूर्ण केलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ जुलै २०१७ च्या अंकातील सशस्त्र दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट.