* मुंबई विद्यापीठाच्या वतीने प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमीमार्फत एमपीएससी /यूपीएससी स्पर्धा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. पदवी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या वर्गात सहभागी होता येईल. प्रवेश परीक्षा अर्ज दि. १० मे २०१७ पर्यंत स्वीकारले जातील. संपर्क - जे.पी. नाईक भवन, पहिला मजला, रु. नं. ४, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०९८. दूरध्वनी क्र. ०२२-२६५४३५४७, २६५३०२०८. * इंडिया गव्हर्नमेंट मिंट, हैद्राबादमध्ये सुपरवायजर (९ पदे) आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंट (५१ पदे) या पदांची भरती. पात्रता - (१) सुपरवायजर - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेटॅलर्जी/सिव्हिलमधील प्रथम वर्गातील अभियांत्रिकी पदविका. पदवीधारकांना प्राधान्य. वय -१८-३० वष्रे. (२) ज्युनियर ऑफिस असिस्टंट - कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण टायिपग स्पीड इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. वय - १८-२८ वष्रे. ऑनलाइन अर्ज वर दि. २८ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत. * भारतीय नौदलात ‘नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन कॅडर’मध्ये ‘अधिकारी’ (सब लेफ्टनंट) होण्याची संधी. एकूण रिक्त पदे - ८. पात्रता मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/ इन्स्ट्रमेंटेशन/आयटी/केमिकल/मेटॅलर्जी/एअरोस्पेस इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण. (पदवीच्या अंतिम वर्षांला असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) पुरुष/महिला पात्र आहेत. शारीरिक मापदंड - उंची - पुरुष - १५७ सें.मी., महिला -१५२ - सें.मी. वेतन - दरमहा सीटीसी - रु. ७२,४४४ निवड पद्धती - पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार एस्एसबी मुलाखतीस सामोरे जावे लागेल. ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in वर दि. २७ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत. * इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (अभिमत विद्यापीठ)मध्ये दोन वर्ष कालावधीच्या एमए/ एमएससी इ. कोस्रेससाठी प्रवेश सूचना २०१७-१९ (१) एमए/एमएससी (पॉप्युलेशन स्टडीज्) पात्रता - सोशल सायन्सेस/गणित/सांख्यिकी या विषयांतील पदवी. (२) एमएससी (बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी) पात्रता - गणित/ सांख्यिकी विषयातील पदवी. (३) मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज. पात्रता - गणित, सांख्यिकी, अर्थशास्त्र, सायकॉलॉजी, सोशिओलॉजी, सोशल वर्क, जीओग्राफी, अँथ्रोपोलॉजी विषयांतील पदव्युत्तर पदवी. (४) मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पॉप्युलेशन स्टडीज). पात्रता - मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज/एमए/एमएस्सी- डेमोग्राफी/बायो-स्टॅटिस्टिक्स आणि इपीडेमिनॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी. (५) मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज (डिस्टन्स लìनग). पात्रता - सोशल सायन्स/ गणित/सांख्यिकी इ. विषयांतील पदव्युत्तर पदवी. १ ते ४ कोर्ससाठी पात्रता परीक्षेत किमान ५५% गुण आवश्यक. वयोमर्यादा - कोर्स क्र. १ व २ साठी २५वष्रे. कोर्स क्र. ३ साठी २८ वष्रे. कोर्स क्र. ४ व ५ साठी ३० वष्रे. कोर्स क्र. १ ते ४ साठी प्रत्येकी ५० जागा आणि कोर्स क्र. ५ साठी १५० जागा. भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी फी आकारली जाते. सार्क (एसएएआरसी) देशांतील उमेदवारांना टय़ूशन फीमध्ये ५०% सवलत दिली जाते. प्रत्येक भारतीय उमेदवाराला दरमहा रु. ५,०००/- फेलोशिप दिली जाते. ऑनलाइन अॅडमिशन टेस्ट दि. ७ जून २०१७ रोजी घेतली जाईल. ऑनलाइन रजिस्ट्रेशन www.iipsindia.org वर दि. १ मे २०१७पर्यंत करावे.